Teaser Vs Trailer
टीव्ही वर किंवा युट्युब वर आपल्याला बरेचदा काही चित्रपटांचे टीजर तसेच ट्रेलर पाहायला मिळतात, तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कि टीजर आणि ट्रेलर मध्ये काय अंतर आहे , टीजर आणि ट्रेलर चित्रपटाचं प्रमोशन किंवा चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी असेल हा अनुमान आपण लावतो, पण ह्या दोन्हीही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे, आणि यांच्या मधील नेमका फरक काय आहे , हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत ,तर चला पाहूया..
टीजर आणि ट्रेलर हे काय आहे – Difference Between Teaser and Trailer in Marathi
टीजर म्हणजे नेमकं काय असते? – What is Teaser?
टीजर म्हणजे एक छोटीशी १३ सेकंद ते १ मिनिटं पर्यंत बनवलेली चित्रपटाची लहानशी क्लिप. टीजर मध्ये चित्रपटातील छोट्या मनोरंजनाच्या क्लिप्स टाकलेल्या असतात. टीजर हा ट्रेलर पेक्षा छोटा असतो आणि टीजरला चित्रपट निर्मितीच्या बरेच दिवसांच्या आधी रिलीज केल्या जाऊ शकते. टीजरमुळे प्रेक्षकांचं चित्रपटाविषयीच आकर्षण वाढावं म्हणून टीजरला लोकांसमोर आणले जाते.
टीजरची सुरुवात सर्वात आधी सन १९२० मध्ये झाली आणि आपल्या माहितीसाठी टीजर मध्ये चित्रपटाविषयी कोणतीही माहिती प्रसिध्द केली जात नाही, उदा. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक तसेच टीजरला ट्रेलरच्या आधी प्रदर्शित केल्या जाते.
ट्रेलर म्हणजे नेमकं काय? – What is Trailer?
ट्रेलर म्हणजे चित्रपटाची एक छोटीशी क्लिप असते, ज्यामध्ये चित्रपटाविषयी माहिती सांगितल्या जाते. ट्रेलर हि चित्रपटाची एक छोटीशी चित्रफीत असते, जी ३ किंवा ३:३० मिनिटांची असते. जी चित्रपटाच्या निर्मिती नंतर बनविल्या जाते. आणि ट्रेलर मध्ये चित्रपटाविषयी माहिती दिल्या जाते, आणि ट्रेलर सर्वात आधी सन १९१३ मध्ये बनविल्या गेला.
सुरुवातीला ट्रेलरला चित्रपटाच्या समाप्ती नंतर दाखविल्या जात असे, पण चित्रपट संपल्या नंतर लोकांचे ट्रेलरकडे दुर्लक्ष होत होते, आणि ट्रेलर ला कोणीही पाहत नसे, त्यासाठी ट्रेलर ला चित्रपट सुरू होण्याच्या आधी दाखविल्या जाऊ लागले. त्यामुळे येणाऱ्या नवीन चित्रपटांची माहिती लोकांपर्यंतर पोहचू लागली आणि तेव्हा पासूनच मग चित्रपटाच्या सुरुवातीला ट्रेलर दाखविणे सुरू झाले. ट्रेलर मध्ये चित्रपटाविषयी अधिक माहिती दिलेली असते जसे चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, यांची माहिती दिलेली असते.
ट्रेलर आणि टीजर मध्ये काय अंतर आहे? – Difference Between Teaser and Trailer
टीजर मध्ये आपल्याला चित्रपटाविषयी जास्त माहिती मिळत नाही, त्यामध्ये फक्त आपल्याला एवढं समजत की कोणता चित्रपट येणार आहे, परंतु ट्रेलर मध्ये आपल्याला चित्रपटाविषयी जास्त माहिती मिळते जसे चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार आहे, चित्रपट कोणी बनविला आहे. पण टीजर मध्ये अशी कोणतीही माहिती आपल्याला मिळत नाही.
टीजर हा चित्रपटाच्या १-२ वर्षाच्या आधी सुध्दा बनवला जाऊ शकतो, पण ट्रेलरला चित्रपटाची निर्मिती केल्या नंतरच बनविल्या जाते.
टीजर हा ३० सेकंद ते १ मिनिटं एवढाच असू शकते, पण ट्रेलर हा ३ किंवा ३:३० मिनिटे एवढा असू शकतो.
तर टीजर आणि ट्रेलर मध्ये हा फरक असतो, हे आपल्याला या लेखातून समजलं असेल, तर आशा करतो आपल्याला हा लेख आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!