जाणून घ्या १४ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

 14 August Dinvishes

मित्रांनो, आज आपल्या देशाच्या इतिहास काळात घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे भारताची फाळणी ही होय. इंग्रज सरकारने जेंव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केलं तेव्हा, मुस्लीम लिंगच्या सदस्यांनी पाकिस्तान या वेगळ्या मुस्लीम राष्ट्राची मागणी इंग्रज सरकारकडे केली. परंतु, राष्ट्रीय कॉंग्रेस च्या सदस्यांना मुस्लीम लीगची ही मागणी मान्य नव्हती. परिणामी त्यामुळे नाराज झालेल्या मुस्लीम लीगच्या सदस्यांनी देशांत दंगली भडकविल्या देशाच्या अनेक भागात या दंगलीनी रुद्र रूप धारण केलं. काही केल्या या दंगली थांबत नव्हत्या. शेवटी राष्ट्रीय कॉंग्रेसने मुस्लीम लीगच्या या प्रस्तावास मान्यता दिली.

ब्रिटिश इंडियाचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश करण्याचा निर्णय घेतला. परंतु, या फाळणीस महात्मा गांधी यांची मंजुरी नव्हती. त्यांना देशाची विभागणी करणे मान्य नव्हत. स्वातंत्र्य चळवळीच्या इतर नेत्यांनी पुढाकार घेतल्याने ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन यांना ही फाळणी करणे सोयीचे झाले. सन १९४७ साली भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्र निर्माण झाले.

या व्यतिरिक्त आज आपण आजच्या दिवसातील इतिहास काळात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

जाणून घ्या १४ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 14 August Today Historical Events in Marathi

14 August History Information in Marathi
14 August History Information in Marathi

१४ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 August Historical Event

 • इ.स. १६६० साली मुघलांनी मराठ्यांच्या साम्राज्यातील संग्रामगड (चाकणचा किल्ला) ताब्यात घेतला.
 • इ.स. १८६२ साली मुंबई येथील उच्च न्यायालयाचे उद्घाटन १८६१ च्या कायद्या अंतर्गत करण्यात आले.
 • सन १९४७ साली भारताची फाळणी करून पाकिस्तान राष्ट्राची निर्मिती करण्यात आली.
 • सन १९४७ साली पाकिस्तान राष्ट्राचा स्वातंत्र्य दिन.
 • सन १९४७ साली भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली.
 • सन २०१० साली ग्रीष्मकालीन युवा ऑलम्पिक स्पर्धा सिंगापूर येथे घेण्यात आल्या.

१४ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • सन १९०० साली महाराष्ट्रीयन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी,पत्रकार, अभ्यासक आणि वक्ते एस. के. पाटील यांचा जन्मदिन.
 • सन १९०७ साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या. तसचं, महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला वकील म्हणून सनद मिळविणाऱ्या गोदावरी परुळेकर यांचा जन्मदिन.
 • सन १९२३ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार, सिंडिकेटेड स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक आणि युनायटेड किंगडमचे माजी उच्चायुक्त कुलदीप नायर यांचा जन्मदिन.
 • सन १९२५ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक तसचं, प्रभात आणि लोकमान्य या मराठी वृत्तपत्राचे सहाय्यक संपादक जयवंत दळवी यांचा जन्मदिन.
 • सन १९५७ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व विनोदी कलाकार जॉनी लीवर यांचा जन्मदिन.
 • सन १९६२ साली माजी पाकिस्तान क्रिकेटपटू व समालोचक रमीझ राजा यांचा जन्मदिन.
 • सन १९६८ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व कर्णधार प्रवीण आम्रे यांचा जन्मदिन.
 • सन १९८४ साली स्वीडन देशांतील माजी व्यावसायिक टेनिसपटू रॉबिन सोडरलिंग(Robin Söderling) यांचा जन्मदिन.

१४ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 August Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९५८ साली नोबल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ फ्रेडरिक जोलियट-क्यूरी(Frédéric Joliot-Curie) यांचे निधन. कृत्रिम किरणोत्सर्गाचा शोध लावला.
 • सन १९८४ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचे निधन. सन १९५२ साली उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू होत.
 • सन १९८८ साली इटालियन मोटर रेसिंग ड्रायव्हर आणि उद्योजक आणि स्कूडेरिया फेरारी ग्रँड प्रिक्स मोटर रेसिंग टीमचे संस्थापक इंजो फेरारी(Joe Ferrari) यांचे निधन.
 • सन २००० साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय मुष्टियोद्धा हवा सिंग यांचे निधन.
 • सन २०११ साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक शम्मी कपूर यांचे निधन.
 • सन २०१२ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसचं, केंद्रीय महामंडळातील माजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन.
 • सन २०१७ साली प्रसिद्ध भारतीय कवी व साहित्यकार चंद्रकांत देवताले यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top