हनुमानजयंती विषयी माहिती मराठीमध्ये

Hanuman Jayanti

प्रभु रामचंद्राचा सेवक. दास्यभक्तीकरता सदैव तत्पर, रामायणातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे रामभक्त हनुमान होय!

प्रभु रामचंद्राच्या आदेशाला आज्ञा प्रमाण मानत समुद्र उल्लंघुन लंकेकडे कुच करणारा हनुमान दास्यभक्तीचे एक अत्युत्तम उदाहरण होय. रावणाने शेपटीला आग लावल्यानंतर संपुर्ण लंकेला क्षणार्धात आपल्या शेपटीने आगीच्या भक्ष्यस्थानी नेणारा हनुमानच होता.

युध्दादरम्यान लक्ष्मणाला मूर्च्छा आल्यानंतर त्याचे प्राण केवळ संजिवनी बुटीने वाचणार होते आणि ही संजीवनी आणण्याकरता निवडला गेला तो हनुमान. आणि बुटीकरता संपुर्ण द्रोणागिरी उचलुन आणत लक्ष्मणाचे प्राण वाचवले तो हनुमंत!

समुद्र पार करण्यात हनुमानाने प्रभु रामचंद्रांची मदत केल्याचे देखील पुराणात सांगीतले आहे. हनुमानाचा उल्लेख महाभारतात देखील आढळतो. कुरूक्षेत्रावर युध्दादरम्यान तो अर्जृनाच्या ध्वजावर बसलेला आहे.

हनुमान हा चिरंजीव असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता आहे. जेथे जेथे प्रभु रामचंद्राचे नाव घेतल्या जाते त्या ठिकाणी सर्वात आधी येणारा हनुमंत असतो असे मानले जाते.

हनुमानाला मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महाविर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अश्या अनेक नावाने संबोधले जाते त्याचे शस्त्र  गदा हे आहे. हनुमंताला मारूती म्हणण्याची पध्दत केवळ महाराष्ट्रातच आढळते. हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुलं पानं अर्पण करण्याची परंपरा आहे. त्याच्यासमोर नारळ देखील फोडले जाते.

हनुमानाला भगवान महादेवाचा अवतार देखील मानल्या जाते. कलियुगात संकटाचे हरण करणारा म्हणुन एकमेव हनुमंत असल्याचे देखील मानल्या जाते.

हनुमानजयंती विषयी माहिती मराठीमध्ये – Hanuman Jayanti Information in Marathi

Hanuman Jayanti Information in Marathi

हनुमानाचा जन्म आणि पौराणिक कथा – Hanuman Story in Marathi 

हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला आहे हनुमानाचे वडिल केसरी हे होते. लहानपणापासुनच त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या. एकदा सुर्याकडे आकर्षीत होऊन त्याला गिळण्याकरता हनुमानाने सुर्याकडे कुच केले इंद्रदेवांसह सर्व देव भयभीत झाले.

इंद्रदेवाने सुर्याला आणि पृथ्वीला वाचवण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले त्यामुळे हनुमंत मुर्चीत झाले, त्यांनतर पवनदेवाने सर्व सृष्टीतील वायू ओढून घेतला त्यामुळे प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आले त्यांनतर सर्व देवतांनी हनुमानाला मुर्चीतेतून बाहेर आणले, त्यांनंतर पवन देव शांत होऊन सुरवातीसारखे वायू पर्यावरणात सोडले, तसेच तेव्हा हनुमानाला सर्व देवतांनी आशिर्वाद देत काही शक्ती प्रदान केल्या.

एक दिवस खेळते वेळी हनुमानाने एका ऋषींचा परिहास केला त्यामुळे त्याला शाप दिला ’तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल’.

पुढे प्रभु श्रीरामचंद्र वनवासात असतांना त्यांची आणि हनुमंताची भेट झाली.

हनुमानाने प्रभु रामचंद्राना वनवासात आणि युध्दादरम्यान फार मदत केली. हनुमंताच्या आणि वानरसेनेच्या बळावरच रामाने रावणाशी युध्द केले आणि जिंकले देखील.

हनुमान जयंती – Hanuman Jayanti

रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला असल्याने त्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. (संपुर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथी बद्दल अनेक मत मतांतरे आहेत) हनुमानाचा जन्म पहाटे सुर्य उगवतांना झाला असल्याने उगवत्या सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो.

मारूतीचा जन्म अगदी सुर्योदयाच्या वेळेचा असल्याने त्याच्या जन्माचे किर्तन सुर्योदयापुर्वीच सुरू होते.

मारूतीचा जन्म झाल्यानंतर किर्तनाचे समापन केल्या जाते आणि त्यानंतर आरती आणि प्रसादाचं वितरण होतं. गुळ फुटाण्याचा प्रसाद यावेळी वाटला जातो.

हनुमान जयंतीला ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरण केले जाते. मोठमोठे भंडारे या दरम्यान आयोजित करण्यात येतात.

संपुर्ण भारतात अनेक ठिकाणी हनुमानाच्या मोठमोठया मुर्ती स्थापीत केल्या आहेत.

महाराष्ट्रातील विदर्भात नांदुरा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर १०५ फुट उंच हनुमानाची मुर्ती स्थापीत केली आहे. या मुर्तीला पाहाण्याकरता दुरदुरून भाविक येत असतात.

समर्थ रामदास स्वामींनी अवघ्या महाराष्ट्रभर मारूतीरायाच्या मुर्तींची स्थापना केली आहे.

समर्थ रामदास स्वामी म्हणतात सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे

हनुमान या देवतेविषयी महत्वाच्या गोष्टी –  About God Hanuman

  • हनुमंत चिरंजीवी असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची भाविकांमधे मान्यता आहे.
  • हनुमानाला लावण्यात येणारा शेंदुर अत्यंत पवित्र मानला जात असुन भाविक त्या शेंदुराला आपल्या मस्तकावर धारण करतात.
  • शरीर सौष्ठव कमविण्याची आवड असणार्यांनी हनुमंताची आराधना करावी असे मानले जाते.
  • हनुमान चालिसा म्हणणार्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते.
  • साडे साती असतांना दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारूतीचे दर्शन घ्यावे.
  • हनुमानामधे बलतत्वाचा संचार असल्याने स्त्रियांनी त्याचे दर्शन दुरून घ्यावे अशी देखील एक मान्यता आहे.
  • हिंदु मान्यतेनुसार हनुमंताला शक्ति स्फुर्ति आणि ऊर्जेचे प्रतिक मानण्यात आले आहे.

तर कसा वाटला आजचा लेख आम्हाला अवश्य कळवा.

आपल्याला आमचा लेख आवडल्यास याला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरु नका, आणि या लेखावर आपला अभिप्राय द्यायला सुद्धा विसरू नका.

Thank You!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here