या श्रापामुळे रावणाचा वध प्रभू श्रीराम यांच्या हातून झाला! जाणून घ्या या लेखातून.

Ramayana Short Story

आजपासून हजारो वर्षांपूर्वी इतिहासात घडलेल्या घटनांचे व्यवस्तीत रित्या संग्रह केलेला आपल्याला आजही आढळून येतो. वाल्मिकी रामायणाचे त्या काळातील संतांनी आप आपल्या भाषेत अनुवादन केलेले आढळते. रामायणात भगवान श्रीराम यांच्या जन्मापासून तर निर्गमनापर्यंत सर्व माहिती दिली गेली आहे. आपल्याला रामायणात पाहायला मिळते की सूर्यवंशी कुळातील राजा दशरथ यांना तीन पत्नींपासून चार पुत्ररत्न प्राप्त होतात. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि समोरील रामायण आपल्याला माहितीच आहे.

पण आजच्या लेखात आपण रामायणातील काही विशेष घटनांवर लक्ष केंद्रित करणार आहोत जसे दशानन रावणाचा वध हा प्रभू श्रीराम यांच्या हातूनच का झाला? यामागे काही तरी कारण असेल का ? तर चला आजच्या लेखात आपण त्यामागचं कारण पाहूया की रावणाची मृत्यु ही प्रभू श्रीराम यांच्या हातूनच का झाली ?

प्रभू श्रीरामांच्या हातून रावणाचा वध का झाला – Ramayana Story in Marathi

Ramayana Story in Marathi
Ramayana Story in Marathi

ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा प्रभू श्रीराम यांचा जन्मही झालेला नव्हता, आणि रावणाने पूर्ण धर्तीवर आपले साम्राज्य पसरविण्यासाठी अनेक राजांवर आक्रमण करत बरेचसे राज्य काबीज केले होते, रावणाला त्याच्या शक्तींचा गर्व झालेला होता, युद्ध करत करत तो सूर्यवंशी कुळात आला त्याकाळचे सूर्यवंशी राजा अनरण्य होते.

त्यांनी रावणाशी युध्द केले आणि रावणाशी ते त्या युध्दामध्ये पराजित झाले आणि ते स्वतःच्या प्राणाला मुकले परंतु मरणाच्या आधी त्यांनी रावणाला श्राप दिला, की आज माझा वध तुझ्या हातून झाला परंतु भविष्यात तुझ्याही वध माझ्याच कुळातील व्यक्ती करेल. असा श्राप त्यांनी रावणाला देऊन ते मरण पावले.

त्यांनंतर रघुवंशात विष्णूचा अवतार मानले जाणारे प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला, त्यांनी गुरुकुलात शिक्षा प्राप्त केली, आपल्या तरुणवयातच अनेक राक्षसांचा वध केला, सितास्वयंवरा मध्ये आपले चातुर्य आणि बल दाखवून त्यांनी शिवधनुष्य मोडला, माता सीतेशी विवाह केला, आणि त्यानंतर अयोध्येला आले काही दिवसांनंतर माता कैकयीच्या दासी मंथरेने कैकयी मातेच्या मनात पुत्रमोहाचे विष घातले आणि प्रभू श्रीरामांना १४ वर्ष वनवास आणि भरताला सिंहासन मागत राजा दशरथ यांच्याकडे आपले राहिलेले दोन वर मागितले, त्यांनंतर प्रभू श्रीरामांनी पित्याच्या शब्दांचे पालन करत वनवास स्विकारला आणि १४ वर्षांसाठी वनवासात निघून गेले. त्यांनंतर नियतीचे चक्र फिरत गेले आणि रावणाला कुबुद्धि सुचली आणि माता सीतेचे  त्याने अपहरण करून लंकेला घेऊन गेला.

त्यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण दोघांनी मिळून सीता मातेला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तेव्हा त्यांना ते शक्य झाले नाही, मग प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना वानर सेनेचा पाठिंबा मिळाला आणि सीता मातेचा शोध सुरू झाला, आणि तो शोध पूर्णत्वास आणला पवनपुत्र हनुमान यांनी मग नल, निल जमुवंत अंगत यांच्या मदतीने लंकेला जाण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात आली आणि त्यानंतर युध्दाला सुरुवात झाली बरेच पराक्रमी योध्दा त्या युध्दामध्ये मारल्या गेले, आणि शेवटी वेळ आली होती ती  स्वतः लंकापती रावण आणि प्रभू श्रीराम यांच्यात युद्ध करण्याची आणि हे युध्द करतांना रावणाचा सुध्दा बाकी  राक्षसांप्रमाणेकच वध झाला. तर रघुवंशाच्या त्या राजाच्या श्रापामुळे दशानन रावणाचा अश्या प्रकारे प्रभू श्रीराम याच्या हातून वध झाला.

तर आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top