Friday, October 17, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

”कम्प्युटर” ची माहिती आणि इतिहास

Sanganakachi Mahiti

आदिम काळापासुन स्वतःत आणि आपल्या सभोवताली बदल आत्मसात करत करत आजच्या युगातला माणुस जेव्हां आपल्या नजरेसमोर उभा राहातो तेव्हां मला सांगा कितीसे साम्य दिसते ? तर काहीही नाही!

ज्याला जमिन-आसमानाचा फरक आपण म्हणतो तसा बदल घडला त्याने घडवला . . .

युगानुयुगे मागे पडली, शतकानुशतके पार करत आपण 21 व्या शतकात पदार्पण केलं.

मग प्रश्न असा उभा राहातो की नेमकं केलं काय माणसानं?

तर माणसानं स्वतःकरता अनुकुल असं वातावरण तयार केलं, खाण्यापिण्याच्या, राहाण्याच्या, सवयी बदलल्या, काम करण्याच्या पध्दतीत बदल घडला, आणि मुख्यतः माणसाने दिवसेंदिवस स्वतःचे कष्ट कमी कसे होतील याचा विचार केला.

आणि खुलजा सिम सिम म्हणावे आणि तो यावा तसा तो खरच अवतरला! त्याने माणसाला खरंच म्हंटलं “क्या हुक्म है मेरे आकां” आणि तो माणसाचा गुलाम होत त्याच्या दिमतीला क्षणाक्षणाला हजर होउ लागला.

त्याने माणसाचे कष्ट मोठयाप्रमाणात कमी केले, सुर्य उगवण्यापासुन तर मावळेपर्यंत तो प्रत्येक क्षणी माणसाला हवाच आहे कारण आता त्याच्या शिवाय मानवाचे पान देखील हलत नाही . .. असा तो!

कोण बरं तो ? की ज्याच्याशिवाय जगण्याची आज आपण कल्पना देखील करू शकत नाही, तर तो दुसरा तिसरा कोणी नसुन तो आहे ”कम्प्युटर” अर्थात संगणक.

”कम्प्युटर” ची माहिती आणि इतिहास – Computer Information in Marathi

Computer Information in Marathi

संगणकाचा इतिहास – History of computer in Marathi

तसं पाहिलं तर कम्प्युटर चा इतिहास खुप प्राचीन आहे, कम्प्युटर चा जनक ज्याला म्हंटले जाते अश्या “चार्ल्स बैबेज” यांनी डिफ्रैंशियल इंजीन या नावानं एक यंत्र तयार केलं.

हे यंत्र मोजणी करण्याच्या बाबतीत त्या काळी सगळयात वेगवान यंत्र होते यालाच जगातले पहिले कम्प्युटर म्हंटल्या जाते.

हे संगणक जेव्हां तयार करण्यात आले त्यावेळी गणितज्ञांना बिनचुक आकडेवारी करणे अवघड व्हायचे, चाल्र्स बबेज ने हीच अडचण दुर करण्याकरता प्रयत्न सुरू केले.

पहिल्यांदा जेव्हां चाल्र्स बबेज ने हे यंत्र बनवण्याकरता सुरूवात केली तेव्हां सरकारनं त्यांना आर्थिक मदत देउ केली पण तब्बल 25000 स्पेअर पार्टस् आणि 17000 पाउंड खर्च करून देखील काहीही यश हाती आलं नाही.

पुढे सरकारच्या वतीनं या प्रोजेक्ट ला बंद करण्यात आलं पण बबेज नी हार मानली नाही.

1832 साली पुन्हा नव्या जोमानं त्यांनी डिफ्रैंशियल इंजीन ला तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली.

याला त्यांनी “डिफै्रंस इंजीन 2” नाव दिले. ही मशीन पहिल्यापेक्षा जास्त वेगवान आणि परिणामकारक ठरली आणि जगाला पहिला संगणक (कम्प्युटर) मिळाला.

चाल्र्स बबेज ने बनवलेला हा पहिला संगणक आजही कॅलिफोर्नियाच्या म्युझीयम मधे आपल्याला पहायला मिळु शकतो.

कम्प्युटर चे भाग – Parts of Computer in Marathi

आज कम्प्युटर म्हणजे काय असं विचाराल तर सरळ भाषेत कम्प्युटर आज सर्वकाही आहे.

कम्प्युटर शिवाय आज कोणतेही काम शक्य नाही. माणसाच्या कार्यतत्परतेला वाढवण्यासोबतच हा मानवाचे प्रत्येक काम अगदी बिनचुक करू शकतो.

प्रत्येक क्षेत्रातील त्यांच अस्तित्व ही अगदी सामान्य बाब आहे. कम्प्युटर एक अशी मशीन आहे जी डाटा प्रोसेस करून रिझल्ट देते.

कम्प्युटर चा अर्थ गणना करणे असा आहे.

संगणकाला मनुष्याची भाषा कळत नाही त्याला फक्त प्रोग्राम समजतो, कम्प्युटर 0 आणि 1 च्या कोड मधे काम करतो ज्याला बाइनरी कोड असे म्हणतात. कम्प्युटर ला दोन भागात विभागल्या जातं

  • सॉफ्टवेअर (Software)

सॉफ्टवेअर ला कम्प्युटर चा आत्मा म्हंटल्या जातं. ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर उपयोगाचे नाही तसेच सॉफ्टवेअरशिवाय कम्प्युटर चे अस्तित्वच नाही.

सॉफ्टवेअर प्रोग्राम चा एक असा समुह आहे जो कम्प्युटर च्या हार्डवेअर ला मॅनेज करतो.

  • हार्डवेअर (Hardware)

हार्डवेअर कम्प्युटर चे शरीर आहे ज्याला आपण बघुही शकतो आणि स्पर्श देखील करू शकतो.

यात कीबोर्ड, माउस, मॉनिटर, प्रिंटर, मदरबोर्ड, मेमरी चिप, इलेक्ट्रॉनिक सर्किट, एक्सपेंशन कार्ड, केबल, स्विच, यांचा समावेश होतो याला तुम्ही स्पर्श करून पाहु शकता.

संगणकात असलेली काही प्रमुख वैशिष्टये –

  • कम्प्युटर खुप जास्त वेगात माहिती प्रोसेस करतो, खुप मोठया डाटाला प्रोसेस करण्याकरता त्याला काहीच सेकंद लागतात.
  • कम्प्युटर मधुन मिळालेलं उत्तर पुर्णतः अचुक असतं. जर संगणकात योग्य डाटा दिला असेल तर मिळणारे उत्तर 100 टक्के अचुकच असेल.
  • याची अचुकता पाहाता आज प्रत्येक ठिकाणी कम्प्युटर चा उपयोग केला जातो आहे.
  • कम्प्युटर चे आणखीन एक महत्वाचे वैशिष्टय हे आहे की मोठया प्रमाणात डाटा त्यात दिर्घकाळाकरता सेव्ह राहु शकतो.
  • याचे आणखीन एक महत्वाचे वैशिष्टय हे आहे की गरज पडल्यास आपण संगणकाची साठवण क्षमता देखील वाढवु शकतो.
  • संगणकावर आपण इतरही बरेच कार्य करू शकतो.
  • यात खेळ खेळण्यापासुन तर पत्र लिहीण्यापर्यंत, कार्यालयीन कामकाज, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डिजाइनिंग, ऑनलाईन फॉर्म भरणे, संगीत ऐकणे, व्हिडीओ पहाणे. यासारखी बरीच उपयोगी कामं आपण संगणकाच्या माध्यमातुन करू शकतो.
  • त्यामुळे त्याचा उपयोग आज मोठया प्रमाणात वाढलेला आपल्याला बघायला मिळतो.
  • संगणकाचे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे हा कधीही थकत नाही, तुमच्यात जेवढी ताकद आहे तुम्ही संगणकाकडुन काम करून घेउ शकता.
Editorial team

Editorial team

Related Posts

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?
Information

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो? पावसाळा जरी हिरवाई, थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो तरी त्याचे काही तोटेही आहेत. गळकी...

by Editorial team
August 26, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved