Tuesday, September 26, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

CID आणि CBI या Investigation Agencies मधला फरक समजून घ्या, अगदी सोप्या भाषेत

CID vs CBI

आपण मीडियावर किंवा चित्रपटांमध्ये पाहिले असेल CBI किंवा CID विषयी, काही चॅनेल वरती तर हे विभाग कशा प्रकारे काम करतात हे सुध्दा दाखविले जाते. काही जणांना प्रश्न पडला असेल की CBI आणि CID मध्ये नेमक काय अंतर आहे? तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की CBI आणि CID मध्ये काय फरक असतो, तर चला पाहूया या छोट्याश्या लेखाच्या माध्यमातून.

सर्वात आधी आपल्याला सांगू इच्छितो CID आणि CBI ह्या दोन्ही भारतातील तपासणी करणाऱ्या एजन्सी आहेत, CID ही एजन्सी एखाद्या राज्यापर्यंत सीमित असते म्हणजेच एखाद्या राज्यात एखादी घटना घडली तर त्या घटनेचा तपास हा CID कडे दिला जातो, म्हणजेच CID ही तपासणी एजन्सी राज्य सरकार च्या मार्गदर्शनामध्ये कार्य करते. आता पाहूया CBI विषयी CBI ही सुध्दा CID सारखी एक तपासणी एजन्सी असून CBI ही संपूर्ण देशात होणाऱ्या घटनांचा तपास करते आणि CBI ही एजन्सी केंद्र सरकार, हायकोर्ट, आणि सुप्रीम कोर्ट यांच्या दिलेल्या निर्देशांवर कार्य करते. तर आता पाहूया सविस्तर माहिती….

सीबीआय आणि सीआयडी यांच्यातील फरक काय – Difference Between CID and CBI in Marathi

Difference Between CID and CBI
Difference Between CID and CBI

CBI म्हणजे नेमकं काय? – What is CBI?

CBI सुध्दा एक गुन्हेगार तपासणी एजन्सी पैकी एक आहे. CBI Full Form (Central Beuro Of Investigation) सीबीआय एक तपासणी एजन्सी असून या एजन्सीची स्थापना सन १९४१ ला झाली होती, परंतु ह्या एजन्सी ला १९६३ मध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन नाव देण्यात आले. सीबीआयचे मुख्यालय दिल्लीला आहे आणि सीबीआय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे गुन्हे, भ्रष्टाचार, आणि खून यांचा तपास करण्यासाठी सीबीआयला नियुक्त केल्या जाते, आणि सीबीआयला देशातील सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारच्या आदेशांचे पालन करावे लागते.

CID म्हणजे नेमकं काय ? – What is CID?

CID म्हणजे गुन्हा तपासणे विभाग आणि CID Full Form (Crime Investigation Department) हा होय. CID एक गुन्हेगार तपासणी विभागांपैकी एक आहे जे राज्यातील दरोडे, खून, आणि वाढते गुन्हे यांचा शोध घेते, सीआयडी ची स्थापना ब्रिटिश काळात पोलीस आयोगाच्या शिफारशी मुळे १९०२ मध्ये करण्यात आली होती. या तपासणी संस्थेमध्ये भरती करणाऱ्या कर्मच्याऱ्यांना सुरुवातीला योग्य ते प्रशिक्षण देऊन भर्ती केल्या जाते. या संस्थांना फक्त राज्य सरकार आणि त्या राज्याचे हायकोर्ट आदेश देऊ शकते, आणि त्यांच्या आदेशावर CID च्या टीम ला आपली तपासणी करावी लागते.

सीबीआय आणि सीआयडी मधील अंतर – Difference between CID and CBI

  1. सीबीआय केंद्र सरकारच्या आधीन राहून कार्य करते तर सीआयडी राज्य सरकारच्या आधीन राहून कार्य करते.
  2. सीबीआयला केंद्र सरकार आदेश देत असते, तर सीआयडीला राज्य सरकार आदेश देत असते.
  3. सीबीआय ची स्थापना १९४१ ला झाली होती तर सीआयडीची स्थापना १९०२ ला झाली होती.
  4. सीबीआय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्ह्यांची चौकशी करते, आणि सीआयडी राज्यातील स्थानीय गुन्ह्यांची चौकशी करते.

तर आशा करतो या लेखाच्या द्वारे आपल्याला माहिती झालं असेल की सीबीआय आणि सीआयडी मध्ये काय अंतर असते, आणि  आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank you So Much And Keep Loving Us!

Previous Post

जाणून घ्या २९ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Next Post

वटवाघूळ उलटे का लटकतात? काय आहे त्यामागचे कारण, जाणून घ्या या लेखातून

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Bats Information

वटवाघूळ उलटे का लटकतात? काय आहे त्यामागचे कारण, जाणून घ्या या लेखातून

Why are Soldiers Allowed to Drink Alcohol

सेनेतील जवानांना मद्यपान करण्यास का मुभा असते?

Whatsapp Status Marathi

151+ नवीन बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी (Newly Updated)

30 April History Information in Marathi

जाणून घ्या ३० एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Difference Between Average and Mileage

एव्हरेज आणि मायलेज मध्ये काय अंतर असते? जाणून घ्या या लेखातून.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved