माहिती आहे का? क्रिकेटच्या मैदानावर एकापेक्षा जास्त पिच का असतात?

Cricket pitch Vishayi Mahiti 

भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट होय. भारतामध्ये आज क्रिकेटची एवढी लोकप्रियता आहे, की क्रिकेट मॅच होण्याच्या आठवड्यापूर्वीच सर्व तिकिटे विकल्या जातात आणि ह्यावरूनच आपल्याला कळत की भारतामध्ये क्रिकेट ची लोकप्रियता किती आहे. असणारच ना कारण भारत असा देश आहे ज्या देशात क्रिकेट विश्वातील नंबर १ चे बॅट्समन बॉलर आहेत. आणि या देशात जर क्रिकेटची लोकप्रियता नसेल तर मग तर गोष्टच वेगळी.

आपल्या सर्वांना माहिती आहे, की क्रिकेटच्या मैदानावर बरेचशे पीचेस असतात. आपण कधी कुठल्या मैदानावर जाऊन पाहिले असेल किंवा टीव्ही मध्ये कुठली क्रिकेटची मॅच पाहताना, तर का एकापेक्षा जास्त पीचेस आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर पहायला मिळतात या मागे काय कारण असणार.तर आजच्या लेखात आपण ह्या गोष्टींमागचे कारण पाहणार आहोत तर चला पाहूया..

क्रिकेटच्या मैदानावर एकापेक्षा जास्त पीच का असतात बरं – Cricket pitch Information in Marathi

Cricket pitch Information in Marathi
Cricket pitch Information in Marathi

क्रिकेटचे मैदान प्रत्येकाने पाहिले असेलच आणि प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष दिलेच असेल की क्रिकेटच्या मैदानावर एकापेक्षा अधिक पीचेस का असतात, काही लोकांना वाटत असेल की एखाद्या सामान्याच्या दरम्यान पिच जर खराब झाली तर दुसऱ्या पिच चा वापर केला जात असेल तर असे होत नाही, मैदानावर एकापेक्षा जास्त पीचेस बनविण्यामागे काही कारणे आहेत, क्रिकेटच्या मैदानावर एक मुख्य पिच असते त्याया पिच वर फक्त आंतरराष्ट्रीय सामना खेळविण्यासाठी त्या पिच ला बनविल्या गेलेलं असते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामान्यांसाठी त्या पिच ला योग्य रित्या तयार केल्या जाते. तेही योग्य मोजमाप आणि दर्जा चेक करून आणि बाकी पीचेस चा वापर घरेलू सामने खेळण्यासाठी केला जातो.

जसे आपल्या इथे रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी, मुश्ताकअली ट्रॉफी अश्या वेगवेगळ्या घरेलू सामने खेळण्यासाठी या बाकी पीचेस चा वापर केल्या जातो, सोबतच खेळाडूंच्या नेट प्रॅक्टिससाठी सुध्दा या बाकी पीचेस चा वापर केला जातो, आणखी एक कारण असे की जर एकच पिच खेळण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी उपलब्ध असेल तर ती पिच खराब होण्याची शक्यता जास्त असती म्हणून सुध्दा एकापेक्षा जास्त पीचेस चा वापर क्रिकेटच्या मैदानावर केला जातो.

तर आशा करतो आपल्याला हा लिहिलेला लेख आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here