Petrol vs Diesel
दैनंदिन जीवनात प्रवास करण्यासाठी आपण बाईक, स्कुटी, आणि स्कुटर, कार, बसेस, टॅक्सी इत्यादी वाहनांचा वापर करत असतो, आपल्याला कुठलेही काम करायचे असेल तर लगेच आपण घरची मोटारसायकल काढतो आणि आपलं काम करून येतो. आणि आपल्या गाडीतील इंधन संपल्यास आपण इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपवर जातो, आणि तिथे आपल्या गाडीनुसार आपण इंधन भरून घरी येतो, पण कधी विचार आला का की लहान गाड्यांमध्ये इंधन म्हणून पेट्रोल आणि मोठ्या वाहनांमध्ये इंधन म्हणून डिझेल चा वापर का करतात.
तर चला आजच्या लेखात जाणून घेऊया की काय कारण असेल की लहान वाहनांमध्ये पेट्रोल आणि मोठ्या वाहनांमध्ये डिझेल चा वापर का करतात?
पेट्रोल आणि डिझेल यामध्ये काय अंतर आहे – Difference Between Petrol and Diesel
पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही इंधनाचे प्रकार आहेत, आणि या दोन्ही इंधनाच्या प्रकाराला कच्च्या तेलापासून बनविल्या जाते, कच्च्या तेलापासून आणखी अनेक प्रकारची इंधने बनविल्या जातात. या कच्च्या तेलाला दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागल्या जाते. कच्च्या तेलाला हलक्या आणि भारी घटकांमध्ये विभागल्या जाते आणि हलक्या घटकांचा वापर करून पेट्रोल चे निर्माण केल्या जाते तर भारी घटकांपासून डिझेल चे निर्माण केल्या जाते.
आता पाहूया की लहान वाहनांमध्ये पेट्रोल आणि मोठ्या वाहनांमध्ये डिझेल चा वापर का केला जातो.कच्च्या तेलाच्या हलक्या घटकांपासून पेट्रोल चे आणि भारी घटकांपासून डिझेल चे निर्माण केल्या जाते. पेट्रोल च्या तुलनेत डिझेलला जाळणे कठीण काम असते, आणि त्याच्या विरुद्ध पेट्रोलला जाळने डिझेल पेक्षा कमी कठीण असते, कारण डिझेल मध्ये कठीण घटक असतात.
डिझेलला जाळण्यासाठी हाय कॉम्प्रेशनची गरज असते. आणि पेट्रोल इंजिनपेक्षा ५%-१०% जास्त मोठ्या इंजिनची आवश्यकता असते. आणि ते इंजिन मोठमोठ्या वाहनांमध्ये असते,आणि पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिन हे भारी असतं आणि ते चांगल्या प्रकारे डिझेलला कॉमप्रेस करू शकतो. म्हणून मोठमोठ्या वाहनांमध्ये डिझेल आणि लहान वाहनांमध्ये पेट्रोलचा वापर केल्या जातो.
तर आजच्या लेखात आपण पाहिले की लहान वाहनांमध्ये पेट्रोल आणि मोठ्या वाहनांमध्ये डिझेल चा वापर का करतात, आशा करतो हा लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!