मांजर बनली सिक्युरिटी गार्ड! बिन पगारी अन फुल अधिकारी,

Cat Got a Security Guard Job in Hospital

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगात सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे, पण तरीही लोकांनी आता पुनर्जीवन सुरु केले आहे. बरेच जन आपल्या नोकरी वर परत जाताना आपल्याला दिसत आहेत, तसेच मानवी जीवनाला आत एक वेगळे वळण येताना आपल्याला दिसून येत आहे.

कोरोनाने मानव जातीला एक गोष्ट शिकविली कि माणूस सुद्धा पृथ्वीवर बाकी प्राण्यांच्या सारखा आहे, जर निसर्गाच्या मनात आले तर निसर्ग एका क्षणात सर्व नष्ट करू शकतो, मानवाने कितीही खूप प्रगती केली असेल तरी सुद्धा तो निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही, हे निसर्गाने दाखवून दिले.

कोरोनाच्या काळात बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या, अश्याच काही घटनांपैकी आजच्या लेखात आपण एक घटना पाहणार आहोत, ज्यामध्ये एक मांजर एका हॉस्पिटल ची सिक्युरिटी गार्ड बनली आहे. तर चला पाहूया..

मांजर बनली सिक्युरिटी गार्ड! बिन पगारी अन फुल अधिकारी – Cat Got a Security Guard Job in Hospital

मांजरCat Got a Security Guard Job in Hospital बनली सिक्युरिटी गार्ड! फुल पगारी अन फुल अधिकारी - Cat Got a Security Guard Job in Hospital
Cat Got a Security Guard Job in Hospital

हि घटना आहे ऑस्ट्रेलिया च्या रिचमंड शहरातील येथे एका हॉस्पिटल ने मांजरीला चक्क सिक्युरिटी गार्ड ची नोकरी दिली आहे. या हॉस्पिटल चे नाव एपवर्थ हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटल ने एका रस्त्यावरच्या मांजरीला हॉस्पिटल च्या मेन गेटवर सिक्युरिटी साठी ठेऊन घेतले आहे.

हि मांजर लोकांच एक विशेष आकर्षण बनली आहे. या मांजरीचे नाव एल्वुड आहे आणि हॉस्पिटल ने त्या मांजरीला एक आयकार्ड सुद्धा घातलेले आहे, या आयकार्ड वर त्या मांजरीचा फोटो, नाव आणि तिचे काम लिहिलेले आहे.

लोकांच या मांजराकडे एक विशेष आकर्षण बनल्याने तेथील मिडीयाने या हॉस्पिटल ला भेट दिली असता तेथील एका डॉक्टर कर्मचाऱ्यांनी याविषयी बोलताना सांगितले कि एल्वुड हे मांजर गेल्या एक वर्षा पासून हॉस्पिटल च्या आवारात राहत होते.

आवारात राहून ते इकडे तिकडे फिरत ते सगळीकडे हॉस्पिटल ला चक्कर मारायचे त्यामुळे हॉस्पिटल ने त्या मांजराला सिक्युरिटी गार्ड च्या नोकरीसाठी ठेवू घेतले. आता ते मांजर हॉस्पिटल च्या सिक्युरिटी गार्ड ची नोकरी करत आहे.

नोकरीच्या सोबतच त्या मांजराला पगाराच्या बदल्यात उत्तम जेवण दिल्या जात आणि त्या मांजरीची काळजी घेतल्या जाते.

आशा करतो आपल्याला हा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here