गाय बद्दल माहिती

Gay chi Mahiti Marathi

हिंदू संस्कृतीमध्ये गायीला एक श्रद्धा स्थान आहे असे मानले जाते कि गायी मध्ये ३३ कोटी देव हे गायीच्या पोटात असतात. गाय हा पाळीव प्राणी सर्व प्रकारांनी उपयुक्त आहे.

गाय बद्दल माहिती – Cow Information in Marathi

cow information in marathi
cow information in marathi
हिंदी नाव : गाय, गौ
इंग्रजी नाव : Cow

गाईला चार पाय असतात. तसेच दोन डोळे, दोन कान, दोन शिंगे असतात आणि एक शेपटी असते. गाईची शिंगे लहान – मोठी विविध आकाराची असतात. गाईच्या पिलाला ‘वासरू’ म्हणतात.

गाईचे विविध रंग असतात. पांढरा, काळा, तपकिरी, काळापांढरा दोन्ही मिळून, अशा प्रकारचे गाईंचे रंग प्रामुख्याने बघायला मिळतात.

गायींचे अन्न – Cow Food

गाय ही शाकाहारी आहे. गाय फक्त गवत, भाकरी आणि इतर अन्नपदार्थ खाते. तसेच कडबा, धान्याची भरड खाते.

गायींपासून आपणास दूध मिळते. गाईचे दूध पौष्टिक असते. गायीचे मूत्रसुद्धा उपयोगी असते; त्याला गोमूत्र म्हणतात तसेच गायींचे शेण पण उपयोगी असते.

गोबरगॅस, शेण गोवऱ्या अशा प्रकारे इंधन म्हणून त्याचा उपयोग होतो.

तसेच खेडेगावात घराच्या भिंती तसेच जमीन सारवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अंगणात सडा मारण्यासाठी त्याचा उपयोग करतात.

गायींची वयोमर्यादा साधारणपणे १५ ते २० वर्षे अस शकते.

गायींचे वजन – Cow Weight 

सशक्त गायींचे वजन साधारणपणे १५० ते २०० किलोग्रॅम असते.

गायीच्या ८०० पेक्षा अधिक जाती आहेत. उदा. जरसी, गावरान, डांगी, खिल्लारी, देवणी, साहिवाल, गीर अशा काही जाती आहेत.

हिंदू धर्मात गाय ही पवित्र मानली जाते, गाय ही पूजनीय आहे. प्रामुख्याने दिवाळीत वसुबारसेच्या दिवशी गाय आणि तिचे वासरूया दोघांचीही एकत्र पूजा करण्याची प्रथा आहे. गाईचे दूध हे लहान मुलांस पौष्टिक आहार व पचनास हलके म्हणून वापरले जाते. नवीन जरसी प्रकारच्या गायी या पुष्कळ दूध देतात.

देवापुढे होमहवन करताना गाईचे तूप प्रामुख्याने वापरले जाते. गाय तिच्या शेपटीचा उपयोग अंगावर बसलेल्या माश्या हाकलण्यासाठी करते.

गाईच्या, दुधापासून दही, लोणी, तूप, खवा, बासुंदी असे अनेक पदार्थ बनवतात. गाईच्या गोमूत्राचा उपयोग औषधांमध्ये करतात. अशा रीतीने गाय हा उपयुक्त पाळीव प्राणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here