दसऱ्या चे मराठी एस एम एस (SMS)

Dasara Shubhechha

दसरा / Dasara म्हणजेच विजयादशमी / Vijayadashami आश्विन शुध्द दशमी ला दसरा हा सण साजरा केला जातो. त्याआधी आश्विन शुध्द प्रतिपदेला देवीच्या घटांची स्थापना करून नऊ दिवस नवरात्राचे उपवास आणि पूजाविधी केली जाते आणि दहाव्या दिवशी दसरा / Dussehra हा सण साजरा केला जातो. चला या दसऱ्यात आपल्या लोकांना काही नवीन SMS पाठवु / Dasara Marathi SMS आणि दसऱ्याला अजून सुंदर बनवू…..

दसऱ्या चे मराठी एस एम एस / Dasara Marathi SMS, Shubhechha, Quotes, Status

Dasara chya Hardik Shubhechha in Marathi
Dasara chya Hardik Shubhechha in Marathi

“झाली असेल चूक तर या निमिनत्ताने आता ती विसरा, वाटून सोन एकमेकांस प्रेमाने साजरा करू साजरा करु यंदाचा हा दसरा!”

“अज्ञानावर ज्ञानाने शत्रुवर पराक्रमाने… अंधारावर प्रकाशाने क्रोधावर प्रेमाने विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी!”

“परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात,सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!”

“चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!! आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!! तुमचा चेहरा आहेत हसरा!! उद्या सकाळी खूप गडबड, म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा!!”

“झेंडूची फुले केशरी, वळणा वळणाचं तोरण दारी, गेरुचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत न्यारी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

Dasara chya Hardik Shubhechha in Marathi

Dasara Quotes in Marathi
Dasara Quotes in Marathi

“वाईटप्रवूत्ती वर चांगल्याची मात महत्व या दिनाचे असे खास, जाळूनी द्वेष- मत्सराची कात मनोमनी वसवी प्रेमाची आस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती  समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“सोन्यासारखे नाते तुमचे- माझे हळुवार जपायचे, दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे!”

“स्वर्णवर्खी दिन उगवला आज फिरुनी हसरा आसमंती मोद पसरे नाही दु:खाला आसरा अंतरीच्या काळजीला आज नाही सोयरा आनंद देऊ, हर्ष देऊ सण करुया साजरा विजयादशमीच्या शुभेच्छा!”

Dasara Wishes in Marathi Font

Dasara Wishes in Marathi Font
Dasara Wishes in Marathi Font

“शुभेच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात विजया दशमी चा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा आपल्या जीवनात पाऊस पडो सुवर्णांचा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“उत्सव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा.. नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा”

“आपट्याची पानं जणू सोनं बनून सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे”

“दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने या वर्षात लुटूयात सद्विचारांचे सोने! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ!”

Dasara Wishes in Marathi

Dasara Wishes in Marathi
Dasara Wishes in Marathi

“सोनं घ्या…सोन द्या… सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“दसरा म्हणजे सीमोल्लंघन मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन करतो शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन…”

“विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत, अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित करणारा सण दसरा विजयादशमीच्या मनस्वी शुभेच्छा!”

Dussehra Quotes in Marathi

Dussehra Quotes in Marathi
Dussehra Quotes in Marathi

“सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू शिखर प्रगतीचे! यशाचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!!  दसऱ्याचा शुभेच्छा!”

“आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार करुन आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“झेंडुची तोरण आज लावा दारी सुखाचे किरण येऊद्या घरी पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ‘विजयादशमी’ आणि ‘दसरा’ उत्सवाच्या सर्व मित्र परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा!”

“दसऱ्याला करतो पाटी पूजन, आणि वंदितो शस्त्रे, वाहन निगा राखण्याचे आश्वासन, बुद्धी, शक्तिचे होते मीलन”

Dussehra Wishes in Marathi Language

Dussehra Wishes in Marathi Language
Dussehra Wishes in Marathi Language

“सोनेरी फुलांचे तोरण बांधू दारी, काढू सुंदर रांगोळी अंगणी.. उत्सव हा सोने लुटण्याचा… जपू नाती मनाची करुनी उधळण सोन्याची.”

“आपट्याची पाने, झेडुंची फुले, घेऊन आली विजयादशमी.. दसऱ्याच्या या शुभदिनी, सुख समृद्धी नांदी आपल्या जीवनी!! विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“समृद्धीचे दारी तोरण आनंदाचा हा हसरा सण सोने लुटून हे शिलंगण हर्षाने उजळू द्या अंगणसर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!”

“मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा, सण दसरा हा उत्कर्षाचा चैतन्यास संजीवनी लाभोनी होवो साजरा मनी, उत्सव तो नवहर्षाचा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर”

Dussehra Wishes in Marathi

Dussehra Wishes in Marathi
Dussehra Wishes in Marathi

“लाखो किरणांनी उजळल्या दिशा, घेऊनी नवी उमेद, नवी आशा,  पूर्ण होतील मनातील सर्व इच्छा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“दसऱ्याच्या या शुभदिनी तुमचे आयुष्य सुख-समाधानाचे- आनंदाचे भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो… हि सदिच्छा!”

“चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा… दसरा तुम्हा सर्वांना हसरा जावो, ही देवाचरणी प्रार्थना विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा!”

“सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा…. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

Happy Dasara in Marathi

Happy Dasara in Marathi
Happy Dasara in Marathi

“तोरण आज लावा दारी सुखाचे किरण येऊ द्या घरी पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्व मनोकामना हीच विजयादशमीच्या दिनी शुभेच्छा!”

“दसरा हे विजयाचे प्रतीक आहे, असेच आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावरती आपण नेहमी, विजय मिळवावा.. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”

“शब्दांना सूर लाभता शब्दांचेही गाणे होते! विजयादशमीच्या परीस्पर्शाने आपट्याचेही सोने होते!!”

“आला आला दसरा, दु:ख आता विसरा चेहरा ठेवा हसरा साजरा करु दसरा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

Vijayadasami chya Hardik Shubhechha

Vijayadasami chya Hardik Shubhechha
Vijayadasami chya Hardik Shubhechha

“सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोन्यासारख्या लोकांना सोनेरी शुभेच्छा हॅप्पी दसरा!”

“दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“मराठी संस्कृतीचा ठेवुनिया मान तुम्हाला सर्वांना देतो मी सोनियाचे पान… सोने घेताना..ठेवा चेहरा ‘हसरा’ तुम्हाला सर्वांना शुभ दसरा”

“आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून विजयादशमी व दसरा निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!”

“सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवण, सोन्यासारख्या लोकांना, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“सदैव गुणगुणत राहिले की,  त्याचे आपोआप गाणे होते, जसे दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे सोने होते.”

“आपट्याच्या सोन्यावरुन एक गोष्ट आपल्याला कळते, प्रयत्नात सातत्य असेल तर संधी आपोआप मिळते.”

Vijayadashami Wishes in Marathi

Vijayadashami Wishes in Marathi
Vijayadashami Wishes in Marathi

“आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख नांदो तुमच्या जीवनी!

“मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान, आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान.” Happy Dasara

“आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास, तुला सर्व सुख लाभो या जगात, प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात.”

“आज आहे नवमी उद्या आहे दसरा, आता सर्व प्रॉब्लेम विसरा, विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा.”

“हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान, सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान.”

पुढील पानावर आणखी…

4 COMMENTS

 1. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये सोन्याला खुप महत्व आहे काश्यामुळे हे माहीत आहे का , कारण सोनं हा असा एकमेव धातु आहे जो ईतर कोणत्याही धातुमध्ये मिसळला तरी तो अगदी सहज मिसळतो पण तरीही तो तिथे आपली ओळख तशीच ठेवतो , सोनं हा असा एकमेव धातू आहे जो सर्वात जास्त तापमान सहन करतो तरीही आपले गुण सोडत नाही अन तो कोणत्याही आकारात स्वतःला एकरूप होतो,
  आपले नाते हि अगदी सोन्यासारखेच असले पाहिजे कोनासोबतही अगदी सहज मिसळणारे , कोणाच्याही बरोबर अगदी एकरूप होणारे पण तरीही आपले स्वत्व जपणारे अन सर्वात महत्वाचे कितीही संकटे आली तरीही एकमेकांचे हात अगदी घट्ट धरणारे ,
  अशाच माझ्या सर्व प्रेमळ अन जीव लावणाऱ्या सोन्यासारख्या नात्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा !!!

  ।। शुभ दसरा ।।

 2. सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
  सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी,
  सोनेरी शुभेच्छा
  फक्त सोन्यासारख्या लोकांना…!

 3. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये सोन्याला खुप महत्व आहे काश्यामुळे हे माहीत आहे का , कारण सोनं हा असा एकमेव धातु आहे जो ईतर कोणत्याही धातुमध्ये मिसळला तरी तो अगदी सहज मिसळतो पण तरीही तो तिथे आपली ओळख तशीच ठेवतो , सोनं हा असा एकमेव धातू आहे जो सर्वात जास्त तापमान सहन करतो तरीही आपले गुण सोडत नाही अन तो कोणत्याही आकारात स्वतःला एकरूप होतो,
  आपले नाते हि अगदी सोन्यासारखेच असले पाहिजे कोनासोबतही अगदी सहज मिसळणारे , कोणाच्याही बरोबर अगदी एकरूप होणारे पण तरीही आपले स्वत्व जपणारे अन सर्वात महत्वाचे कितीही संकटे आली तरीही एकमेकांचे हात अगदी घट्ट धरणारे ,
  अशाच माझ्या सर्व प्रेमळ अन जीव लावणाऱ्या सोन्यासारख्या नात्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा !!!

  ।। शुभ दसरा ।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here