आयसोलेशन आणि क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या लेखाद्वारे

Isolation and Quarantine

संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीशी झुंजत आहे. आणि या काळात प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे, मागील काही दिवसांमध्ये आपण क्वारंटाईन, आयसोलेशन असे बरेच शब्द ऐकले असतील, आणि काही मंडळी तर अशी असणार की ज्यांनी हे शब्द पहिल्यांदाच ऐकले असतील. मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतील की क्वारंटाईन आणि आयसोलेशन म्हणजे नेमकं काय असेल बरं? तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की आयसोलेशन आणि क्वारंटाईन कशाला म्हणतात आणि त्यामध्ये नेमका फरक काय आहे? तर चला जाणून घेऊया..

आयसोलेशन आणि क्वारंटाईन यांच्यातील  फरक – Difference Between Isolation and Quarantine

Difference Between Isolation and Quarantine
Difference Between Isolation and Quarantine

आयसोलेशन कशाला म्हणायचं – What is Isolation?

एखादी व्यक्ती एखाद्या आजारापासून संक्रमित असेल आणि त्या व्यक्तीला निरोगी व्यक्तींपासून वेगळं करण्यात आलेल असेल तर त्याला आयसोलेशन म्हणतात.

आयसोलेशनचा फायदा म्हणजे एका व्यक्तीला झालेल संक्रमण बाकीच्या निरोगी व्यक्तींना होत नाही. आणि आयसोलेशन मध्ये संक्रमित व्यक्तीला एका खोलीत ठेवल्या जात, ज्यामुळे त्या व्यक्तीचा संपर्क हा बाहेरील निरोगी व्यक्तींशी येत नाही.

सोबतच त्या खोलीमध्ये वेगळं बाथरूम आणि टॉयलेट असायला हवं, आणि त्या खोलीत हवा खेळती असायला हवी.

जर आयसोलेशन मध्ये असलेल्या व्यक्तीला आपली परत ची चाचणी करायची असल्यास त्यांनी बाहेर न पडता फोन करून डॉक्टरांना तेथे बोलून घ्यावे आणि चाचणी करावी.

तर ही माहिती होती आयसोलेशन विषयी आता पुढे पाहूया की क्वारंटाईन काय असतं.

क्वारंटाईन कशाला म्हणायचं – What is Quarantine

क्वारंटाईन म्हणजे इतरांपासून स्वतःला वेगळं करणे, मग ती एक व्यक्ती असो की समूह, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने स्वतःला क्वारंटाईन करावे.

ज्यामुळे आपले आणि आपल्या आजूबाजूंच्या लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आपण क्वारंटाईन झालेले असल्यास इतर कोणाच्याही संपर्कात येऊ नये.

कारण हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची संभावना जास्त असते.

सोबतच आपण क्वारंटाईन मध्ये असताना आपल्या खोलीतील कचरा इकडे तिकडे टाकू नये,

आवश्यक वस्तू कोणाकडून मागून घ्याव्यात, दिवसातून जास्तीत जास्त वेळा हाथ स्वच्छ करावे.

आणि स्वतःची जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्यावी.

कारण आयसोलेशनचा मुख्य उद्देश हा आहे की संक्रमित झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे बरा होईपर्यंत वेगळे ठेवणे आणि क्वारंटाईनचा मुख्य उद्देश असा की एका व्यक्तींपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संक्रमण पसरू न देणे.

आपल्याला आयसोलेशन आणि क्वारंटाईन मधील फरक कळला असेल, आशा करतो आपल्यासाठी लिहिलेला हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल, तर मग या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top