मांजर विषयीची माहिती

Manjar chi Mahiti

आपण विविध प्रकारचे प्राणी पाळतो. त्यांपैकी मांजर हा एक पाळीव प्राणी आहे. बर्याच जणांना मांजर पाळायला आवडते.

मांजर विषयीची माहिती – Cat Information in Marathi

Cat Information in Marathi
Cat Information in Marathi
हिंदी नाव : बिल्ली
इंग्रजी नाव : Cat

मांजराला चार पाय, दोन डोळे, दोन कान आणि एक शेपटी असते. मांजराला वरच्या ओठाच्या बाजूला मिश्या असतात. मांजराच्या अंगावर मऊ केस असतात. मांजराचे डोळे घारे असतात.

मांजर हे वेगवेगळ्या रंगांत आढळते. यात पांढरा, काळा, तपकिरी असे रंग आहेत.

मांजर हे घरी फार उपयोगी पडते; तसेच शेतकरी लोक सुद्धा मांजर पाळतात. काही लोक हौस म्हणून मांजर पाळतात. ते घरातील उंदरांचा नाश करते.

जाती :

मांजराच्या ६ जाती आहेत. द अमेरिकन बोबटेल, हिमालयन मांजर. पर्सिअन मांजर, मैने कोक, सिअमेसे मांजर ,मुंबई मांजर अश्या मांजरीच्या जाती आहेत. त्यात रानटी मांजर, खवले मांजर, पाळीव मांजर अशा प्रकारची मांजरे आढळतात.

मांजरीचे अन्न – Cat Food

मांजराला दूध सर्वात जास्त आवडते. तसेच उंदीर हे त्याचे आवडते खाद्य आहे. तसेच छोटे पक्षी सुद्धा ते खातात. त्याला पाव, बिस्किटे पण आवडतात. हा मांसाहारी प्राणी आहे.

सर्वसाधारणपणे सशक्त मांजर ५ ते १० किलोग्रॅमपर्यंत वजनाचे आढळून येते.

वयोमर्यादा : मांजर किमान १२ ते १४ वर्षेपर्यंत जगू शकते.

इतर माहिती : मांजराची नजर फार तीक्ष्ण असते. त्यामुळे ते आपली शिकार झडप घालून लगेच पकडते. मांजरीचे दात विषारी राहतात. मांजरातील नर जातीला ‘बोका’ आणि मादीला ‘मांजर’ म्हणतात. मांजराचे पाय हे फार मऊ असतात. मांजर घरोघरी हिंडते. दुधाचे भांडे दिसले की त्यावर डल्ला मारते. मांजर खुशीत आल्यावर घशातून गुरगुरल्यासारखा बारीक आवाज काढते.

मांजर हे जोरजोरात गुरकावून, कण्हल्यासारखे किंवा ठराविक प्रकारचे आवाज काढून ते आपल्या भावना व्यक्त करते. रात्रीच्या वेळी मोटारीच्या दिव्यांचा प्रकाश मांजराच्या डोळ्यांवर पडल्यास त्याचे डोळे चमकतात कारण त्याच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचे स्फटिकासारखे आवरण असल्याने प्रकाश परावर्तित होऊन त्याचे डोळे चकाकल्यासारखे वाटते. त्यामुळे या प्राण्यास रात्रीच्या काळोखातही दिसूशकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here