ब्राह्मी ची संपूर्ण माहिती

Brahmi Mahiti Marathi

तेलामध्ये वापरण्यासाठी उपयोगात आणणारी वनस्पती म्हणजे ब्राह्मी होय, तसेच याचा उपयोग औषधीसाठी सुद्धा केला जातो. ब्राह्मीचा उपयोग हा आयुर्वेदात सुद्धा केला जातो. अशी बरीच काही माहिती ब्राह्मी विषयी आहे की जे आपण समोर बघणार आहोत.

ब्राह्मी ची संपूर्ण माहिती – Brahmi Information in Marathi

Brahmi Information in Marathi
Brahmi Information in Marathi
शास्त्रीय नाव: (हर्पेस्टिस् मोनिएर) Herpestes Monieria
इंग्रजी नाव : (बॅकोपा मानिएरा) Bacopa monniea

ब्राह्मीचे झुडूप हे जमिनीवर पसरते. याची पाने पळीच्या आकाराची असतात. या पानांना देठ नसते. तसेच ती पाने मऊ व गुळगुळीत असतात. त्यांची रुंदी दोन ते अडीच मि.मी. व लांबी ४ ते ६ मि.मी. असते. ब्राह्मीच्या प्रत्येक पेराला ४ ते ६ पाने असतात. याची फूले ही जांभळ्या रंगाची असतात. ही वनस्पती पाणथळीच्या, दलदलीच्या ठिकाणी वाढते. या झुडपाची पाने व त्यांचा रस यांचा उपयोग औषधी म्हणून केला जातो,

ब्राह्मीचे औषधी उपयोग – Brahmi Benefits in Marathi

पोटातून घेण्यासाठी सुद्धा ब्राह्मीचा उपयोग करतात, मेंदूच्या व मज्जासंस्थेच्या अनेक विकरांसाठी ब्राह्मीचा उपयोग केला जातो. स्मृतिभ्रंश होणे, पित्ताचा त्रास होत असेल तर ब्राह्मीच्या रसाचा उपयोग हा पोटातून घेण्यासाठी केला जातो. तसेच डांग्या खोकला, आवाज बसणे, मूत्रविकार आर्दीवर ब्राह्मीचा उपयोग केला जातो.

आयुर्वेदात पण ब्राह्मीचा हा उपयोग केला जातो. ब्राह्मीघृत, ब्राह्मी-सिद्ध तेल अशा प्रकारचे विविध कल्प बाजारात उपलब्ध आहेत.

विविध उपयोग :

  • ब्राह्मीच्या पानांचा रस तेल तयार करण्यासाठी वापरतात.
  • ब्राह्मीच्या पानांचा रस, वाळा, त्रिफळा, कचोरा यांचे मिळून तयार केलेले तेल डोक्याला लावल्याने केसांची वाढ ही फार छान होते.
  • तसेच हा मेंदू शांत होतो, आणि डोक्यात कोंडा होत नाही.
  • तसेच आमवातावर ब्राह्मीच्या पानांचा रस चोळावा म्हणजे वेदना कमी होतात.

इतर माहिती :
ब्राह्मीच्या पानांपासून ब्राह्मीन व हर्पेस्टिन ही तत्त्वे मिळतात. ब्राह्मी चवीला कडू व तुरट अशी असते. स्मरणशक्ती वाढविणे तसेच आयुष्य वाढविण्यासाठी ब्राह्मीचे चूर्ण मधाबरोबर अनेक दिवस घ्यावे, असे काही जणांचे म्हणणे आहे. चीनमधील ‘लीचिंगियन’ या माणसाने ब्राह्मीचे सेवन केल्याने तो सर्वसाधारणपणे दीडशे वर्षे जगला, असा उल्लेख आहे.

अश्या प्रकारे आपण येथे ब्राह्मी विषयी बऱ्याच प्रकारची माहिती पहिली.

ब्राह्मी विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ About Brahmi

Q. ब्राह्मीचे शास्त्रीय नाव काय आहे ?

उत्तर – ब्राह्मीचे शास्त्रीय नाव (हर्पेस्टिस् मोनिएर) Herpestes Monieria हे आहे.

Q. ब्राह्मीची लागवड ही कशी केली जाते ?

उत्तर – ब्राह्मी ही वनस्पती पाणथळीच्या, दलदलीच्या ठिकाणी वाढते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here