हिंदू धार्मिक पवित्र ग्रंथ श्रीमद् भगवत पुराणाची आरती

Bhagwat Aarti

नमस्कार मित्रांनो, आज आपण आरती संग्रह या लेखाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण यांना अनुसरुन असलेल्या पवित्र हिंदू धार्मिक ग्रंथ श्रीमद् भगवत पुराणाची आरतीचे लिखाण करणार आहोत. तसचं, भागवत गीता या पवित्र ग्रंथाबाद्द्ल थोडक्यात माहिती देखील नमूद करणार आहोत. मानवी जीवनाचे महत्व सांगताना भगवान श्रीकृष्ण यांनी केलेल्या वर्णनाचे महत्वपूर्ण लिखाण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तरी, आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे.

हिंदू धार्मिक पवित्र ग्रंथ श्रीमद् भगवत पुराणाची आरती – Bhagwat Aarti Marathi

Bhagwat Aarti Marathi
Bhagwat Aarti Marathi

॥भागवताची आरती॥

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता। श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता॥धृ॥

वेदाचें हें सार पाहे रसभरित।

दशलक्षण हें आहे लक्षीत॥ जय ॥१॥

द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा।

तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा॥ जय ॥२॥

अठरा सहस्र श्लोक गाती ऐकती।

ज्यासी हरीभक्ती त्यासी तत्प्राप्ती॥ जय ॥३॥

गायत्रीचें मंत्ररूप हें पाहें।

परीक्षिति-शुकसंवाद आहे॥ जय ॥४॥

भागवतरूपी देवा तूंचि अहेसी।

करूं ही आरति एका-जनार्दनासी॥ जय ॥५॥ इति

श्रीमद् भागवत पुराण – Shrimad Bhagwat Puran

मित्रांनो, महर्षी व्यास रचित श्रीमद् भागवत पुराण ग्रंथ हा हिंदू धर्मातील पवित्र अठरा पुराणांपैकी एक पवित्र ग्रंथ आहे. या पुराणात महर्षी व्यास यांनी सुमारे अठराशे श्लोकांचे लिखाण केलं आहे.

महर्षी व्यास यांनी या पुराणात भगवान कृष्ण यांच्या विविध कथांचे वर्णन कथन केलं आहे. तसचं, हे भागवत पुराण म्हणजे खुद भगवान कृष्ण याचा जीवन सार होय. म्हणून या पुरणाला मोक्ष प्रदान करणारे श्रीमद् भागवत पुराण देखील म्हटलं जाते. भागवत महात्म्य म्हणजे श्रीमद् भागवत ग्रंथाची प्रस्तावना होय.

भागवतकारांच्या मते, भागवत म्हणजे “भागवत: इदं भागवतम्” अर्थात भगवंतांचे स्वरूप दर्शविणारे शास्त्र. तर. भागवत पुराण ही भगवंतांची वाङ्मयी मूर्ती होय. मानवी मन शुद्ध करणारे या ग्रंथापेक्षा दुसरे कोणतेही चांगले साधन वा शास्त्र नाही.

आजच्या युगातील मानवी जीवन खूप धावपळीचे आहे त्यामुळे मानवाला कामानिमित्त दररोज धावपळ ही करावी लागते. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ देखील बिघडते, त्यांना शांततेची आवश्यकता असते. अश्या लोकांसाठी हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे. त्या लोकांनी या ग्रंथाचे वाचन केल्याने त्यांना या ग्रंथापासून खूप चांगली प्रेरणा मिळते.

महर्षी व्यास यांनी भागवत गीतेत नमूद केल्याप्रमाणे, महाभारताच्या वेळेस भगवान कृष्ण स्वत: अर्जुनाला मानवी जीवनाचे महत्व पटवून सांगतात. तसचं, मानवी जन्म मृत्युबद्द्ल महत्वपूर्ण बाब कथन करतात.

आजच्या पिढीच्या युवकांनी या ग्रंथाचे दररोज वाचन करायला पाहिजे तसचं, या ग्रंथापासून बोध घेवून आपण देखील आपलं जीवन आनंदी बनवा. भागवत कथेबद्दल अनेक ऋषीमुनी तसचं, संतांचे असे म्हणने आहे की, “जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत्” अर्थात अनेक जन्मांच्या पुण्याईने मानवाला भागवत कथा श्रवणाची संधी प्राप्त होत असते.

इतकी मोठी या भागवत पुराण ग्रंथाची महिमा आहे. या ग्रंथात भगवान कृष्ण यांना देवाधी देव म्हणून संबोधलं आहे. त्याचप्रमाणे, भक्ती योग, आध्यात्मिक तसचं, मानवी आचरण आदी बाबींचे वर्णन केलं आहे. ‘भागवत पुराण’ हा ग्रंथ मुख्यत: वैष्णव संप्रदायाचा महत्वपूर्ण ग्रंथ आहे.

आपल्या देशांतील अनेक संत महंत आपणास भागवत कथा श्रवण करण्यास सांगत असतात. त्यामागील त्यांचा उद्देश्य हाच असतो की, आपणास आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी तसचं, प्रत्येक व्यक्ती आपल्या धर्माबद्दल जागृत असणे आवश्यक आहे. भगवान कृष्ण देखील अर्जुनाला धर्माची शिकवण देत असल्याचे आपणास या पुराणातील कथेचे श्रवण केल्यास निर्दर्शनास येईल.

भागवत ग्रंथाचे अध्ययन करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी विशेष प्रकारचे गुण असणे आवश्यक आहे,

हा भागवत ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. या ग्रंथाचे अध्ययन करणारे व्यक्ती ही खूप विद्वान आणि तत्वज्ञानी असतात. “श्रीमद् भागवत पुराण” हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला असल्याने या  ग्रंथातील प्रत्येक ओवींचा अर्थ अध्ययन करणाऱ्या भागवतकरास माहिती असतो.

भागवत गीतेच्या श्रवणास अर्जुनाला सर्वात श्रेष्ठ मानलं जाते. त्याचप्रमाणे भगवान परीक्षित यांना देखील श्रेष्ठ मानलं जाते. पौराणिक कथेनुसार, भागवत गीतेचे श्रवण केल्यानंतर भगवान परीक्षित यांना मोक्ष प्राप्ती झाली होती मित्रांनो, महर्षी व्यास लिखित या भागवत गीतेतून आपणास घेण्यासारखे खूप काही आहे.

आपण पाहत असतो की, आपण राहत असलेल्या शहराच्या अनेक भागात वर्षातून एकदा तरी भागवत कथेचे आयोजन करण्यात येत असते. भागवत गीता श्रवण केल्याने आपल्या मनाला तृप्ती मिळते. आपण आपले सर्व दु:ख विसरून नव्याने सुरवात करतो.

त्याचप्रमाणे भागवत आरतीला देखील तितकेच महत्व आहे. भागवत गीतेला अनुसरून पठन करण्यात येणाऱ्या आरतीमध्ये भगवान कृष्ण यांचा उल्लेख करण्यात आला आहे. भगवान कृष्ण यांना प्रसन्न करण्यासाठी तसचं, त्यांची वंदना करण्यासाठी ही आरती म्हटली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here