दुर्गा देवीची आरती

Durge Durgat Bhari Aarti

मित्रांनो,  नवरात्र महोत्सव हा आपल्या देशांत साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आहे असे, म्हणने चुकीचे ठरणार नाही. कारण,  हिंदू प्रथेनुसार वर्षातून दोन वेळ साजरा होणारा हा एकमेव उत्सव आहे. वासंतिक नवरात्र हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमीपर्यंत असते, तर शारदीय नवरात्र हे आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते. या कालादरम्यान देवीची उपासना केली जाते.

भाविक नऊ दिवस उपवास पकडून देवीची मनोभावे पूजा अर्चना करतात. तसचं, या नवरात्र उत्सवादरम्यान आपणास देवीची विविध रूपे पाहायला मिळतात. आदी माँ शक्ती नवदुर्गा मातेची एकूण एकशे आठ नावे असून त्यांचा जप करण्यात येतो.

दुर्गा देवीची आरती – Durga Devi Chi Aarti Marathi

Durga Devi Chi Aarti
Durga Devi Chi Aarti

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंवे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. या नवरात्र उत्सवास शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच आहे की, हे नवरात्र शरद ऋतूच्या प्रारंभी येते. शारदीय नवरात्र महोत्सव आपल्या देशांत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. भारतात ठीक ठिकाणी नवदुर्गा मातेच्या विविध रूपाच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करून त्यांची नऊ दिवस पूजा केली जाते.

दरोरोज सकाळ संध्याकाळ आरतीचे आयोजन करून संध्याकाळी गरबा नृत्य केले जाते. नवरात्री निमित्त गुजरात राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार असणाऱ्या दांडिया गरबाचे विशेष आयोजन करण्यात येते. नवरात्र महोत्सव हा आबालवृद्ध व्यक्तींपासून सर्वानाच प्रिय असल्याने अनेक लोक नऊ दिवस उपवास पकडतात. तसचं, देवीच्या दर्शनाकरिता मंदिरात भाविकांची खूप गर्दी पाहायला मिळते.

शारदीय नवरात्र प्रमाणे वसंत ऋतूत देखील नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. परंतु वसंत ऋतूत साजरा होणारा नवरात्री महोत्सव हा काहीच ठिकाणी पाहायला मिळतो. असे असले तरी, हा नवरात्री महोत्सव देखील शारदीय नवरात्री प्रमाणे साजरा करण्यात येतो. अष्टमीच्या दिवशी होम हवन करून ब्राह्मणास दक्षिणा दिली जाते. नऊ दिवस साजरा करण्यात येणारा हा महोत्सव  कधी संपून जातो कळतच नाही. रोज सकाळ संध्याकाळी म्हटल्या जाणाऱ्या नवदुर्गा देवींच्या आर्तींमुळे पर्यावरण चैतन्यमय होवून जाते. या आरतीस भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. नवदुर्गा मातेला हिंदू धर्मात दुर्गादेवी अथवा पर्विती म्हणून संबोधण्यात येते.

नऊ दिवस साजरा होणाऱ्या या नवरात्री उत्सवात उपवास केल्याने आपल्या सर्व पाप नष्ट होतात, अशी भाविकांची धारणा आहे. म्हणून भाविक मोठ्या संख्येने नऊ दिवस उपवास पकडतात. तसचं, या नवरात्री महोत्सवानिमित्त देवीला दरोरोज नऊ दिवस विविध रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. शिवाय, नैवद्य अर्पण केला जातो. मोठ मोठाल्या नवदुर्गा मंडळाप्रमाणे अनेक नागरिक आपल्या घरी देखील घाटाची स्थापना करीत असतात. घरीच घाटाची स्थापना करून नऊ दिवसाचा अखंड दिवा लावतात. नऊ दिवस चालणारा हा उत्सव असल्याने नवदुर्गा मंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. इत्यादी प्रकारे हा नवदुर्गा महोत्सव साजरा करण्यात येतो.

या लेखाचे लिखाण करण्यामागील उद्देश्य म्हणजे या महोत्सवाच्या निमित्ताने गायल्या जाणाऱ्या नवदुर्गा मातेच्या आरत्या आपणास उपलब्ध करून देणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here