क्रिकेटच्या लाल आणि पांढऱ्या बॉल मध्ये काय अंतर आहे? जाणून घ्या या लेखातून.

Cricket Ball Information

आपल्या देशात बाकी खेळांपेक्षा विशेष लोकप्रियता ही क्रिकेटला दिली जाते. क्रिकेटच्या प्रत्येक सामन्याला  पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतात. आणि क्रिकेटच्या खेळाला प्रामुख्याने पाहिल्या जाते. आपणही बरेचदा क्रिकेटचा सामना बघितला असेल, आणि त्यामध्ये पाहताना आपल्याला दोन चेंडूंचा वापर होताना दिसला असेल, कधी लाल तर कधी पांढरा चेंडू सामन्यांमध्ये वापरताना आपल्याला दिसून येतं. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत, त्या दोन चेंडूनमधील अंतर काय आहे.

तर चला पाहूया..

क्रिकेटच्या लाल आणि पांढऱ्या चेंडूत काय फरक असतो? –  Difference Between White and Red Cricket Ball in Marathi

Difference Between White and Red Cricket Ball
Difference Between White and Red Cricket Ball

आपण या आधीच्या काही लेखांमध्ये क्रिकेटविषयी माहिती पाहतांना मैदानावर एकापेक्षा जास्त पीचेस वगैरे का असतात, ते जाणून घेतले होते, आपण क्रिकेटचा सामना पाहत असताना नोटीस केलं असेल तर क्रिकेटच्या सामन्यात आपल्याला वेगवेगळ्या चेंडूंचा वापर वेगवेगळ्या सामान्यांसाठी केला जातो हे कळलं असेल. आणि मागील वर्षांमध्ये आपल्याला माहीतच असेल की २०१९ ला क्रिकेटच्या सामन्यासाठी गुलाबी चेंडूंचा वापर सुध्दा केला गेला होता. पण आजच्या लेखात आपण फक्त लाल आणि पांढऱ्या रंगाच्या चेंडूनमध्ये काय फरक असते हे जाणून घेऊ

सर्वात आधी पांढऱ्या चेंडूविषयी माहिती पाहू क्रिकेटमध्ये तीन सामन्यांचे प्रकार असतात एक ट्वेंटी, ओडीआय आणि टेस्ट. पांढऱ्या चेंडूंचा वापर हा हा ट्वेंटी आणि ओडीआय सारख्या सामन्यांमध्ये केला जातो. आता लाल चेंडूविषयी. लाल चेंडूंचा वापर हा टेस्ट मॅच साठी केला जातो. या दोन्हीही चेंडूंचे ब्रँड हे वेगवेगळे असू शकतात.

आता या दोन चेंडूत काय अंतर असतो ते पाहूया – Difference Between White and Red Cricket Ball

पांढऱ्या चेंडूत आणि लाल चेंडूत मुख्य फरक हा त्या चेंडूला केल्या जाणाऱ्या पॉलिश चा असतो. पांढरा चेंडू लवकर खराब होऊ नये या साठी पांढऱ्या चेंडूवर जास्तीची पॉलिश केल्या गेलेली असते. परंतु या चेंडूला जास्त पॉलिश केल्या गेल्या मुळे स्पिन गोलंदाजांसाठी ग्रिप बनविण्यासाठी थोडे कठीण जाते. तेच लाल चेंडूला पांढऱ्या चेंडुपेक्षा कमी पॉलिश केल्या जाते, आणि यामुळे स्पिन गोलंदाजांना ग्रिप बनविण्यासाठी सोपे जाते. तसेच या लाल चेंडूला टेस्ट मॅच साठीच वापरल्या जाते.

टेस्ट मॅच साठी वापरला जाणारा चेंडू हा कोणत्या ब्रँड चा असतो त्याला खूप महत्व आहे, जर टेस्ट मॅच ही ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिके सारख्या देशात असेल तर जास्त करून कुकाबुरा नावाच्या ब्रँड चा चेंडू वापरल्या जातो. भारतामध्ये सामना असेल तर SG च्या ब्रँड चा लाल चेंडू वापरला जातो. आणि इंग्लड वेस्ट इंडिज सारख्या देशात असेल ते ड्युक नावाच्या ब्रँड च्या चेंडूंचा वापर केला जातो.

ड्युक ब्रँड चा लाल चेंडूची सिम थोडीशी उठलेली असते ज्याचा फायदा वेगवान गोलंदाजांना होतो, यामुळेच वेगवान गोलंदाजांना ड्युक ब्रँड चे चेंडू विशेष करून आवडतात. आणि याच्या उलट SG ब्रँड च्या चेंडूंची सिम थोडीशी दबलेली असते हे चेंडू फलदांज्यांच्या फायद्याचे ठरतात. सोबतच हे सर्व चेंडू वाटरप्रूफ असतात. आणि शुद्ध लेदर पासून बनलेले असतात.

तर या लेखाच्या द्वारे आपल्याला दोन चेंडूनमधील अंतर जवळ जवळ कळला असेल, आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रपरिवारात शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here