Cheetah chi Mahiti
जंगलात वाघ, सिंह यांसारखा शक्तिशाली प्राणी म्हणजे चित्ता होय.
चित्ता प्राणी माहिती मराठी – Cheetah Information in Marathi
हिंदी नाव : | चित्ता |
इंग्रजी नाव : | Cheetah |
चित्ताप्राणी साधारणपणे सहा-सात फूट लांबीचा असतो. त्याचा रंग पिवळसर लाल असतो. अंगावर काळे भरीव ठिपके असतात. चित्त्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान व एक शेपटी असते. चित्त्याचे डोके लहान असते. डोळे मोठे व बटबटीत असतात.
चित्ता चे खाद्य – Cheetah Food
चित्ता पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. हरिण, शेळी, लांडगा व माकड या प्राण्यांचे मांस चित्त्याला आवडते.
चित्त्याच्या तोंडावर डोळ्यापासून ओठांपर्यंत दोन्ही बाजूला एक काळी रेघ असते. चित्त्याचे पाय लांब व सडसडीत असतात. हा प्राणी अंगाने कमी जाडीचा असतो.
वैशिष्ट्य :
चित्ता शिकार मिळविण्यासाठी सर्वात वेगाने म्हणजे ताशी ११० ते ११३ किलोमीटर वेगाने धावू शकतो. तसेच चित्ता झाडाच्या शेंड्यापर्यंत चढू शकतो.
या प्राण्याची मादी एका वेळेस ३ ते ४ पिलांना जन्म देते तिचा गर्भधारणेचा काळ साधारणपणे ३ महिने असू शकतो.
चित्ता हा प्राणी असेल तेव्हा प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खातो कधी तर हौसेखातरसुद्धा प्राण्यांची शिकार करतो
श्री राजे-महाराजे चित्त्याला शिकारीचे शिक्षण देत असत आणि शिकारीला जाताना त्याला बरोबर घेऊन जात असत.
भारत आणि इराण यांसारख्या देशांत शिकारी लोक शिकारीसाठी चित्त्याचा उपयोग करतात. त्यामुळेच चित्ता हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या चित्ता हा प्राणी आफ्रिकेमध्येच आढळून येतो.