महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग – Mahakaleshwar Temple History हिंदू धर्मीय महादेव भगवान शिवाच्या मंदिरापैकी एक आहे तर भगवान शिवाच्या प्रमुख बारा ज्योतिर्लिंग मधील एक आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग  भगवान शिवाचे सर्वात पवित्र स्थान हि मानले जाते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेश येथील उज्जैन येथे स्थापित आहे.

महाकालेश्वर मंदिर रुद्र सागर सरोवराच्या किनारी आहे. असे म्हटले जाते कि अधिष्ठ देवता भगवान शीव स्वतः या लिंगात स्वयंभू रुपात स्थापित आहेत त्यामुळे यास फार महत्व प्राप्त आहे.

Mahakaleshwar Temple History

महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास – Mahakaleshwar Temple History in Marathi

वर्तमान मंदिर श्रीमंत पेशवा बाजीराव आणि शाहू महाराजांचे सेनाप्रमुख रानाजीराव शिंदे यांनी १७३६ मध्ये बनविण्यास लावले. नंतर च्या काळात त्यांच्या पुत्राने म्हणजेच महादजी शिंदे यांनी वेळोवेळी याच्यात उचित बदल व दुरुस्ती केली.

१८८६ पर्यंत ग्वालियर चे शिंदे घराण्याच्या अनेक धार्मिक विधी येथेच संपन्न व्हायच्या. शिंदे घराणे आज सिंधिया घराणे म्हणून ओळखले जाते.

महाकालेश्वर मंदिर

महाकालेश्वर मंदिर मधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखले जाते. कारण ती दक्षिण मुखी मूर्ती आहे. परंपरेनुसार महाकालेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. व सर्वात जास्त आस्थेचे मानले जाते.

येथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत. दक्षिन दिशेस प्रिय नांदी स्थापित केले आहे. असे म्हटले जाते कि, येथे बनविलेले नागचंद्रेश्वर मंदिर चे कपाट फक्त नागपंचमीस उघडले जातात.

महाकालेश्वर मंदिर एका विशाल बागीच्याच्या मध्यभागी आहे. हे मंदिर पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे. या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे.

याच्या भिंतीवर पितळी दिवे स्थापित केले आहेत. येथे सोमवारी भक्तांची फार गर्दी असते. दररोज विधिवत पूजा केली जाते. महाकालेश्वर लिंगास सजवले जाते. नित्य नियमाने प्रसादाचे वाटप होते.

येथे महाशिवरात्रीस एका मोठ्या महोत्सवाचे रूप पाहायला मिळते. या मंदिराच्या प्रांगणात स्वप्नेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. येथे महाकाल रुपी भगवान शंकरांची पूजा केली जाते.

अशी मान्यता आहे कि येथे पूजा केल्यास आपले स्वप्न पूर्ण होते. हे एक सदाशिव मंदिर आहे. येथे भक्त मोठ्या भक्ती भावाने स्वप्नेश्वरांची पूजा करतात. असे म्हटले जाते कि येथे माता स्वप्नेश्वरींचा हि वास आहे. त्यामुळे माता भगिनी आपल्या मनोकामनाचे साकडे. त्यांच्या कडे घालतात.

महाकालेश्वर मंदिर सकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत खुले राहते.

शक्तीपिठामध्ये १८ शक्तीपीठांपैकी हे एक मानले जाते. येथे मनुष्याच्या शरीरास आंतरिक शक्ती मिळते.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग

शिव पुराणानुसार एकदा त्रिदेव ब्रम्हा,विष्णू आणि महादेव यांच्यात चर्चा सुरु होती. तेव्हा भगवान शंकराच्या मनात ब्रम्हदेव आणि महादेव यांची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी त्या दोघांना प्रकाशाचा अंत कोठे आहे. हे शोधन्यास सांगितले.

ब्रम्हा व विष्णू दोघांसाठी शिवांनी एक मोठा स्तंभ उभारला ज्याचा अंत कोठे होतो दिसेना. दोघेही त्या स्तंभाचे टोक शोधू लागले. पण तो सापडे ना श्रीविष्णू थकले व आपली हर मान्य केली तर ब्रम्हा खोट बोलले कि त्यांना त्याचे टोक सापडले.

यावरून क्रोधीत होवून शिवांनी त्यांना श्राप दिला कि लोक तुमची पूजा कधीच करणार नाही तर विष्णूचि सर्वच पूजा करतील. तेव्हा क्षमा मागत ब्रम्हानी शिवाची विनवणी केली तेव्हा या स्तंभात शिव स्वतः विराजमान झाले.

हे स्तंभ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मानले जाते. स्तंभाचे रुपांतर लिंगात झाले तेव्हा पासून या ज्योतिर्लिंगास खास महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख १२ ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर सर्वात पवित्र मानले जाते.

शिवाचे १२ ज्योतिर्लिंग

  1. गुजरात येथील सोमनाथ
  2. आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन
  3. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर
  4. मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर
  5. हिमालयातील केदारनाथ
  6. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील विश्वनाथ
  7. महाराष्ट्रात भीमाशंकर
  8. झारखंड येथील देवगढ चे वैद्यनाथ
  9. हिमाचल प्रदेशातील बैजनाथ
  10. गुजरात येथील द्वारकाचे नागेश्वर
  11. तामिळनाडू येथील रामेश्वरम चे रामेश्वर
  12. महाराष्ट्रातील औरंगाबाद चे घ्रीशनेश्वर

भारत स्वातंत्र्यानंतर महाकालेश्वर मंदिर उज्जैन महानगरपालिका च्या अधिपत्यात आहे. येथे नक्कीच येवून शांततेचा अनुभव घ्या.

Read Also –

Nalanda History

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा महाकालेश्वर ज्योतिर्लिंग चा इतिहास / Mahakaleshwar Temple History in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट : Mahakaleshwar Temple History महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास  या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top