सौंदर्याच्या मोहात पाडून करून घ्यायची हि कामे. कोण आहे हि स्त्री

Cleopatra

इतिहास असा विषय आहे जो बऱ्याच जणांचा आवडता विषय असतो त्यांना इतिहासात झालेल्या घटना वाचायला आणि ऐकायला आवडतात, हा लेख त्या व्यक्तींसाठीच आहे जे इतिहासात रुची ठेवतात व त्यांना जुन्या गोष्टी वाचायला आवडतात,

आजच्या लेखात आपण एका अश्या स्त्री विषयी माहिती पाहणार आहोत जी स्वतःच्या बुद्धीच्या भरवशावर आणि आपल्या कुशलतेने राजांना आपल्या मोहात पाडून किती मोठ्या गोष्टींची पूर्तता करून घ्यायची.

हे सर्व करून घेणारी हि स्त्री कोण होती? आणि या सर्व गोष्टी ती का करायची या विषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया, तर चला पाहूया या स्त्री ला जिने राजांना आपल्या मोहात पाडले आणि आणखी काय काय केले.

Cleopatra
Cleopatra

राजांना आपल्या सौंदर्याच्या मोहात पाडून अनेक कामे सार्थकी लावणारी हि इतिहासातील इजिप्त ची राजकुमारी क्लियोपेट्रा होती, आजपर्यंत जर कोणत्या राणीविषयी एवढे लिहिल्या गेले असेल तर ती इजिप्त ची शेवटची राणी क्लियोपेट्रा.

क्लियोपेट्रा राणी दिसायला सुंदर बुद्धीने चतुर आणि षड्यंत्र रचण्यात हुशार असलेली इजिप्त ची राजकुमारी होती, क्लियोपेट्रा ला एकूण ९ भाषांच ज्ञान होत. याच राजकुमारीला दोन भाऊ होते त्यापैकी एकाचे नाव होते टॉलेमी दियोनिसस.

राजकुमारी क्लियोपेट्रा च्या वडिलांचे निधन झाले तेव्हा राजकुमारी १४ वर्षाची होती. वडिलांच्या निधानंतर क्लियोपेट्रा आणि राजकुमारीच्या भावाला त्यांचे राज्य संयुक्त पणे मिळाले, पण तिच्या भावाला क्लियोपेट्रा ने राज्य सांभाळणे योग्य वाटत नव्हते, त्याला ते सहन झाले नाही आणि त्याने क्लियोपेट्रा च्या विरुद्ध बंड पुकारला.

भावालाच नाही तर त्या राज्याच्या लोकांना सुद्धा क्लियोपेट्रा च्या हाती राज्य असलेले आवडले नाही आणि त्यांनी सर्वांनी तिच्या भावाची साथ दिली या सर्व गोष्टींना पाहून क्लियोपेट्रा तिचे राज्य सोडून सिरीया ला आली, एवढे सारे होऊन सुद्धा क्लियोपेट्रा ला जराही फरक पडला नाही ती डगमगली नाही

सौंदर्याच्या मोहात पाडणे सुरु केले:

तिला कशाही प्रकारे स्वतःचे राज्य परत मिळवायचे होते. या उद्देशाने तिने रोम गाठले, रोम चा तेव्हाचा राजा होता, जूलियस सीज़र. रोम च्या राजाला तिने आपल्या सौंदर्याच्या मोहात पाडले, तेच त्याने तिला पाहून मदत करण्याचे आश्वासन दिले.
पाहता पाहता काही दिवसांनी जूलियस सीज़र ने इजिप्त च्या क्लियोपेट्रा च्या भावाच्या राज्यावर आक्रमण केले, तिच्या भावला मारून क्लियोपेट्रा ला तेथील सिंहासनावर बसविले,

काही दिवसांचा कालावधी निघून गेला आणि पुन्हा इजिप्त मध्ये तिच्या राज्यात लहान भावाशी भांडणे सुरु झाली तेव्हा क्लियोपेट्रा ने आपल्या लहान भावाला विष दिले आणि त्याला मारून टाकले.

इजिप्त मध्ये आता तिचे कोणीही जवळच नव्हत म्हणून ती इजिप्त सोडून रोम मध्ये सीजर जवळ राहायला आली. त्यानंतर हे सर्व इजिप्त च्या लोकांना आवडले नाही, आणि त्यांनी सीजर ची हत्या करून टाकली.

सीजर च्या हत्तेनंतर क्लियोपेट्रा ला सीजर च्या मार्क एंटनी सोबत प्रेम झाले, त्यांनी विवाह करण्याचे सुद्धा ठरविले पण रोम च्या लोकांना ते मान्य नव्हते, कारण एका इजिप्त च्या स्त्री ने रोम वर राज्य करावे हे कोणालाही सहन होत नव्हते म्हणून एका युद्धाच्या दरम्यान तेथील काही मंत्र्यांनी मार्क एंटनी ला सांगितले कि क्लियोपेट्रा मरण पावली,

सत्य पाहता हे हि गोष्ट खरी नव्हती, हे ऐकून मार्क एंटनीला धक्का बसला आणि तो युद्धात स्वतःच्याच तलवारीने मारल्या गेला. या युद्धानंतर इजिप्त आणि रोम चे साम्राज्य ऑक्टेवियस ने सांभाळले. ऑक्टेवियस एक चतुर राजा होता, क्लियोपेट्रा त्याला आपल्या जाळ्यात फसवू शकली नाही.

क्लियोपेट्रा चे प्रेम:

क्लियोपेट्रा चे अनेक राजा मंत्री यांच्या सोबत संबंध होते, पण तिला मार्क एंटनी सोबत खर प्रेम झाले होते, जेव्हा तिला मार्क एंटनी विषयी माहिती झाले तेव्हा तिने ऑक्टेवियस ला एक पत्र लिहिले होते, पत्रात तिने लिहिले होते, कि मला माझी शेवटची झोप एंटनी सोबत घ्यायची इच्छा आहे,

हे पत्र वाचल्या नंतर लगेच ऑक्टेवियस ने आपले सैनिक क्लियोपेट्रा कडे पाठविले पण तेव्हा खूप उशीर झाला होता,

क्लियोपेट्रा ने अगोदरच्या दिवशी दुधाने अंघोळ करून केली, सोन्याचे दागिने अंगावर घातले आणि तिच्या जवळ असलेल्या पेटीतून तिने एक साप काढला आणि त्या सापाला आपल्या अंगावर खेळवत तिने तिच्या डाव्या स्तनाला स्वतः त्या सापाला लावले आणि त्या सापाने तिला चावून तिचे प्राण घेतले,

शेकडो पुरुषांना आपल्या सौंदर्याने मोहित करणारी, आणि जिच्या देहाची लालसा अनेक पुरुषांना असणारी क्लियोपेट्रा एका सापाच्या दंशाने मरण पावली. क्लियोपेट्राच्या मरणाविषयी बरेचश्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. काही कथांमध्ये तिच्या मृत्यूचे कारण असे सांगितले आहे. कि ऑक्टेवियस ने तिला एका प्राण्याचे खाद्य म्हणून सोडून दिले होते.

क्लियोपेट्रा च्या जीवनावर बरेचश्या लेखकांनी लिहिले आहे, त्यामध्ये शेक्सपियर सारखे लेखक सुद्धा समाविष्ट आहेत.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here