एकादशी ची आरती

Ekadashi Aarti

आज आपण माझी मराठी या वेब साईट च्या माध्यमातून भागवान विष्णू आणि देवी एकादशी यांना प्रसन्न करण्यासाठी करण्यात येत असलेल्या एकादशी व्रता बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, या व्रतानिमित्त पठन करण्यात येत असलेल्या आरतीचे लिखाण करणार आहोत. तरी आपण या लेखाचे वाचन करून, एकादशी व्रताचे महत्व समजून घ्या आणि आपल्या मित्र परिवाराला देखील सांगा.

एकादशी ची आरती – Ekadashi Aarti

Ekadashi Aarti
Ekadashi Aarti

ॐ जय एकादशी, जय एकादशी, जय एकादशी माता ।

विष्णु पूजा व्रत को धारण कर, शक्ति मुक्ति पाता ।। ॐ।।

तेरे नाम गिनाऊं देवी, भक्ति प्रदान करनी ।

गण गौरव की देनी माता, शास्त्रों में वरनी ।।ॐ।।

मार्गशीर्ष के कृष्णपक्ष की उत्पन्ना, विश्वतारनी जन्मी।

शुक्ल पक्ष में हुई मोक्षदा, मुक्तिदाता बन आई।। ॐ।।

पौष के कृष्णपक्ष की, सफला नामक है,

शुक्लपक्ष में होय पुत्रदा, आनन्द अधिक रहै ।। ॐ ।।

नाम षटतिला माघ मास में, कृष्णपक्ष आवै।

शुक्लपक्ष में जया, कहावै, विजय सदा पावै ।। ॐ ।।

विजया फागुन कृष्णपक्ष में शुक्ला आमलकी,

पापमोचनी कृष्ण पक्ष में, चैत्र महाबलि की ।। ॐ ।।

चैत्र शुक्ल में नाम कामदा, धन देने वाली,

नाम बरुथिनी कृष्णपक्ष में, वैसाख माह वाली ।। ॐ ।।

शुक्ल पक्ष में होय मोहिनी अपरा ज्येष्ठ कृष्णपक्षी,

नाम निर्जला सब सुख करनी, शुक्लपक्ष रखी।। ॐ ।।

योगिनी नाम आषाढ में जानों, कृष्णपक्ष करनी।

देवशयनी नाम कहायो, शुक्लपक्ष धरनी ।। ॐ ।।

कामिका श्रावण मास में आवै, कृष्णपक्ष कहिए।

श्रावण शुक्ला होय पवित्रा आनन्द से रहिए।। ॐ ।।

अजा भाद्रपद कृष्णपक्ष की, परिवर्तिनी शुक्ला।

इन्द्रा आश्चिन कृष्णपक्ष में, व्रत से भवसागर निकला।। ॐ ।।

पापांकुशा है शुक्ल पक्ष में, आप हरनहारी।

रमा मास कार्तिक में आवै, सुखदायक भारी ।। ॐ ।।

देवोत्थानी शुक्लपक्ष की, दुखनाशक मैया।

पावन मास में करूं विनती पार करो नैया ।। ॐ ।।

परमा कृष्णपक्ष में होती, जन मंगल करनी।।

शुक्ल मास में होय पद्मिनी दुख दारिद्र हरनी ।। ॐ ।।

जो कोई आरती एकादशी की, भक्ति सहित गावै।

जन गुरदिता स्वर्ग का वासा, निश्चय वह पावै।। ॐ ।।

एकादशी ची माहिती – Ekadashi Information

मित्रांनो, आपल्या धार्मिक पुराणांमध्ये एकादशी व्रताला इतर व्रतांपेक्षा अधिक महत्व दिल आहे. हिंदू पंचागानुसार वर्षांतील संपूर्ण मराठी महिन्यात एकूण २४ एकादशी येत असतात. तसचं, एखाद्या वर्षी अधिक महिना आल्यास त्या वर्षी दोन एकादशी जास्त असतात. म्हणजे त्या वर्षी एकूण २६ एकादशी येतात.

मराठी महिन्यातील शुद्ध पक्ष आणि वाद्य पक्षांत या एकादशी येतात. प्रत्येक महिन्याच्या पंधरवड्यातून एक अश्या प्रकारे एका महिन्यात दोन एकादशी येत असतात. तसचं, एकाच महिन्यात दोन येणाऱ्या एकादशीचे महत्व आणि मान्यता देखील वेगवेगळी आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला निर्जला एकादशी म्हणून ओळखलं जाते.

तर, कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असे म्हटलं जाते. याचप्रमाणे, आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखलं जाते. तर, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कार्तिकी एकादशी असे म्हटलं जाते. वर्षांतून येत असलेल्या एकूण एकदशिंपैकी या दोन एकादशीना अधिक  महत्व आहे.

एकादशी व्रताची कहाणी – Ekadashi Story

एकादशी व्रतांचे महत्व सांगणाऱ्या अनेक दंतकथा आपल्या पुराणात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसचं, आपल्या देशांत होवून गेलेल्या अनेक संत महंतांनी या एकादशी व्रताचे महत्व आपल्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.

कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य यांनी भगवान शंकर यांच्याकडे ‘माझा कोणीच वध करू शकणार नाही’ असा वर मागण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. मृदुमान्य यांची कठोर तपश्चर्या पाहून महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितला. तेव्हा त्यांनी आपल्याला पाहिजे असलेला अमरणाचा वर मागितला.

भगवान शंकराने त्यांना वर देताना सांगितलं की, हे मृदुमान्य तुझा वध कोणीच करू शकणार नाही. परंतु एका स्त्रीच्या हातून तुझा वध होईल असे सांगितले. भगवान शंकराने दिलेल्या वरामुळे मृदुमान्य उन्मत झाला आणि तो त्या वराचा गैर वापर करू लागला. आपल्या शक्तीने उन्मत झालेल्या मृदुमान्य दैत्याने स्वर्ग लोकावर स्वारी केली.

परंतु, मृदुमान्य यांच्या शक्तीपुढे देवांचे काहीच चालले नाही. सर्व देव मदतीसाठी भगवान महादेव यांच्याकडे गेले. परंतु, भगवान शंकर यांनी स्वत: दिलेल्या वरामुळे ते काही करू शकले नाही. भगवान शंकर यांच्याबरोबर सर्व देव एका गुहेत लपून बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. त्या देवतेने मृदुमान्य राक्षसा सोबत युद्ध करून त्याचा वध केला आणि सर्व देवांची मुक्तता केली.

देवांची मुक्तता झाली त्यादिवशी जोराचा पाऊस सुरु होता त्यामुळे सर्व देवांची एका प्रकारे आंघोळच झाली. शिवाय, लपून बसले असल्याने त्यांना दिवसभर उपाशी रहाव लागल होत. त्यामुळे त्यांना एकाप्रकारे उपवासच घडला होता. देवांची सुटका करणाऱ्या देवतेचे नाव एकादशी होते, त्यामुळे त्या दिवसापासून एकादशी व्रत करण्याची पद्धत पडली.

एकादशी व्रत करण्याचे फायदे – Ekadashi Vrat Benefits

धार्मिक शास्त्रांनुसार, जे भाविक या दिवशी भगवान विष्णू यांच्याबरोबर देवी एकादशी यांची मनोभावे पूजा करतात आणि एकादशी व्रताचे पालन करतात त्यांची सर्व पापे नाहीसे होतात तसचं, त्यांच्यावर भगवान विष्णू आणि देवी एकादशी यांची कृपादृष्टी राहते.

मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या पंधरवड्यात येणाऱ्या एकादशीचे नाव आणि महत्व जरी वेगळ असलं तरी, त्या दिवशी देवी एकादशी यांना अनुसरूनच व्रत केलं जाते. वरील संपूर्ण माहिती आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून आपण या लेखाचे महत्व समजून इतरांना देखील सांगा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here