एका रात्रीत देशाचे दोन तुकडे करणारी इतिहासातील एक भिंत!

Berlin Wall History

जगात अश्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत ज्या आज इतिहास जमा झालेल्या आहेत. पण त्या घटना आजही काही गोष्टींची आपल्याला आठवण करून देतात. किंवा आपल्याला विचार करायला भाग पाडतात की त्यावेळेस कशी परिस्थिती निर्माण झाली असेल जेव्हा एकाच देशाचे दोन तुकडे झाले असतील. तेही एका भिंतीमुळे.

इतिहासातील बऱ्याच घटनांप्रमाणे आजच्या लेखात सुध्दा आम्ही आपल्यासाठी एक अशी घटना घेऊन आलेलो आहोत ज्याविषयी आपण कदाचितच ऐकलेलं असेल. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की एका देशाचे भिंतीमुळे दोन तुकडे कसे झाले? आणि ही भिंत काय म्हणून इतिहासात नोंदविल्या गेली? तर चला पाहूया. भिंतीमुळे वेगळा झालेला एकच देश.

इतिहास बर्लिन भिंतीचा – Berlin Wall History in Marathi

Berlin Wall History
Berlin Wall History

आपण बर्लिन च्या भिंतीवषयी ऐकलेलं असेलच, की या भिंतीमुळे जर्मनी चा पूर्वोत्तर भाग आणि पाश्चिमात्य भाग वेगळा झाला होता. पण २८ वर्षांच्या कालावधी नंतर हा देश पुन्हा एकत्र झाला होता. या भिंतीला फक्त एका दिवसात उभे केल्या गेले होते. बर्लिन ची ही भिंत १६० किलोमीटर पर्यंत लांब आहे. या भिंतीचे निर्माण फक्त एका रात्रीत केल्या गेले होते. आपल्या मनात उत्सुकता जागी झाली असेल की असे काय कारण निर्माण झाले असेल की एका दिवसात भिंत उभी करावी लागली असेल तेही एकाच देशात. चला बुवा दुसऱ्या देशाच्या सीमेवर ह्या गोष्टी होणे साहजिक मानल्या जातील, पण एकाच देशामध्ये काय झाले की सरळ भिंत उभी करावी लागली?

तर यामागे सुध्दा कारण आहे, जेव्हा दुसरे विश्व युद्ध झाले तेव्हा जर्मनी चे विभाजन झाले आणि पूर्वोत्तर जर्मनी मधील कामगार, व्यवसायी, आणि बरेच लोक काही राजनैतिक कारणांमुळे पूर्वोत्तर जर्मनी ला सोडून पश्चिमी जर्मनीत जाऊ लागले ज्यामुळे पूर्वोत्तर जर्मनी ची आर्थिक स्थिती खालावली, या परिस्थिती ला पाहता तेथील सोवियत संघाच्या अध्यक्षा निकिता ख्रुश्चेव यांनी तेथील लोकांचे पलायन रोखण्यासाठी या भिंतीला उभे करण्याची परवानगी दिली. आणि या भिंतीला एका रात्रीत उभे केल्या गेलं होतं. त्या दिवशी दिनांक होती १३ ऑगस्ट १९६१ आणि या भिंतीचे निर्माण हे १४ ऑगस्ट १९६१ ला सकाळी पूर्ण झाले होते.

या ऑपरेशन ला त्यांनी “ऑपरेशन पिंक” म्हणून नाव दिले होते. या ऑपरेशन नंतर बऱ्याच लोकांचे पलायन कमी झाले होते. अशी माहिती मिळते की १९४९ ते १९६२ पर्यंत २५ लाख लोकांनी पलायन केले होते परंतु तेच जर १९६२ आणि १९८९ च्या दरम्यान हा आकडा फक्त ५ हजार लोकांचा दिसतो. म्हणजे या भिंतीमुळे लोकांच्या पलायनावर फरक पडला होता.

तसे पाहिले असता या भिंतीमुळे बऱ्याच लोकांना स्वतःचा जीवं गमवावा लागला होता. कारण जेव्हाही एखादी व्यक्ती या भिंतीला पार करायचे प्रयत्न करत होती तेव्हा त्या व्यक्तीची गोळी मारून हत्या केली जात होती. पण तरी सुध्दा बऱ्याच लोकांनी या भिंतीला लपून छपून पार करण्याच्या काही कला शोधून काढल्या होत्या. भुयार करून पार करणे, एखाद्या मोठ्या हवेच्या बलून मध्ये बसून पार करणे, ह्या अश्या अनोख्या गोष्टी तेथील लोकांनी तेव्हा केल्या होत्या.

पण म्हणतात ना लोकांच्या विरोधात झालेली गोष्ट जास्त दिवस राहत नाही, त्याचप्रमाणे १९८० मध्ये तेथील सोवियत संघ कमजोर होत होता, त्यांनंतर पूर्वोत्तर जर्मनी मध्ये बर्लिन च्या भिंती विरोधात प्रदर्शने होऊ लागली. आणि १९८९ साली या भिंतीला तोडण्यात आले. आणि पुन्हा एकदा जर्मनीची जनता एकत्र नांदू लागली. पण आपण जर आजही बर्लिन मध्ये गेलात तर आपल्याला ह्या भिंतीचे काही अवशेष पाहायला मिळतील. आणि या भिंतीला पाहण्याकरिता विदेशातून आजही बरेच लोक येतात.

तर ही माहिती होती जगातील त्या बर्लिन च्या भिंतीची आशा करतो आपल्याला ही लिहिलेली माहिती आवडली असणार आपल्याला लिहिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी तसेच इतिहास कालीन घटना, आणि शब्दांच्या माध्यमातून जगाची सवारी करण्यासाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here