वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलींनाही वारसा हक्क… काय सांगतोय कायदा?

Daughter Right in Father Property

मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याबद्दल खात्रीशीर माहिती नसेल की, लग्न झालेल्या मुलींचा त्यांच्या वडिलांच्या मृत्युनंतर त्यांच्या संपत्तीवर हक्क असतो का? या बद्दल कायदेशीर तरतुदी कोणत्या कोणत्या आहेत? चला तर मग जाणून घेवूया या लेखाच्या माध्यमातून याबद्दल संपूर्ण माहिती. हिंदू सेक्शन कायदा १९५६ नुसार सन २००५ साली झालेल्या हिंदु उत्तराधिकार कायद्यात झालेल्या बदलानुसार विवाहित मुलींना देखील मुलांप्रमाणे वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे.

परंतु, असे असले तरी वडिलांचे निधन झाले असेल अथवा वडिलांची आपल्या संपत्तीचा वाटा मुला मुलींना द्यायची इच्छा नसेल तरी देखील त्यांच्या मालमत्तेमध्ये मुलगा व मुलगी यांचा समान हक्क राहतो.  याबद्दल मुलींनी त्यांच्या अधिकारांबद्दल स्पष्ट असणे आवश्यक आहे. आम्ही याठिकाणी काही अटी नमूद करतो त्यानुसार मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा ठेवू शकत नाहीत.

वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींचा समान हक्क – Daughter Right in Father Property

Daughter Right in Father Property
Daughter Rights in Father Property

सन २००५ साली हिंदू वारसा हक्क कायद्यांमध्ये झालेले महत्वपूर्ण बदल – Hindu Succession Act 2005

  • वडिलोपार्जित मालमत्ते बाबतीत – Right in the Parental Property

सन २००५ सालापूर्वी हिंदू वंशावळी कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीचा वारसदार हा केवळ मुलगाच मानला जायचा. हिंदू वारसा कायदा १९५६ सालच्या तरतुदीनुसार मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये समान हक्क दिले गेले नव्हते. मुलगा हाच घराचा कर्ता मानला जात असे. परंतु, सन ९ सप्टेंबर २००५ साली या कायद्यात केल्यागेलेल्या दुरुस्तीनुसार मुलगा व मुलगी दोघांनाही या मालमत्तेचा जन्मापासून समान अधिकार मिळतो. या नवीन कायद्यानुसार वडिल आपली इच्छा असतांना सुद्धा आपल्या संपत्तीचा वाटा आपल्या मुली शिवाय दुसऱ्या कोणालाही देवू शकत नाहीत. त्या संपत्तीवर केवळ मुलीचाच अधिकार असतो.

परंतु, जर संपत्तीची वाटणी २० डिसेंबर २००४ पूर्वी झाली असेल तर त्या संपत्तीवर मुलीचा काहीच हक्क नसतो. कारण हा नवीन नियम तेथे लागू पडत नाही. कारण अशा प्रकरणात संपत्तीच्या वाटपात जुने नियम लागू होतात. शिवाय, ही वाटणी रद्द सुद्धा करता येत नाही. हा कायदा केवळ हिंदू,  शीख, बौध्द, आणि जैन समुदायाला लागू पडतो.

  • वडिलोपार्जित मालमत्ता स्वताब्यात घेतल्यास – Ancestral Property Rights

वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे आपल्या पूर्वजांपासून आपल्या वडिलांच्या ताब्यात आलेली मालमत्ता होय. या संपत्तीमध्ये जन्माआधीच्या चार पिढ्यांनी कमाविलेल्या संपत्तीचा समावेश असतो. अशा या मालमत्तेवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो, मग तो मुलगा असो अथवा मुलगी. सन २००५ सालापूर्वी या संपत्तीवर केवळ मुलाचा हक्क असायचा.

परंतु, सन २००५ सालानंतर कायद्यात झालेल्या दुरुस्तीनुसार वडिल त्यांच्या मनाप्रमाणे आपली संपत्ती इतर कोणाच्या नावावर करू शकत अथवा दान करू शकत नाहीत. या संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे मुलींना देखील समान हक्क आहे. कायद्यानुसार, मुलगी जन्माला येताच तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मिळतो.

  • वडिलांचे अधोगती निधन झाल्यास – If the father’s demise dies

मृत्युपत्र लिहिण्याआधीच जर वडिलांचे निधन झाले असेल तर त्यांच्या संपत्तीचा वारसाहक्क असणाऱ्या सर्व वारसदारांना त्यांच्या संपत्तीचा समान हक्क मिळतो. नवीन हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार पुरुषाच्या वारसांना चार वर्गात विभागले जाते आणि वडिलांच्या संपत्तीचा पहिला हक्क हा पहिल्या वर्गाच्या वारसांचा असतो. यामध्ये विधवा पत्नी, मुली व मुले  तसेच इतरांचा समावेश असतो. यावरून असा निष्कर्ष निघतो की, वडिलांच्या संपत्तीवर सर्व वारसदारांचा समान अधिकार असतो.

परंतु, जर वडिलांनी त्यांच्या मृत्युपूर्वी आपले मृत्युपत्र तयार केलं असेल व वडिलांनी मुलीला आपल्या संपत्तीतील वाटा देण्यास नकार दर्शविला असेल तर अश्या परिस्थिती मुलगी काहीच करू शकत नाही. तसचं, मुलीला वडिलांच्या स्वयंरोजगारीत मालमत्तेचा हक्क नाकारला जातो.

  • मुलीचे लग्न झाल्यानंतर तिचा माहेरच्या मालमत्तेवरील आपला हक्क संपतो का – Indian Property Law for Married Daughter

सन २००५ सालापूर्वी हिदू उत्तराधिकारी कायद्यानुसार मुलींकडे हिंदू अविभाजित कुटुंबाचे सदस्य म्हणून पाहले जात असे. म्हणजेच, मुलीच्या लग्नानंतर मुलगी ही कागदोपत्री “माहेरचा” सदस्य नसल्याचे गृहीत धरले जात असे. परंतु, सन २००५ सालीच्या तरतुदीनंतर हा कायदा बदलण्यात आला. त्यामुळे मुलगी जरी विवाहित असली तरी तिला माहेरच्या संपत्तीत समान हक्क प्रस्तापित झाला.

  • मुलीचा जन्म सन २००५ सालापूर्वी झाला असेल किवां सन २००५ सालापूर्वी वडिलांचे निधन झाले असेल तर! – If the girl was born before the year 2005 and the father died after that!

मित्रांनो, सन ९ सप्टेंबर २००५ पासून हिंदू उत्तराधिकारी कायद्यात नवीन सुधारणा लागू झालेली आहे. या कायद्यात असे नमूद केलं गेल आहे की,  या तारखेच्या आगोदर किंवा नंतर मुलगी जन्माला आली असेल तर त्या मुलीचा सुद्धा मुलाप्रमाणे वडिलांच्या संपत्तीत समान वाटा असेल. याव्यतिरिक्त, जर सन ९ सप्टेंबर २००५ साली वडिल जिवंत असतांनाच मुलगी आपल्या वडिलांच्या संपत्तीतील वाटा मिळवू शकते. परंतु, जर या तारखेपूर्वी वडिलांचे निधन झाले असेल तर मुलीला वडिलांच्या संपत्तीतील कोणताच हक्क नसतो. शिवाय, वडिलांनी स्वत: कमावलेल्या मालमत्तेची त्यांच्या मतानुसार विभागणी केली जाते.

मित्रांनो, वरील लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणास मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीतील  कोण कोणते हक्क आहेत आणि ते कोणत्या कायद्यानुसार आपल्या वडिलांच्या संपत्तीचा हक्क मागू शकतात याबद्दल सविस्तर वर्णन केलं आहे. जर आपणास हा लेख आवडला असेल तर मित्रांनो नक्की LIKE करा तसचं, तुमच्या मित्रांना देखील पाठवा. धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top