आपल्याला माहिती आहे का, Box Office काय आहे? आणि या बॉक्स ऑफिस ची सुरुवात कशी झाली?

Box Office Information in Marathi

चित्रपट सृष्टीत वर्षानुवर्षे बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला एक बदल पाहायला मिळालेला आहे मग तो चित्रपटाची शूटिंग करणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये असो की चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांमध्ये. आपणही नवीन चित्रपट प्रदर्शित होताच तो चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जात असणार. “फर्स्ट डे फर्स्ट शो” पाहण्यात जी मजा आहे ती चित्रपट प्रेमींसाठी एक वेगळीच आहे त्याची तुलना कोणत्या गोष्टींशी केली जाऊ शकत नाही, जेव्हा आपण चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जातो, चित्रपट पाहतो त्यानंतर आपल्याला त्या चित्रपटाने केलेली कमाई किती आहे. हे सुध्दा समजते.

आपल्याला कधी तरी Box Office सारखे शब्द कानावर पडले असतीलच, तर आपल्याला माहिती आहे का, की बॉक्स ऑफिस म्हणजे नेमकं काय आहे आणि याची सुरुवात कशी झाली? माहिती नसेल तर काळजी करू नका, आजच्या लेखात आपण त्याच बॉक्स ऑफिस विषयी माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूया Box Office चा आगळा वेगळा इतिहास.

बॉक्स ऑफिस विषयीची माहिती मराठीमध्ये – Box Office Information in Marathi

Box Office Information
Box Office Information

आजकाल कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आपल्याला अश्या काही बातम्या कानावर येतात की या चित्रपटाची Box Office वर एवढी कमाई झाली, पहिल्या दिवशी एवढी, दुसऱ्या दिवशी तेवढी. अश्या प्रकारे पण सुरुवातीला जेव्हा चित्रपट निर्माण होत होते तेव्हा ह्या प्रकारच्या गोष्टी नव्हत्या होत.

ह्या सर्व गोष्टींची सुरुवात राणी एलिझाबेथ यांच्या काळात झाली. पण तेव्हा बॉक्स ऑफिस चे सिस्टम नव्हते तेव्हा चित्रपटगृहात सामान्य जनतेला पडद्याच्या समोर फुकटमध्ये चित्रपट पाहण्यासाठी बसवलं जायचं आणि त्यांच्या मधून एक छोटासा देणगी मागण्याचा डबा फिरवल्या जायचा पण कोणाला पैसे देण्यासाठी बळजबरी नव्हती आपल्या इच्छेनुसार त्यामध्ये पैसे टाकायचे असतं. त्यानंतर विनामूल्य चित्रपट पाहणाऱ्या सामान्य लोकांसाठी आणि पैसे देऊन चित्रपट पाहणाऱ्या श्रीमंत लोकांसाठी बसण्याची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली.

चित्रपटाची मुख्य कमाई ही त्या श्रीमंत लोकांकडून व्हायची. आणि त्यांच्या साठी स्पेशल सीट्स ची व्यवस्था केलेली होती. या सीट वर बसणाऱ्या लोकांमुळे पैसे जमा करण्याऱ्या बॉक्स मध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा जमाव होत असे. आणि त्यामुळे या कमाई ला बॉक्स ऑफिस ची कमाई म्हटल्या गेलं.

तेव्हाच्या काळात चित्रपट गृहाजवळ एक छोटीशी खोली असायची, एवढी छोटी की त्यामध्ये फक्त आणि फक्त २ जणांना बसता येईल, म्हणजे आपण समजू शकता की किती छोट्या जागेत त्यांना काम करावे लागत असे आणि त्याच छोट्याश्या खोली मध्ये एका दिवसाच्या चित्रपटाची कमाई ठेवल्या जात असे. आणि त्या छोट्याश्या बॉक्स सारख्या खोलीत पैसा साठवून ठेवल्याने त्या कमाई ला बॉक्स ऑफिस मध्ये होणारी कमाई म्हटल्या गेलं आणि तेव्हापासून तर आतपर्यंत या कमाई ला बॉक्स ऑफिस वर होणारी कमाई म्हणून संबोधले जाते. तर आपल्याला या लेखातून चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली असेल बॉक्स ऑफिस विषयी.

तर आजच्या या लेखात आपण पाहिले की बॉक्स ऑफिस म्हणजे काय आणि त्याला बॉक्स ऑफिस का म्हटल्या जात. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला हा लिहिलेला छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here