भारतातील एक आगळे वेगळे मंदिर जिथे लोक चढवतात प्रसादाच्या जागी घड्याळे

Clock Temple in Jaunpur UP

लेखाचे शीर्षक वाचल्यावर आपण थोडेसे गोंधळून गेले असणार की भारतात कुठे असेही होते का? तर हो आपण योग्य वाचले आहे. भारतात जेवढे सुध्दा मंदिरे असतील त्या ठिकाणी प्रसाद म्हणून आपल्याला नारळ, पेढे, मिठाई, साखर किंवा आणखी काही पदार्थ पाहायला मिळतात ज्याने आपले तोंड गोड होईल आणि आपण त्याला प्रसाद म्हणून खाऊ शकू. आणि हाच प्रसाद मंदिरातील देवी- देवतांना अर्पण केल्या जातो. जेणेकरून त्यामुळे आपल्यावर देवाची कृपा होईल, पण आपल्या भारतात एक आगळे वेगळे मंदिर आपल्याला पाहायला मिळते, ज्या मंदिरात देवाला फुल, फळ, किंवा पेढे या सर्व गोष्टींना प्रसाद म्हणून चढवल्या जात नाही, तर येथे काही वेगळेच होते.

वेगळे म्हणजे तेथे मंदिरात देवाला आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी घड्याळ अर्पण केल्या जाते. तर आजच्या लेखात आपल्याला आम्ही या मंदिराविषयी माहिती सांगणार आहोत, सोबतच या मंदिरात ही आगळी वेगळी प्रथा कशी सुरू झाली या मागचे कारण सुध्दा सांगणार आहोत, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडणार. तर चला पाहूया.

या मंदिरात देवाला चढविल्या जातात घड्याळे – Bramhma baba’s Temple Where People Offer Clock to God

Clock Temple in Jaunpur UP
Clock Temple in Jaunpur UP

तर ही गोष्ट आहे भगवान काशी विश्वनाथ च्या वाराणसी पासून ७० किलोमीटर लांब असलेल्या जौनपूर मधील एका मंदिराची. हे मंदिर येथील ग्राम दैवतावचे आहे. म्हणजेच तेथील आजूबाजूचे लोक या मंदिरातील देवावर असीम श्रद्धा ठेवतात. या मंदिरात असलेल्या देवाला तेथील स्थानीय नागरिक ब्रह्म बाबा च्या नावाने ओळखतात.

हे तेच मंदिर आहे जेथे गेल्या ३० वर्षांपासून फक्त घड्याळे चढवल्या जातात. आणि येथे घड्याळ चढविण्याची प्रथा पडल्या मुळे या मंदिराला घडी बाबा मंदिर म्हणून ओळखल्या जाऊ लागले आहे. घड्याळ चढविण्याच्या या परंपरेमागे एक मजेदार गोष्ट आहे म्हणजे ती गोष्ट घडली आणि त्या दिवसापासून या मंदिरात लोकांनी घड्याळ चढविणे सुरू केले तर चला आपण ती मजेदार गोष्ट पाहूया.

या गावातील काही लोकांनी या गोष्टीला सांगितले आहे. एके दिवशी एक व्यक्ती हताश निराश होऊन मंदिरात आला त्याला ट्रक चालविणे शिकायचे होते त्याने या मंदिरात प्रार्थना केली की एक चांगला ट्रक चालविणारा बनलो पाहिजे. आणि काही दिवसानंतर तो एक चांगला ट्रक ड्रायव्हर बनला त्यांनतर त्याने या मंदिरात देवाला एक घड्याळ अर्पण केली.

त्यांनतर गावातील लोकांना या गोष्टीची खबर लागली की आपल्या गावच्या मंदिरात देवाला घड्याळ अर्पण केल्यावर आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होते, मग काय त्यांनतर गावातील लोकांनी मंदिरात घड्याळ अर्पण करण्याची सुरुवात केली आणि आज ही प्रथा सुरू होण्याला कमीत कमी ३० वर्ष पूर्ण झालेत. म्हणजे गेल्या तीस वर्षात या ठिकाणी किती सारे घड्याळ जमा झालेले असतील ना? बापरे बाप…

एवढंच नाही तर या गावातील लोक तर या मंदिरात आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतातच परंतु आजूबाजूच्या गावचे लोक सुध्दा या मंदिरात दर्शनासाठी येतात आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथे घडयाळ अर्पण करतात. पण एक गोष्ट आणखी की येथे येणाऱ्या आजपर्यंत जेवढ्या लोकांनी या मंदिरात घड्याळ अर्पण केले आहे त्या पैकी एक घड्याळ सुध्दा चोरीला गेलेली नाही. आणि येथील लोकांची अशी मान्यता आहे की घडी बाबाचा हा प्रताप आहे की कोणीही त्यांची घड्याळ येथून चोरून घेऊन नाही जाऊ शकत. तेथील लोकांची ही त्या घडीबाबा वर असलेली श्रद्धा आहे आणि या श्रद्धेमुळे तेथील लोक त्या मंदिरात घड्याळ अर्पण करतात.

तर वरील लेखात आपण पाहिले भारतातील असेही एक मंदिर ज्या मंदिरात लोक देवाला घड्याळे चढवीतात आणि त्यामुळे त्यांच्या मनोकामना पूर्णही होतात. तर अशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here