Home / History / अविश्वसनीय मंदीर बिजली महादेव | Bijli Mahadev History

अविश्वसनीय मंदीर बिजली महादेव | Bijli Mahadev History

Bijli Mahadev

Bijli Mahadev – बिजली महादेव मंदीर हे हिमाचल प्रदेशातील एक विलक्षण आकर्षणाचे केंद्र मानले जाते. हे मंदीर कूल्लू घाटाच्या 2460 मी. क्षेत्रात पसरले आहे. हे भारतातील एक रहस्यमयी व उत्कंठा निर्माण करणारे मंदीर मानले जाते. हे मंदीर बासनदीच्या काठावर तर कुल्लू पासून 22 किलोमिटर अंतरावर आहे.

Bijli Mahadev Temple
Bijli Mahadev Temple

अविश्वसनीय मंदीर बिजली महादेव – Bijli Mahadev History

या मंदीरातून कूल्लू आणि पार्वती घाटाचे मनोरम दृष्य पाहता येते. मंदीरात 60 फूट उंच बिजली महादेव शिवाची मूर्ति सुर्याच्या उजेडात माणिका समान चमकते. चमकदार अशा या मंदीरात असे मानले जाते की मंदीराच्या पुजा-यांनी बटर आणि सत्तूच्या मदतीने मंदीरातील शिव लिंगाची स्थापना केली होती. येथे प्रकाश निर्माण होतो व प्रकाश निर्माण होतांना हरहर महादेवची गर्जना ही होते.

आख्यायिकेनुसार एका कडकडाटाने येथील शिवलिंगाचे तूकडे केले होते. त्यानंतर पुजा-यांनी तुप आणि सत्तूच्या मदतीने लिंगाचे तुकडे जोडले. शिवरात्रीच्या महापर्वावर येथे मोठी यात्रा भरते. असंख्य भक्त शिव लिंगाच्या दर्शनासाठी येथे जमतात. या मंदीराचा इतिहास वशिष्ठ मुनींशी जोडला आहे. त्यांनी शिवशंकराची आराधना केली होती त्यांच्या आग्रहावर शिवशंकरांनी त्यांना दर्शन दिले होते. मुनिंनी परिसरात विजांच्या पडण्यामुळे होणा-या त्रासास कमी करण्याची विनवणी केली. तेव्हां पासुन या मंदीरावर विज निरंतर पडते, गावक-यांच्या मते शिवशंकरांनी गावावर पडणा-या विजांना आपल्या मंदीरात सामावुन घेतले होते त्यामुळेच याचे नाव बिजली महादेव असे झाले.

बिजली महादेव मंदीर पर्यंत कसे पोहोचावे ? – How to reach Bijli Mahadev Temple

आपण कुलू पर्यंत आरामात पोहोचू शकतो येथुन बस पकडून चासरा गावापर्यंत येता येते. त्यानंतर येथून 3 कि.मी. चा पायी रस्ता भक्तांना चालुनच पार करावा लागतो. जर तूमचे स्वास्थ्य ठिक असेल तर तूम्ही ही 3 कि.मी चढाई पार करू शकता. हा रस्ता फारच मनोरम व निसर्गाच्या दृष्यांनी भरलेला आहे. यामुळे चढाईचा त्रास तूम्ही विसरून जाल. मंदीराच्या टेकडयांवर पोहोचून पार्वती घाट व कूल्लू घाटाची मनोरम दृष्ये फारच मोहुन टाकतात. येथे एकदा तरी नक्कीच भेट द्यावी. येथील निसर्गाचे सौंदर्य अद्भूत आणि मनास शांती देणारे आहे.

Read Also:

Nalanda History

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी अविश्वसनीय मंदीर बिजली महादेवचा इतिहास बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा अविश्वसनीय मंदीर बिजली महादेव | Bijli Mahadev History in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट: अविश्वसनीय मंदीर बिजली महादेव – Bijli Mahadev History  या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Shaniwar Wada Information in Marathi

पुण्यातील शनिवारवाडयाची रहस्यमय कहाणी

Shaniwar Wada Information in Marathi गड, किल्ले, वाडे, राजपाट मिळवणं आणि मिळाल्यानंतर त्या आपल्या ताब्यात …

One comment

  1. Nice. Information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *