Monday, September 25, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जगातील सर्वात भयानक रेल्वे ट्रेक, एक आहे भारतात.

Dangerous Railway Track

जगात अनेक अश्या गोष्टी आहेत ज्या माणसाला नेहमी आश्चर्य चकित करत असतात, माणसाला विचार करण्यावर मजबूर करतात कि जगात अश्याही गोष्टी आहेत ज्यांची कल्पना माणूस कधी करू शकत नव्हता,

माणूस या पृथ्वीवरील जरीही एक साधारण प्राणी असला तरी सुद्धा तो त्याच्या बुद्धीच्या बळावर संपूर्ण विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे, कारण माणसाने ते काम करून दाखविले आहे जे जवळ जवळ कोणालाही शक्य नसते,

मग ते पृथ्वीवरून मंगळावर जाणे असो कि आणखी काही. तर आजच्या लेखात सुद्धा आपण अश्याच प्रकारचे मानवनिर्मित जगातील काही भयंकर रेल्वेचे ट्रेक पाहणार आहोत, आणि ते जगात कुठे आहेत आणि त्यांची विशेषता काय आहे, याविषयी जाणून घेऊया,

जगातील सर्वात भयानक रेल्वे ट्रैक, त्यापैकी एक आहे भारतात – Dangerous Railway Track

सोबतच या यादीमध्ये आपल्या भारतातील एक ट्रेक सुद्धा आलेला आहे, तर चला आपण या सर्व ट्रेक विषयी माहिती पाहूया, जगातील भयानक रेल्वे ट्रेक ची यादी खालीलप्रमाणे आहे.

८) कुब्रिस आणि टॉल्टेक – Cumbres & Toltec Scenic Railroad

Cumbres & Toltec Scenic Railroad
Cumbres & Toltec Scenic Railroad

 

कुब्रिस आणि टॉल्टेक चा रेल्वे ट्रेक उत्तर अमेरिकेच्या मेक्सिको देशात आहे. कुब्रिस आणि टॉल्टेक हा रल्वे मार्ग एक निसर्गरम्य रेल्वेमार्ग आहे, म्हणजेच या रेल्वे ट्रेक च्या आजूबाजूला निसर्गाचे सुंदर दर्शन होते.

कॉलाराडो आणि मेक्सिको च्या बोर्डर वर हा मार्ग एक झिग झॅग वळणाचा होतो. या रेल्वे ट्रेक वर आपण एक वेगळा आनंद घेऊ शकता हे जगातील भयानक रेल्वे ट्रेक मध्ये एक आहे.  या ठिकाणाला जाण्यासाठी त्यांच्या ऑफिशियल वेंब साईट वरून आपण तिकीट बुक करू शकता,

सोबतच या ठिकाणाला जाण्यासाठी काही स्पेशल ट्रेन ची व्यवस्था केलेली असते, जे फक्त या ट्रेक चे दर्शन लोकांना चांगल्या प्रकारे व्हावे.

७) डेविल्स नोस – Devil’s Nose

Devil’s Nose
Devil’s Nose

 

डेविल्स नोस म्हणून एक ट्रेक आहे जो सिरिया मध्ये स्थित आहे, या रस्त्याला तसे “नारिज डेल डिआबलो” म्हटल्या जातो. याचा अर्थ असा कि एखाद्या राक्षसाचे नाक. जमिनीपासून ८-९ हजार फुटावर हा रेल्वे मार्ग आहे, हा रेल्वे मार्ग जगातील सर्वात भयानक रेल्वे मार्गांमध्ये एक आहे.

६) ट्रेन ए लास न्यूब्स – Tren a las Nubes

Tren a las Nubes
Tren a las Nubes

 

ट्रेन ए लास न्यूब्स हा एक असा रेल्वे मार्ग आहे ज्या मार्गाला बनविण्यासाठी एकूण २७ वर्षाचा कालावधी लागला होता. हा जगातील भयानक रेल्वेमार्गांमधील एक आहे. आपण या ठिकाणाविषयी माहिती पाहिल्यास आपल्याला पाहायला मिळते कि हा ट्रेक ढगांमधून जाताना आपल्याला दिसतो,

जेथे ढग आपल्याला खाली दिसतात आणि रेल्वे ट्रेक त्याच्या वरून जाताना दिसते, या ट्रेक वर २१ बोगदे आणि १३ एकसमान उंचच्या उंच पूल आहेत.

५) एसो मियामी ट्रेक, जपान – Minamiaso Railway

Minamiaso Railway
Minamiaso Railway

 

एसो मियामी ट्रेक हा जपान मधील एक रेल्वेचा ट्रेक आहे, या ट्रेक चा रस्ता जो आहे त्या रस्त्यात काजी ज्वालामुखी सुद्धा आहेत आणि या ट्रेक च्या रस्त्यातील हे ज्वालामुखी कधी विस्फोट होतील हे सांगितल्या जात नाही.

त्या ट्रेक च्या रस्त्याने काही असे सुद्धा झाडे आहेत जे ज्वालामुखीच्या विस्फोटाने नष्ट झालेले आहेत, आपण जर या ट्रेनने प्रवास केला तर आपल्याला या झाडांचे दृश्य दिसते, आणि हे दृश्य पाहायला खूप थरारक वाटते. एसो मियामी रूट हा जगातील भयानक असणाऱ्या रेल्वेच्या ट्रेक पैकी एक आहे.

४) कुरांदा स्केनिक, ऑस्ट्रेलिया – Kuranda Scenic Railway

Kuranda Scenic Railway
Kuranda Scenic Railway

 

कुरांदा स्केनिक हा ऑस्ट्रेलिया मधील एक भयानक रेल्वे ट्रेक आहे, या ट्रेक वर येणारी ट्रेन जॉर्ज नॅशनल पार्क मधील जंगलांमधून जाताना दिसते, दाट झाडे आणि सगळीकडे पसरलेली हिरवळ लोकांना स्वतःकडे आकर्षित करताना दिसते.

या ट्रेक वर चालणाऱ्या रेल्वेमधून आपल्याला बरेचशे धबधबे पाहायला मिळतात, सोबतच कधी कधी तर ट्रेन वर सुद्धा धबधब्यांचे पाणी पडते एवढच नाही तर संपूर्ण ट्रेन सुद्धा या धबधब्याच्या पाण्याने ओली होते.

३) द डेथ रेलवे. थायलंड – The Death Railway

The Death Railway
The Death Railway

 

द डेथ रेलवे हा रेल्वेचा ट्रेक थायलंड च्या कंचनबुरी भागात आहे, द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळेस या ट्रेक ला जापान ने बनविले होते, परंतु या ट्रेक ला बनविते वेळी शेकडोंच्या संख्येने बरेचशे सैनिक आणि काही कैदी सैनिक यांची मृत्यू झाली होती. हा रेल्वे ट्रेक आपल्याला एका पहाडाच्या खूप जवळून जाताना दिसतो आणि याच्या आजूबाजूला हिरवळ तसेच नदीच्या काठावरून जाताना दिसतो.

आजूबाजूला असलेले पाणी आणि तसेच हिरवळ झाडे या ट्रेक वरून प्रवास करायचा एक वेगळा आनंद देतात. तसेच आजूबाजूला हे सर्व पाहायला मिळणे हे नवीन पर्यटक लोकांसाठी एक चांगले दृश्य असते.

२) जॉर्जटाउन लूप रेल्वे ट्रेक, कोलोरॅडो – Georgetown Loop Railroad

Georgetown Loop Railroad
Georgetown Loop Railroad

 

जॉर्जटाउन लूप हा रेल्वे ट्रेक जॉर्जटाउन आणि सिल्व्हर प्ल्युम यांच्या मधोमध आहे, या ट्रेक ला खूप डोके लाऊन बनविल्या गेले असेल असे या ट्रेक ला पाहिल्या नंतर वाटते.

एक चित्त थरारक अनुभव तर तेव्हा येतो जेव्हा ट्रेन या ट्रेक वरून जात असताना हवेची लाट ट्रेन ला मागे ढकलत आहे असे भासते. कारण त्यावेळी या ट्रेक वर रेल्वेचा तोल सांभाळणे थोडे कठीण जाते. हा रेल्वे ट्रेक जगातील भयंकर रेल्वे च्या ट्रेक पैकी एक आहे.

१) चेन्नई-रामेश्वरम ट्रेक. भारत – Chennai to Rameswaram Train Route

Chennai to Rameswaram Train Route
Chennai to Rameswaram Train Route

 

चेन्नई-रामेश्वरम हा जगातील भयानक रेल्वे मार्गामधील एक रेल्वे मार्ग आहे. या रेल्वेमार्गाच निर्माण १९१४ मध्ये झाल, हा रेल्वेचा पूल २ किलोमीटर लांब आहे, हा रेल्वेचा ट्रेक हिंदी महासागर आणि बंगालची खाडी ने चहुबाजूने घेरलेले आहे.

या पुलावरून प्रवास करताना चहूकडे फक्त आणि फक्त आपल्याला पाणीच दिसते, या पुलावरून प्रवास करणे आपल्याला एक चित्तथरारक अनुभव देऊन जातो, हा रेल्वे ट्रेक जगातील भयानक रेल्वे ट्रेक च्या यादीत सगळ्यात वर आहे.

हे होते जगातील काही भयानक रेल्वेचे ट्रेक जे आपल्याला एक नवीन माहिती देऊन जातात, तर आशा करतो आपल्याला हा लेख आवडला असणार आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Previous Post

वसुंधरेच्या सुरक्षासंबंधी काही महत्वपूर्ण घोषवाक्य

Next Post

जाणून घ्या ८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
8 September History Information in Marathi

जाणून घ्या ८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

Crossing the Border to Go to School in the US

शाळेत जायचे असेल तर दप्तरात पाहिजे पासपोर्ट, कमालच आहे ना.

मांजरCat Got a Security Guard Job in Hospital बनली सिक्युरिटी गार्ड! फुल पगारी अन फुल अधिकारी - Cat Got a Security Guard Job in Hospital

मांजर बनली सिक्युरिटी गार्ड! बिन पगारी अन फुल अधिकारी,

9 September History Information in Marathi

जाणून घ्या ९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

World's Largest Bhagavad Gita

जगातील सर्वात मोठा गीता ग्रंथ भारतात. वजन आहे ८०० किलो.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved