धुम्रपान विरोधी नारे – Dhumrapan Vyasan Mukti Slogan in Marathi

Dhumrapan Vyasan Mukti Slogan in Marathi

मित्रांनो व्यसन कुठलेही असो त्याचा अतिरेक मृत्युच्या दाढेत घेउन जाणाराच असतो. व्यसन परमेश्वराने दिलेल्या आपल्या अनमोल शरीराला हळुहळु आतुन पोखरत जातं आणि एक वेळ अशी येते की आपल्या हातात पश्चाताप करण्यापलिकडे काहीही उरत नाही.

या ठिकाणी सिगरेट आणि धुम्रपान विरोधी नारे अर्थात स्लोगन्स् देत आहोत. जर तुमच्या कुणा नातेवाईकास अगर मित्रास याचे व्यसन जडले असेल तर या स्लोगन्स् ना त्यांच्यासोबत अवश्य शेअर करा.

हे वाचुन 100 पैकी 10 जण जरी धुम्रपानापासुन परावृत्त होऊ शकले तर आम्ही समजु आमच्या प्रयत्नांना यश मिळालं.

धुम्रपान विरोधी नारे – Dhumrapan Vyasan Mukti Slogan in Marathi

Marathi Slogans on Anti Smoking

सुखी संसाराचा आता एकच विचार, धुम्रपान सोडण्याचा करा निर्धार. 

तुम्ही करत असलेले धुम्रपान सर्वांच्या स्वास्थ्याकरीता हानिकारक आहेत. 

Vyasan Mukti Ghosh Vakya in Marathi

धुम्रपानापासुन दुर रहा निरोगी आयुष्याचा आनंद घ्या.  

नव्या पिढीचा आता एकच ध्यास, सिगारेट सोडु घेऊ मोकळा श्वास! 

No Smoking in Marathi Poster

नवे युग नवा निर्धार, सिगारेट ला करणार हद्दपार. 

का करताय सतत धुम्रपान, कुटुंबिंयांची शरमेने खाली जाते मान. 

Nasha Mukti Slogan in Marathi

धुम्रपानामुळे नपुंसकत्वाचा धोका वाढतो  जागे व्हा! सिगारेट सोडा.  

तुम्ही सिगारेट संपवताय की सिगारेट तुम्हाला?  नक्की विचार करा! धुम्रपानापासुन लांब राहा.

Anti Smoking Slogans

तुम्ही करत असलेले धुम्रपान, कसा मिळवुन देईल चारचैघात मान. 

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है म्हणत 22 व्या वर्षी फासावर जाणाऱ्या भगतसिंग ला आजच्या व्यसनाधीन तरूणांकडे पाहुन काय वाटेल? जरा विचार करा… सिगारेट सोडा.  Anti Smoking Posters for Schools

त्वरीत थांबवा धुम्रपान, पदरात पडेल जीवनाचे दान.  

वडिलधाऱ्यासमोर सिगारेट ओढता? नाही नं, म्हणजेच ती चांगली नाही, त्यापासुन दुर व्हा! 

Anti Smoking Slogans in Marathi

क्षणभर विचार करा! तुम्ही सिगारेट पिताय की सिगारेट तुम्हाला पितेय?

धुम्रपान करणाऱ्यांच्या कुटुंबाकडे समाज चांगल्या नजरेने पाहात नाही याची जाणीव असुद्या आपल्या लोकांकरता सिगारेटपासुन दुर राहा.  

Anti Smoking Slogans in Marathi

धुम्रपानामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परीणामांची जाणीव सर्वांनाच असते तरी देखील आज मोठया प्रमाणावर लोक सिगारेट आणि धुम्रपानाच्या विळख्यात अडकलेले दिसतात. आजची युवा पिढी एवढया मोठया प्रमाणात धुम्रपानाच्या सवयीने ग्रस्त झाली आहे याचा अंदाज आपल्याला आजुबाजुच्या सिगारेट विक्रेत्यांकडे असलेली गर्दी पाहुन सहज लक्षात येईल.

धुम्रपानामुळे स्वतःचे नुकसान तर होतेच शिवाय सिगारेट पितांना जी व्यक्ती आपल्या सोबत असते त्याच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणात होतो.

सिगारेट पिल्याने फुफ्फुसाचा कर्करोग (कॅंसर),  पोटाचा कर्करोग, तोंडाचा कॅंसर, होण्याचा धोका वाढतो शिवाय श्वासासंबंधी अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता वाढते, ब्लड प्रेशर वाढतं, आणि रक्तवाहीन्यांमधे अडथळा निर्माण होतो.

इतकेच नव्हें तर धुम्रपानामुळे मनुष्याचे शरीर आतुन खंगते आणि शरीरातील प्रतिकारशक्ती नाश पावते. धुम्रपानाचे वाईट परिणाम मनुष्याला भोगावे लागतात. म्हणुन आम्ही या ठिकाणी धुम्रपान विरोधी स्लोगन्स् या ठिकाणी देत आहोत. यामुळे आपल्याला सिगारेट सोडण्यास नक्की मदत मिळेल. हे स्लोगन्स् जर आपण व्हाॅटस्अप, फेसबुक आणि ईतर सोशल मिडीयावर अपलोड कराल तर इतर लोक देखील सिगारेट मुळे होणाऱ्या दुष्परीणामांपासुन जागरूक होतील.

Vyasan Mukti Slogan

निसर्गाने बहाल केलेले जीवन अमुल्य आहे, सिगारेट च्या नादात त्याची राख करू नका.

सिगारेट मुळे दररोज 15000 पेक्षा अधिक लोक मृत्युच्या दाढेत ओढले जातात, तुम्ही या 15000 मधील एक होण्याची वाट पहाताय का? धुम्रपान सोडा!  

Vyasan Mukti Slogan in Marathi

तुमच्या कुटुंबाला तुम्ही हवे आहात, त्यांचा विचार करा सिगारेट सोडा. 

सिगारेट पिऊन धुर हवेत सोडण्यापेक्षा, शिक्षणाला मदत करून एखादयाच्या आयुष्याचे सोने करा. 

Nasha Mukti Slogan

आयुष्य संपवण्यापेक्षा धुम्रपान संपवणं कधीही चांगलं.

निरोगी आयुष्याचा संकल्प या क्षणापासुन करा, आपल्या कुटुंबाला ही बहुमुल्य भेट द्या.  

Dhumrapan Ghosh Vakya Marathi

आज नाही आत्ता, सिगारेट करा बेपत्ता…. 

घरी गेल्यानंतर तुमची छकुली तुम्हाला बिलगायला हवीये नां, आपल्या माणसांकरता सिगारेट पासुन दुर राहा.

Vyasan Mukti Poster in Marathi

सिगारेट पिल्याने मनुष्य मर्द वाटतो असा विचार तुम्ही अशिक्षीत असल्याचे सिध्द करतो. 

Dhumrapan Var Ghosh Vakya

सिगरेट पिऊन आकाशात सोडताय धुर, आयुष्य जातयं तुमच्यापासुन दुर दुर.  

आपल्या मित्राला सिगारेट पासुन दुर न्या, मित्रत्वाचे सच्चे कर्तव्य पार पाडा. 

Dhumrapan Virodhi Nare

मोहाचा एक क्षण आयुष्याची माती करायला पुरेसा आहे, तो क्षण ओळखा! सिगारेट ला तुमच्यापासुन दुर करा. 

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Vyasan Mukti Slogan in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top