धोलाविरा चा इतिहास

धोलाविरा – Dholavira भारतातील गुजरात प्रांतातील कुतच जिल्ह्यातील भचाऊ तालुक्यातील खादिरबेट या गाव परिसरातील जागेस म्हटले जाते. हे गाव राधान्पूर येथून १६५ कि.मी. दूर आहे. स्थानिक लोक यास फोटडा टिंबा असे म्हणतात. याचा अर्थ प्राचीन ऐतिहासिक घाट परिसर असा होतो. या ठिकाणी भारतातील प्रमुख प्राचीन इंडस घाट सभ्यता व हडप्पा संस्कृती चे अवशेष सापडलेल्या ५ जागांपैकी एक आहे. येथे इंडस घाट संस्कृती चे अवशेष पाहायला मिळतात. हि जागा भारतातील पुरातत्वीय अन्वेषण विभागाच्या यादीत ५ व्या स्थानी येते.

या अवशेषांचा संबंध हडप्पा नागरी संस्कृती व इंडस घाट संस्कृती शी मानला जातो. येथे एका विशाल शहराचे अवशेष पाहायला मिळतात. कुटच जिल्ह्यातील विशाल रणक्षेत्रात खादीर गावच्या जवळील भागात ह्या अवशेषांना पाहता येते.

Dholavira History

हडप्पा संस्कृतीमधील एक नगर धोलाविरा चा इतिहास – Dholavira History in Marathi

येथील अवशेष सुमारे १२० कि.मी. क्षेत्रात पसरले आहेत. त्यावेळचे हे एक मोठे शहर मानले जात असावे. हि जागा सुमारे इ.स.पूर्वे २६५० मध्ये नांदत असावी असा अंदाज बांधला जातो. येथे पुरात्वीय विभागाने विविध ठिकाणी खोदकाम केले असून तेथे विशाल अवशेष सापडले आहेत.

धोलाविराची ऐतिहासिक पृष्ठभूमि:

या जागेचा शोध १९६७-६८ मध्ये प्रा.जे.पी.जोशी यांनी लावला ते गुजरात विद्यापीठात पुरातत्वीय विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या मते हि जागा हडप्पा संस्कृतीमधील एक उदयमित नगर होते. ह्या जागेत इंडस संस्कृतिच्या उत्कार्ष्याचे अनेक अवशेषावरून सांगता येते कि येथे हि संस्कृती चांगलीच विकसित झाली असावी.

हडप्पा संस्कृतीचे अवशेष मुख्यतः हडप्पा, मोहेंजोदडो, गनेरीवला, खाखीगढी, कालीबांगण, रुपनगर येथे सापडले होते. त्यानंतर धोलाविरा येथे मोठ्या क्षेत्रात हे अवशेष सापडले आहेत.

येथे उत्खननाचे काम पुरातत्वीय विभागाने १९८९ साली प्रा.आर.एस.बिष्ठ यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाले. १३ वेळा विविध ठिकाणी उत्खनन झाले. २००५ पर्यंत येथे उत्खनन सुरु राहिले. उत्खननात हिरे मोती, दागिने, जनावरांच्या हाडांची सांगाडे, मातीची भांडी,पिताळाची भांडी तसेच मौल्यवान रत्न आणि हत्यारांचे अवशेष मिळाले ह्या सर्वावरून असा अंदाज लावला गेला कि हे एक मोठे व्यापारी केंद्र होते. ज्याचा वापर गुजरात, सिंध, पंजाब व पश्चिम एशियाई देशांमध्ये चालत होता.

वास्तुकला आणि संपन्न संस्कृती:

धोलाविरा हे एक मोठे व्यापारी केंद्र होते. त्यामुळे येथील संस्कृती हि एक विकसित संस्कृती मानली जाते. संपूर्ण शहर आयताकृती होते. हे शहर ५४ चौ.कि.मी. क्षेत्रात वसलेले मुख्य शहर व किल्ला आणि बाह्य शहर अशा भागात धोलाविरा शहराची रचना केली होती. येथे जेव्हा हे शहर लोकांनी वसवले होते तेव्हा त्यांनी मातीपासून विटान्सारखे टणक दगड बनविण्याचे तंत्र अवगत केले होते. घरे पक्क्या विटाची बनली होती.

एका महानगरातील सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी नाल्याप्रमाणे येथे पक्क्या नाल्या बांधल्या होत्या. येथे कोणतेच धार्मिक स्थळ सापडले नाही. येथे मातीपासून कलाकुसरीची विविध आकारांची प्राण्याची व शंख शिंपल्यांची वस्तू अवशेष सापडली आहेत.

येथील पाण्याची व्यवस्था उच्च प्रतीची व समुद्रापासून बचावासाठी तट बंद्यांची भिंती अत्यंत मजबूत बांधल्या गेली होती.

येथील अवशेष त्यावेळच्या विकसित नागरी संस्कृतीचे दर्शन घडविणारे आहेत. ऐतिहासिक स्थळांमध्ये धोलाविरा ने आपले नाव कोरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here