“आपल्याला माहित आहे का? चीन मध्ये कसा आला कोरोना विषाणू”

About Coronavirus

चीन मधेच नाही तर पूर्ण जगामध्ये हाहाकार निर्माण करणारा विषाणू म्हणजेच “कोरोना”.

२०२० या नवीन वर्षाची सुरुवात होताच पहिल्या महिन्यामधेच या विषाणूने आपले अस्तित्व पृथ्वीवर आहे हे दर्शवून दिले, आजच्या लेखात आपण जाणून घेऊया काय आहे हा कोरोना विषाणू?

तर चला या भयंकर विषाणूची ओळख करून घेऊया!

“आपल्याला माहित आहे का? चीन मध्ये कसा आला कोरोना विषाणू” – Coronavirus

Coronavirus

 

काय आहे कोरोना विषाणू? – What is the Corona Virus?

“कोरोना हा विषाणू परीवारातील सदस्य असून, हा विषाणू उंट, वटवाघुळ, साप, मांजर या सर्व पशूंमध्ये प्रवेश करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार हा विषाणू सीफूड शी जुळलेला आहे.

आणि शाश्त्रज्ञांच अस मत आहे कि वटवाघुळा मध्ये असणाऱ्या SARS (Severe Acute Respiratory Syndrome) चा विषाणू लोकांमध्ये सापा मार्फत पसरला.”

कुठून सुरुवात झाली या विषाणूची? – Where did this virus begin?

“चीनच्या वूहान शहरापासून या विषाणूची लागण होण्यास सुरुवात झाली. या शहरामध्ये जीव जंतूंचा बाजार भरलेला असतो, ज्यामध्ये विक्रीला साप, ससे, वटवाघुळ, आणि अन्य पक्षीही असतात. याच शहरामध्ये कोरोना विषाणू चा पहिला रुग्ण आढळला होता.”

या आजाराची लक्षणे कोणती आहेत? – Symptoms of Coronavirus

“सर्दी, खोकला, घसा दुखणे, स्वास घेण्यास त्रास होणे, ताप येणे, हि कोरोनाची लागण झाल्यावरची प्रमुख लक्षणे आहेत, तसेच हि प्रमुख लक्षणे न्युमोनिया मध्ये रुपांतरीत होतात, आणि किडनीला नुकसान पोहचवतात, सोबतच आपल्या फुफुसावर हि परिणाम करतात.”

चीन मध्ये किती जणांना या विषाणूची लागण झालेली आहे? – How many people are infected with this Coronavirus in China?

चीन मध्ये या विषाणूमुळे आतापर्यंत मृतांची संख्या हि ९०० च्या वरती गेली असून, तसेच मागील बुधवार ला ह्या विषाणूने ७३ जणांचा बळी घेतला. आणि चीनमध्ये आतापर्यंत ४०,००० पेक्षा अधिक जणांना ह्या विषाणूची लागण झालेली आहे,

भारतामध्ये काय स्थिती आहे कोरोनाची? – Coronavirus in India

भारतामध्ये शेकडो लोकांच्या तपासणी नंतर फक्त १२ जणांना रुग्णालयात भरती केल्या गेले आहे. यामधून फक्त ७ जण केरळ चे असून ३ जण मुंबई आणि हैद्राबाद, बँगलोर मधून १-१ रुग्ण आहे.

ह्या व्यक्ती काही दिवसापूर्वीच चीन आणि हाँगकाँग मधून भरतात आलेले आहेत.

काय यावर कोणती औषध उपचार उपलब्ध नाही आहे? – What drug treatment is not available on this?

एका सर्वे नुसार असे समोर आले आहे कि जर्मनी मध्ये या विषाणू वर लस शोधून काढण्याच्या पहिल्या प्रयत्नाला यश आले आहे, त्यामध्ये आणखी एक संशोधन बाकी असल्यामुळे हि लस बनवायला वेळ लागत आहे, लवकरच या विषाणूवर अधिकृत लस बाजारात उपलब्ध होईल.

कोरोना पासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय! – What drug treatment is not available on this?

 • आपल्या हातांना साबणाने, आणि पाण्याने स्वच्छ साफ करा.
 • शिंकताना आपल्या तोंडावर रुमाल ठेवावा.
 • ज्यांना सर्दी किंवा फ्लू सारखे लक्षणे आहेत त्यांच्या पासून दूर रहा.
 • आपल्या जेवनाला चांगल्या प्रकारे शिजवा, तसेच जनावरांशी कमी संपर्कात रहा.

खालील यादीवरून आपण जाणून घेऊ शकता, कोणत्या देशात किती रुग्ण आहेत कोरोनाचे?

दिनांक १०/०२/२०२०, या दिवशीचे रुग्णांचे आकडे.

 1. चीन- ४०,१७१
 2. जपान – १५६
 3. सिंगापूर – ४३
 4. हाँगकाँग –  ३६
 5. थायलंड – ३२
 6. दक्षिण कोरिया – २७
 7. तैवान – १८
 8. मलेशिया – १७
 9. ऑस्ट्रेलिया – १५
 10. जर्मनी – १४
 11. युनायटेड स्टेट – १२
 12. फ्रांस – ११
 13. संयुक्त अरबी देश- ७
 14. युनायटेड किंग्डम – ४
 15. भारत – ३
 16. फिलिपिन्स – ३
 17. रशिया – २

तर आजच्या लेखात आपण पाहिली कोरोना विषाणू विषयी थोडक्यात माहिती. तसेच या लेखाला कोरोनो विषाणू विषयी जागरुकता पसरवण्यासाठीच बनवल्या गेले आहे,

तर आशा करतो कि आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रपरिवारात या लेखाला शेयर करा जेणेकरून आपल्या मित्रांना या विषाणू विषयी जागरुकता पसरवण्यास मदत होईल.

आणि भेट दया आमच्या majhi marathi ला.

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here