Home / Health / Benefits Of Garlic in Marathi – गुणकारी लसणाचे फायदे

Benefits Of Garlic in Marathi – गुणकारी लसणाचे फायदे

एलिंयम सटीवूम ( Allium Sativum ) याला साधारणतः आपण लसून (Garlic ) या नावाने ओळखतो. याचा वापर आपण कांद्यासोबत नेहमी करतो.

मुख्यतः भारतीय खाद्यपदार्थामध्ये लसूनाचा समावेश असतोच फक्त खाद्यपदार्थ म्हणूनच नाहीतर एक उत्तम घरगुती औषध म्हणूनही लसणाचा वापर होतो. भारतीय स्वयपाक घरात तयार होणाऱ्या खाद्द्यान्नात बरेचदा लसून वापरतात. या लसणाचे बरेच उपयोग आहेत. चला तर आता आपण लसूनापासून होणाऱ्या फायद्यांची माहिती घेऊ.

Benefits Of Garlic

Benefits Of Garlic in Marathi – गुणकारी लसणाचे फायदे

१) सर्दी आणि ताप आणि उपचार –

लसून आपल्याला सर्दी, ताप व इतर बरयाच आजारांपासून मुक्त करू शकतो. यासाठी लसुनाच्या गाठी खा किंवा लसून असलेला चहा प्या. याने आपले नाक साफ होईल. सोबतच सर्दी खोकल्यापासूनही मुक्तता मिळते. लसून असलेली चहा फक्त सर्दी खोकल्यासाठीच कामी येत नाही तर शरीराची रोग प्रतिकारक शक्तीही वाढवतो.

यासोबत असेही सांगितल्या जाते कि मासाहार केल्याने शरीराला होणारे नुकसान लसून खाल्ल्याने भरून निघते यासोबत जे कामगार हानिकारक व प्रदूषित वातावरणात काम करतात त्यांनाही लसुणाचे सेवन केल्यास भरपूर लाभ होतो. यामुळे दुषित वातावरणाशी लढण्यास मदत मिळते. “लसुण आपण ज्यूस आणि सूप मध्ये टाकून घेतल्यास सर्दी खोकल्यापासून मुक्त होऊ शकतो. याशिवाय लसुनाचे इतरही फायदे आहेत.”

२) रक्त शुद्धीकरणास सहाय्यक –

काय तुम्ही सकाळी सकाळी पुरळांना लपविण्यापासून कंटाळले आहात? मग आता रक्ताचे शुद्धीकरण करून शरीराला आतून स्वस्थ बनवून पुरळांना मुळापासून मिटविन्याची वेळ आली आहे यासाठी लसुनाच्या २-3 पाकड्या कोमट गरम पाण्यासोबत रोज घ्या सकाळी सकाळी याचे सेवन करा आणि संपूर्ण दिवसभर भरपूर पाणी प्या.

यासोबत तुम्ही रोज सकाळी निंबाच्या शरबतामध्ये २-3 पाकळ्या बारीक करून चांगल्या प्रकारे मिळवून प्या. लसून तुमच्या शरीराला आतून स्वच्छ करतो आणि हानिकारक रसायन शरीरातून बाहेर फेकतो. लसून आपल्या शरीराला आतून स्वस्थ ठेवतो.

3) हृदयासंबंधी आजारांपासून वाचवतो –

दररोज लसूनचा सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करतो कारण यामध्ये उपयोगी एन्टीऑक्सीडेंट तत्व असतात जे कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करतात. यासोबत लसून शरीरातील रक्त प्रवाहही नियंत्रित करतो. सोबतच शरीरात शर्करचे प्रमाण हि नियंत्रित करतो.

आपल्याला हि गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल कि लसुनाला पूर्णपणे शिजवल्यास त्यातील महत्वपूर्ण तत्व म्हणचे सल्फर नष्ट होऊन जातो जो लसुणाचा एक महत्वाचा औषधिय गुण मानला जातो यासाठी लसून कच्चा किंवा थोडाफार भाजलेलाच खाण्याचा प्रयत्न करा.

४) त्वचा आणि केस यासाठी –

लसूनमध्ये सापडणारे लाभदायक तत्व आपल्या त्वचेला उष्णता, पुरळ, डाग –धब्बे आणि त्वचा सुटणे यापासून वाचवतो त्वचेवर लसुनाचा वापर केल्याने त्वचेवर होणारे फंगल इन्फेक्शन सुद्धा दूर करता येते. त्यामुळे जेव्हा हि फंगल इन्फेक्शन होते लसून अमृता समान काम करतो.

केसावर कांद्याचे फायदे आपण सर्व जाणतो परंतू लसून जो कांद्याचा भाऊ मानल्या जातो त्यापासून केसांना बरेच फायदे आहेत. चला तर मग आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो.

वाटलेला लसून आपल्या डोक्यात केसांच्या मुळाशी लावले किंवा लसुनाच्या तेलाने केसांच्या मुळाशी लावून मालिश केल्याने केस गळण्याची समस्या दूर होते.

५) कॅसर पासून मुक्ती –

बऱ्याच अध्ययानातून कळले आहे कि रोज एक विशेष मात्रेत लसूनाचे सेवन केल्यास पोट आणि कोलेरेक्टल कॅन्सर पासून बचाव होतो.

६) त्वचा फाटने आणि कापणे –

जर तुम्हाला शरीरावर त्वचा फाटल्या सारखी वाटत असेल किंवा त्वचा कापल्या गेल्याने जखम झाली असेल तर यावर लासुणाचा वापर करता येतो. यासाठी बारीक कापलेला लसून त्या त्वचेवर किंवा जखमेवर केल्यास लवकरच वेदना कमी होण्यास मदत मिळते.

घ्यावयाची काळजी

  1. कोणत्याही वैद्यकीय शस्त्रक्रिया किंवा सर्जरीपूर्वी लसून खाऊ नये.
  2. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पहिल्या दिवशीच 3-४ पेक्षा जास्त लसणाच्या पाकड्या खाऊ नये.
  3. अस्तमाच्या रोग्यांनी लसुनाचे सेवन करू नये. कारण याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

More:

  1. Benefits Of Coconut Oil
  2. Benefits of Milk
  3. Benefits of Anjeer

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी लसणाचे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा गुणकारी लसणाचे फायदे  – Benefits Of Garlic in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Benefits Of Garlic – लसणाचे फ़ायदे या लेखात दिलेल्या लसणाच्या फायद्यांन  – Benefits Of Garlic बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Eye care tips in Marathi

डोळे सुंदर ठेवण्याकरता काही उपाय – Eye care tips in Marathi

Eye care tips in Marathi तेरी आखो के सिवा दुनीयामे रख्खा क्या है? खरतर ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *