सी.एन.जी आणि एल.पी.जी गॅस मध्ये काय फरक असतो?

CNG and LPG Gas

आता प्रत्येकाच्या घरीच आपल्याला स्वयंपाक गृहात गॅस पाहायला मिळतो, आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सुध्दा एक जीवनावश्यक वस्तू होऊन गेली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत देशातील करोडो परिवारांना या योजनेचा लाभ झालेला आहे, आणि त्यामुळेच आपल्या देशातील प्रत्येक घरात गॅस उपलब्ध झाला आहे. प्रत्येकाच्या घरातील चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे कित्येक स्त्रियांना आजाराचा सामना करावा लागत होता पण आता परिस्थिती बदलताना दिसत आहे.

गॅसचा विषय निघालाच तर आपल्याला सांगू इच्छितो दैनंदिन व्यवहारात आपल्याला सी.एन.जी आणि एल.पी.जी गॅस विषयी ऐकायला मिळते पण काही लोकांनां प्रश्न पडत असेल की या दोन गॅस मध्ये नेमका फरक काय आहे, तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की सी.एन.जी आणि एल.पी.जी गॅस मध्ये नेमका फरक काय आहे?

सी.एन.जी आणि एल.पी.जी गॅस मध्ये काय अंतर आहे – Difference Between CNG and LPG Gas in Marathi

Difference Between CNG and LPG
Difference Between CNG and LPG

एल.पी.जी गॅस म्हणजे नेमकं काय? – What is LPG Gas

एल.पी.जी हा एक गॅस चा प्रकार आहे, याला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (Liquefied petroleum gas) अस म्हणून ओळखल्या जात. हा गॅस ब्युटेन, प्रोपेन अशा हायड्रोकार्बन गॅसेस चे मिश्रण आहे. आणि म्हणून या गॅस ला कॉम्प्रेस केल्या जाऊ शकते, या गॅस चा वापर दैनंदिन जीवनातील गरजेसाठी केला जातो, जसे जेवण बनवणे, वाहनांचे इंधन म्हणून वापर केला जातो, एल.पी.जी वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये तयार केल्या जाते. एल.पी.जी गॅस ला त्याची घनता लाभलेली असते.

सी.एन.जी गॅस म्हणजे नेमकं काय ? – What is CNG Gas

सी.एन.जी सुध्दा एक गॅस चा प्रकार आहे, सोबतच याला सी.एन.जी किंवा कोम्प्रेस नॅचुरल गॅस (Compressed natural gas) म्हणून बाजारात ओळखल्या जातं.

  • नॅचुरल गॅस ना कोम्प्रेस करून या गॅसला बनविल्या जाते.
  • या गॅस चा वापर घरी जेवण बनविण्यासाठी करत नाहीत.
  • या गॅस चा वापर वाहनांमध्ये इंधन म्हणून केल्या जातो.
  • सोबतच या गॅस मुळे प्रदूषण खूप कमी प्रमाणात होते,

म्हणून भारत सरकारने सुध्दा या गॅस वरील वाहनांना परवानगी देत याचे समर्थन केले आहे.

सोबतच या गॅस ची किंमत ही पेट्रोल आणि डिझेल पेक्षा स्वस्थ दरात उपलब्ध आहे.

आता पाहूया या दोन गॅस मधील फरक ? – Difference Between CNG and LPG Gas

  • सी.एन.जी हा गॅस वाहनांसाठी वापरला जातो तर एल.पी.जी हा गॅस स्वयंपाकासाठी तसेच वाहनांसाठी सुध्दा वापरला जातो,
  • CNG गॅस ला नॅचुरल गॅसेस ला कोम्प्रेस करून बनविल्या जाते तर एल.पी.जी गॅस ला प्रोपेन, ब्युटेन सारख्या हायड्रो कार्बन चे मिश्रण करून बनविल्या जाते.
  • सी.एन.जी गॅस मध्ये उच्च घनता आणि दाब असतो तर एल.पी.जी मध्ये फक्त उच्च घनता असते.

तर आशा करतो आपल्याला हा लेख वाचून सी.एन.जी आणि एल.पी.जी गॅस मधील फरक काय असतो हे समजले असेल, आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

1 thought on “सी.एन.जी आणि एल.पी.जी गॅस मध्ये काय फरक असतो?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top