साधे टायर्स आणि ट्यूबलेस टायर्स मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या या लेखाद्वारे.

Tubeless Tyres vs Tube Tyres 

आपण जेव्हाही गाडी घेण्यासाठी जातो तेव्हा त्या गाडीचे फीचर्स वगैरे चेक करतो, पण बरेच लोक गाडीचे टायर्स कोणते आहेत हे चेक करायला विसरूनच जातात, की गाडीचे टायर्स हे कोणत्या प्रकारचे आहेत ते साधे आहेत की ट्यूबलेस हे पहायचेच विसरतात. आणि बऱ्याच लोकांना टायर्स आणि ट्यूबलेस टायर मधील फरक माहितीच नसतो, आणि माहितीचा विषय म्हणून प्रत्येकाला हे माहीत असणे गरजेच आहे. तर आजच्या या छोट्याश्या लेखात आपण पाहणार आहोत, साधे टायर आणि ट्यूबलेस टायर यामध्ये नेमका काय फरक असतो? तर चला पाहूया..

साधे टायर आणि ट्यूबलेस यांमध्ये कोणते टायर चांगले असते – Difference Between Tubeless and Tube Tyres in Marathi

Difference Between Tubeless and Tube Tyres
Difference Between Tubeless and Tube Tyres

ट्यूब टायर कशाला म्हणतात किंवा ट्यूब टायर कसे असते? – What  is Tube Tyre?

ज्या वाहनांच्या टायर मध्ये ट्यूब चा वापर केल्या जातो त्या टायर्स ना साधे टायर्स म्हणतात, साधे टायर्स च्या आत मध्ये ट्यूब असते आणि त्या ट्यूब मध्ये हवा भरली जाते. साधे टायर्स असणारी गाडी रस्त्यावरून स्मूथ चालते.आणि साध्या टायर्स मध्ये ट्यूब असल्याने टायर्स चा आकार बदलत नाही.

तो जसा आहे तसाच राहतो. पण जेव्हा या टायर्स मधून हवा निघून जाते तेव्हा हे पंक्चर होतात, पण या साधारण टायर्स चे पंक्चर सोप्या पद्धतीने दुरुस्त केल्या जाते. खूप वेळा हवेचा दाब जास्त असल्यामुळे कधी कधी ट्यूब बाहेर येताना सुध्दा आपल्याला दिसून येत.

आणि एक चांगली गोष्ट म्हणजे साधारण टायर्स असणाऱ्या गाड्यांची किंमत कमी असते. सोबतच जेव्हा या टायर्स च्या ट्यूब मध्ये कमी हवा असते तेव्हा हे टायर्स रस्त्याला फ्लॅट होताना आपल्याला दिसतात. बरेच वेळा हवा अचानक गेल्याने हे साधारण टायर्स रस्त्यावर अस्थिर होताना आपल्याला दिसतात.

ट्यूबलेस टायर कशाला म्हणतात? – What is Tubeless Tyres?

ज्या वाहनांच्या चाकांमध्ये ट्यूब चा वापर केलेला नसतो त्या चाकाला ट्यूबलेस टायर म्हणतात. ट्यूबलेस टायर मध्ये ट्यूब चा वापर केल्या जात नाही त्यामध्ये अगोदरच टायर ला ट्यूब जुळलेली असते त्याला ईनर लाईनर सुध्दा म्हटल्या जात. आणि या टायर्स चे वजन सुध्दा खूप कमी असते. ट्यूबलेस टायर्स मध्ये हवा डायरेक्ट भरल्या जात असते. ट्यूबलेस टायर चे दोन प्रकार असतात. एक रेडियल टायर आणि दुसरे बायस टायर.

जेव्हा हे टायर्स पंक्चर होतात तेव्हा या टायर्स मधील हवा हळूहळू कमी होते त्यामुळे गाडी चालविणाऱ्या व्यक्तीला गाडीला स्लो करण्यासाठी वेळ मिळतो, या टायर्स चे पंक्चर काढायला भारी किट्स आणि टूल्स असणे गरजेचे आहे. या टायर्स चे फायदे बघितले असता हे टायर्स साधारण टायर्स च्या तुलनेत लवकर पंक्चर होत नाहीत. पंक्चर झाल्यास साधारण टायर्स च्या तुलनेत हळूहळू हवा कमी होते. सोबतच हे टायर्स सुरक्षिततेच्या तुलनेत साधारण टायर्स पेक्षा जास्त चांगले मानले जातात.

वरील लेखाला वाचून आपल्याला कळलंच असेल की आपल्यासाठी कोणते टायर्स हे योग्य आहे. तर आशा करतो लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here