• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

श्रापित असलेल्या गावाची एक अनोखी गोष्ट..

Churu History in Marathi

पुरातन कथांमध्ये आपण अनेकदा पाहतो कि एखादी व्यक्ती राग आल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला श्राप द्यायची. आणि तो श्राप त्या व्यक्तीला अनेक दिवस सहन करावा लागत होता. अश्या अनेक कथा आपण ऐकत किंवा वाचत असतो.

पण या कथांमध्ये किती प्रमाणात सत्यता असते हे आपल्याला अजूनही माहिती नाही, आज सगळीकडे जगात अनेक मजली इमारती बनताना दिसतात, म्हणजे जगात सगळीकडे एका प्रकारची प्रगती होताना दिसते आहे.

पण एकीकडे आपल्या देशात अजूनही एक गाव असे आहे, जेथे अनेक मजली इमारत तर दूरच तेथे एकाही घरावर दुसरा मजला बांधला जात नाही, यामागे काय कारण असेल ते आपण आजच्या लेखात पाहणार आहे.

कि कशामुळे या गावात घरावर दुसरा मजला बांधल्या जात नाही, तर चला आजच्या लेखात आपण पाहूया कि असे कोणते गाव आहे ज्या गावाला एक श्राप मिळाला आहे, कि घरावर दुसरा मजला बांधला तर…

एका श्रापित गावाची गोष्ट, घरावर दुसरा मजला बांधला तर.. – Churu History in Marathi

Churu History
Churu History

हे गाव राजस्थान च्या चुरू जिल्ह्यामधील सरदार शहर तालूक्यातील उडसर हे गाव आहे, हेच ते गाव आहे जे ७०० वर्षापूर्वीचा श्राप आजही भोगत आहेत. या गावात कोणीही दुसरा मजला बांधलेला नाही, येथे कोणत्याही प्रकारच्या भूकंपाचा धोका नाही आणि नाही कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा,

तरीही येथील लोक स्वतःच्या घरावर दुसरा मजला बांधताना आपल्याला दिसत नाहीत, यामागे एका जुन्या काळातील कथा आहे जी ७०० वर्षापूर्वीची जुनी आहे. तेव्हा मिळालेल्या एका श्रापापासून हे गाव श्रापित झालेले आहे, असे येथील लोकांची मान्यता आहे.

हे गाव सरदार शहर तालुक्यापासून ६ किलोमीटर अंतरावर आहे. परंतु या गावापासून आजपर्यंत १२ नवीन गावांची निर्मिती झालेली आहे. बरेच लोक या गावाला सोडून गेल्याचे तेथील काही लोक सांगतात.

काय आहे हा श्राप?

उडसर या गावाला एक श्राप लाभलेला आहे, तो श्राप या गावाला ७०० वर्षापूर्वी मिळाला होता. तर या श्रापामागे एक वेगळी गोष्ट आहे, ते आपण आता पाहूया.
या गावचे लोक या श्रापामागील गोष्ट सांगतात,ते ऐकण्यासारखी आहे, या गावात ७०० वर्षापूर्वी भोमिया नावाचा एक व्यक्ती राहत होता, ज्याला गाईंशी एक विशेष प्रेम होत, आणि जवळच त्याची सासुरवाडी होती,

एक दिवस त्या गावात चोर आले आणि त्यांनी गाईंना चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्या गावातील भोमिया नावाच्या व्यक्तीने त्या चोरांना रोखायला त्यांच्याशी दोन हाथ करायचे प्रयत्न केले,

परंतु त्यांच्या सोबत झालेल्या या भीषण हातापायी नंतर भोमिया ने त्यांचा विरोध केला, परंतु त्याला ते जमले नाही, त्या चोरांनी त्याला खूप मारले पण त्यांच्या मारा पासून वाचण्यासाठी तो त्याच्या गावच्या जवळ असलेल्या सासुरवाडीला गेला आणि तेथे त्यांच्या घरी गेल्यावर त्याने त्यांना सांगितले.

कि कोणीही आल्यावर त्यांना सांगू नका कि मी वरच्या मजल्यावर आहे, आणि तो वरच्या मजल्यावर लपून बसला. काही वेळानंतर तेथे चोर आले आणि त्यांनी त्याच्या सासुरवाडीच्या घरच्या लोकांना मारले आणि त्यांच्या जवळून भोमिया विषयी माहिती करून घेतले,

जेव्हा त्यांना माहिती झाले कि भोमिया वरच्या मजल्यावर लपून बसला आहे, तेव्हा त्यांनी त्याला वरच्या मजल्यावरून खाली ओढत आणले आणि त्याला घराच्या बाहेर घेऊन जाऊन खूप मार दिला, आणि त्यांनी त्याचा गळा कापला,

पण तरीही भोमिया ने स्वतःचे डोके आपल्या हाती घेऊन आपल्या गावाकडे गेला आणि तो त्याच्या गावाजवळ जाऊन मरण पावला. याचदरम्यान त्या चोरांशी लढता लढता त्याचा मुलगा सुद्धा मरण पावला,

सर्व गाव तेथे जमले होते जेव्हा हि गोष्ट त्याच्या बायकोला माहिती झाली तेव्हा त्याची बायको तेथे आली, आणि स्वतःच्या नवऱ्याची अशी अवस्था पाहून तिने रागात येऊन एक श्राप दिला,

कि आजच्या नंतर गावात कोणीही दुसरा मजला बांधणार नाही. आणि त्याच्यानंतर ती विधवा बनून जाते.

दुसरा मजला बांधला तर…

काही गावकऱ्यांचे असे मत आहे कि हा श्राप तिने यासाठी दिला कि दुसरा मजला नसेलच तर कोणाला लपवता येणारच नाही आणि लपवायचा प्रश्न आलाच तर त्यांच्या सोबतच लपवावे लागेल.

या श्रापापासून तेथे कोणीही दुसरा मजला बांधलेला नाही, आणि या गोष्टीला नाकारून काही लोकांनी दुसरा मजला बांधला तर त्यांच्या घरातील स्त्री मरण पावली, आणि दुसऱ्याचा तर संपूर्ण परिवार नष्ट झाला,

असे नाही कि त्या गावात सुशिक्षित लोक राहत नाहीत, पण तेही या गोष्टीला मानतात आणि विशेष म्हणजे ते या गोष्टीला एक परंपरा म्हणून पाहतात, आणि त्या परंपरेला कोणीही तोडू नये यासाठी तेही या गोष्टीला मानतात.

ज्या ठिकाणी भोमिया नावाची व्यक्ती मरण पावली होती त्या ठिकाणी गावत एक मंदिर बांधले गेले आहे, आणि या मंदिरात दररोज आरती केल्या जाते, सोबतच या मंदिरावर लोकांची श्रद्धा आहे.

याचसोबत या गावाच्या २ किलोमीटर च्या अंतरावर भोमिया च्या पत्नीचे मंदिर आहे जे सती देवीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाते. या मंदिरात दूरदुरून लोक दर्शनासाठी येतात, आणि या मंदिरात बांबूने बनलेल्या झाडूला चढविल्या जाते. येथे आलेल्या अनेक भक्तांची इच्छा पूर्ण होते असे त्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या गावाला जो श्राप मिळालेला आहे त्या गावातील लोकांनी मिळालेल्या श्रापाला त्यांनी श्राप न म्हणता परंपरा म्हणून संबोधले आहे, हे वाचून बरेचश्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, पण आपल्या भारतात असेही बरेचशे ठिकाण आहेत त्यापैकी हे एक ठिकाण आहे,

कोणाच्याही श्रद्धेला दुखावणे हा आमचा उद्देश नसून लोकांपर्यंत खरीखुरी माहिती पोहोचविण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. या ठिकाणच्या घटनांबाबत आम्ही आपल्याला कोणताही निर्वाळा देऊ शकत नाही.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

महाराणी ताराबाई माहिती
Marathi History

महाराणी ताराबाई माहिती

Maharani Tarabai Marathi Mahiti छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्येक मराठी माणसाला दाखवले आणि ते...

by Editorial team
May 16, 2022
घनगड किल्ला माहिती
Forts

घनगड किल्ला माहिती

Ghangad Fort जर तुम्ही ट्रेकिंगचे चाहते असाल तर तुम्ही एकदातरी भेट द्यावी असा हा किल्ला आणि त्या किल्ल्याचे नाव आहे...

by Editorial team
May 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved