Bloodwood Tree Information
शरीराला एखाद्या टोकदार वस्तूचा जोरात घाव झाला तर आपल्या शरीरातुन रक्त वाहते, किंवा एखाद्या वेळेस स्वयंपाक घरात चुकीने चाकू लागतो तेव्हा आपल्या शरीरातून रक्त बाहेर येत, पण कधी विचार केला आहे का किंवा कधी पाहिले आहे का की, एखाद्या झाडाला कापल्यावर त्याच्या मधून लाल रक्तासारखा पदार्थ बाहेर येतो म्हणून, माझ्या मते बऱ्याच लोकांना याविषयी माहिती नसेल कारण बहुतेकदा झाडाला कापल्यावर त्यामधून पांढरा किंवा पाण्यासारखा पदार्थ बाहेर येताना आपल्याला दिसतं.
पण लाल रंगाविषयी बरेच कमी लोकांनी ऐकलेलं असेल, आणू आजच्या लेखात आपण अश्याच एका झाडाविषयी माहिती पाहणार आहोत ज्याला कापल्यावर त्यातून लाल रंगाचा द्रव पदार्थ बाहेर येतो, तर चला पाहूया आगळ्या वेगळ्या झाडाची थोडक्यात माहिती.
असेही एक झाड ज्याला कापल्यावर रक्तासारखा पदार्थ निघतो – Bloodwood Tree Information in Marathi
झाडाला कापल्यावर त्यातून लाल रंगाचा द्रव पदार्थ बाहेर पडतो, असं आपण ऐकलेलं नसेल पण खरच असे एक झाड आहे ज्याला कापल्यावर लाल पदार्थ बाहेर येतो, आणि त्या झाडाचे नाव आहे ब्लडवुड ट्री. हे झाड दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतात. या झाडाला कापल्यावर एक लाल रंगाचा द्रव पदार्थ बाहेर येतो जो हुबेहूब माणसाच्या रक्तासारखा दिसतो.
या झाडाला शास्त्रज्ञांनी एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे “सेरोकारपस एंगोलेनसिस” या झाडाला हे वैज्ञानिक नाव पडलेलं आहे. जर आपण तेथील स्थानिक भागात या झाडाविषयी पाहिले तर आपल्याला या झाडाविषयी बरेचशे नाव ऐकायला मिळतात आणि या झाडाविषयी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात.
काही लोक तर या झाडातून निघणाऱ्या या लाल पदार्थाला देवाचा चमत्कार सुध्दा मानतात. आणि या झाडाला चमत्कारी झाड म्हणून देखील ओळखल्या जातं. कारण या झाडापासून माणसाच्या रक्तासारखा द्रव पदार्थ बाहेर येतो, सोबतच हे झाड माणसाच्या काही आजारांना सुध्दा ठीक करण्यात आपले योगदान देतं. जसे पोटदुखी, मलेरिया, खाज आणि शरीरावर झालेली जखम बरी करण्यासाठी या झाडाला उपयोगात आणले जातं.
आता आपण विचार करत असणार की झाडातून लाल द्रव पदार्थ बाहेर का येतो, यावर वैज्ञानिक सांगतात की वेगवेगळ्या झाडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे द्रव पदार्थ जमिनीत असलेल्या मुळांपासून तर पानांपर्यंत खोडाच्या माध्यमातून वर पाठवले जातात, त्या द्रव पदार्थामध्ये झाडाच्या वाढीसाठी काही विशेष पदार्थ समाविष्ट असतात. जे मुळांपासून झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहचविले जातात. आणि हा लाल द्रव पदार्थ त्यामधील च एक पदार्थ असतो, जेव्हा झाडाला एखाद्या ठिकाणी कापल्या जातं तेव्हा त्यामधून हा लाल द्रव पदार्थाच्या माध्यमातून ते बाहेर येत आणि आपल्याला ते लाल असल्यामुळे वाटतं की रक्तासारखं आहे.
तसे पाहिले असता या झाडाची एखादी फांदी सुध्दा तुटली तर तेथून हा लाल पदार्थ बाहेर येतो, ज्याप्रमाणे आपले शरीर संपूर्ण रक्तवाहिन्यांनी भरलेलं असतं, त्याचप्रमाणे झाडाच्या प्रत्येक भागात वाहिन्या पसरलेल्या असतात, ज्या आवश्यक पदार्थांचे वहन करण्यासाठी उपयोगी येतात.
तसे पाहिले असता या झाडाची उंची १५ – १८ मीटर असते. आणि या झाडाला पिवळ्या रंगाचे फुले येतात, या झाडाच्या फांद्या एखाद्या छत्री प्रमाणे असतात, हे झाड पूर्णपणे एकप्रकारे झाकलेले असते. बाकी झाडांपासून ज्या प्रमाणे वेगवेगळे फर्निचर बनविल्या जातात, त्याचप्रमाणे या झाडापासून सुध्दा महाग वस्तूंची निर्मिती केल्या जाते, आणि बाजारात या झाडांपासून बनलेले फर्निचर महाग विकल्या जात.
तर आपल्याला या झाडाविषयी या लेखाद्वारे थोडक्यात माहिती मिळाली असेल, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!