कुत्रा प्राणी माहिती

Kutra chi Mahiti

आपण विविध प्रकारचे प्राणी पाळतो. त्यापैकी कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. हा एक प्रामाणिक प्राणी आहे जो आपल्या घराचे रक्षण करतो तसेच घरातील सदस्यांना प्रेम सुधा करतो. कुत्रा हा सर्वांनाच आवडणारा प्राणी आहे.

कुत्रा प्राणी माहिती – Dog Information in Marathi

Dog Information in Marathi
Dog Information in Marathi
हिंदी नाव : कुत्ता
इंग्रजी नाव : Dog

कुत्र्याला चार पाय असतात. तसेच दोन डोळे, दोन कान व एक शेपटी असते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय खप तीक्ष्ण असते. तसेच तो इतर प्राण्यांपेक्षा खूप चपळ प्राणी म्हणून ओळखला जातो.

रंग : कुत्रा हा विविध रंगांत म्हणजे प्रामुख्याने पांढरा, काळा व तपकिरी रंगात आढळून येतो.

जाती : कुत्र्याच्या ४०० पेक्षा अधिक जाती आपल्याला पाहायला मिळतात, त्यात प्रामुख्याने रानटी, अल्सेशियन, पामेलिअन, जर्मन शेफर्ड, लॅब्रोडोर अशा काही प्रचलित जाती आहेत. कुत्र्याच्या विविध प्रकारच्या जाती तुम्हाला जगभरात पाहायला मिळतात.

वजन : प्रत्येक कुत्र्याचे वजन किमान ३०-४० किलोग्रॅमपर्यंत असते.

कुत्र्याचे अन्न – Dog Food

कुत्रा हा एक मासाहारी प्राणी आहे पण त्याचे मुख्य अन्न दूध, पाव, भाकरी आणि पोळी सुद्धां खातो.

उपयोग : कुत्रा हा सर्व प्राण्यांमध्ये इमानदार म्हणून ओळखला जातो. म्हणून खेडेगावांमध्ये त्याचा उपयोग घर राखण्यासाठी केला जातो, शेतकरी शेत राखण्यासाठी कुत्र्याचा उपयोग करतात. शहरांमध्येही बरेच लोक कुत्रा हा प्राणी हौसेने पाळतात.

कुत्र्याचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्यामुळे पोलीस त्याचा उपयोग विविध प्रकारचे गुन्हेगार हुडकून काढण्यासाठी करतात. तसेच वैद्यकीय क्षेत्रात सुधा केला जातो. शिकारी लोकही शिकार करण्यास कुत्र्यांचा उपयोग करतात. त्यांना शिकारी कुत्री म्हणतात.

तसेच त्याची ऐकण्याची क्षमता हि खूप जास्त असते. ते २४ मीटरच्या आवारातील आवाज ऐकण्यासाठी सक्षम असतात.

आयुमर्यादा : सर्वसाधारणपणे कुत्रा हा १२ ते १५ वर्षेपर्यंत जगू शकतो.

कुत्र्याला विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडून विविध प्रकारची कामे करून घेतली जातात.

कुत्र्याला विविध प्रकारचे रोग होऊ नयेत म्हणून त्यांचे डॉक्टरामार्फत लसीकरण केले जाते.

बरेच लोक विविध प्रकारची कुत्री पाळून त्यांच्या विक्रीपासून अर्थोत्पादन करू लागले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top