अबब! १३ महिन्यांचे १ वर्ष असणारा देश…

Ethiopia Country has 13 Months

साधारणतः एका वर्षात १२ महिने असतात आणि त्या १२ महिन्यांचे मिळून एक वर्ष होते. आणि दरवर्षी आपण नवीन वर्ष ३१ डिसेंबर ला साजरे करतो, पण आपण कधी विचार केला का एका वर्षात १३ महिन्यांचा समावेश असेल तर ते वर्ष किती कंटाळवाणे वाटेल ना, लेखाच्या शीर्षकाने आपल्याला थोडस विचारात टाकले असेल. पण हो हे खरं आहे, पृथ्वीवर असाही एक देश आहे जिथे १३ महिन्यांचे एक वर्ष आपल्याला पाहायला मिळतं.

त्या एका शिल्लकच्या महिन्यामुळे त्या देशात अजूनही वर्ष २०१३ च चालू आहे. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की हे असे कशामुळे त्या देशात होत आहे. आणि यामागे काय कारण असेल तर ते आपण आज पाहूया. आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडणार तर चला पाहूया.

अबब! १३ महिन्यांचे १ वर्ष असणारा देश –The Country of Ethiopia has 13 Months in a year

Ethiopia Country has 13 Months
Ethiopia Country has 13 Months

आफ्रिका खंडातील इथियोपिया हा देश आहे जिथे एका वर्षात १३ महिन्यांचा सामावेश असतो. हा देश सर्वात प्राचीन देशांपैकी एकमेव देश आहे. या देशाची राजधानी ही अदीस अबाबा आहे. हा देश जगातील सर्वात जुन्या देशांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारीक इसाई देश आहे.

वर्ल्डमीटर एलबोरेशन ऑफ लेटेस्ट यूनाइटेड नेशन च्या आकडेवारी नुसार या देशाची लोकसंख्या जवळ जवळ ११.४० करोड इतकी आहे. आफ्रिका मधील नायझेरिया नंतर सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे. ह्या देशाला आफ्रिकाचा हॉर्न ऑफ म्हणून सुध्दा ओळखल्या जाते.

या देशाच्या पूर्वेला सोमालिया पश्चिमेला सुडान, उत्तरेला जिबुती आणि दक्षिणेला केनिया असे देश आहेत. इंग्रजी, इतालवी, फ्रेंच आणि अरब या भाषा मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात. शहरांच्या बाहेर स्वदेशी भाषांचा वापर केला जातो त्यामध्ये ओरोमिन्या (Orominya) तिग्रीन्या (Tigrinya) या भाषांचा समावेश असतो. अदीस अबाबा हे इथियोपिया मधील सर्वात जास्त व्यापारासाठी प्रसिध्द असलेले शहर आहे.

१३ महिन्यांचे एक वर्ष का असते? – 13 Months in a Year is it True?

जगात सुरुवातीला ज्युलियन कॅलेंडर चा वापर होत असे. त्यानंतर १५८२ साली ग्रेगोरीयन कॅलेंडर ची सुरुवात झाली. आणि जगात जवळजवळ सर्वांनी या कॅलेंडर ला वापरण्याची सुरुवात केली परंतु काही देश या कॅलेंडर च्या विरोधात होते. इथियोपिया सुध्दा या कॅलेंडर चा वापर करण्याचा विरोधात होता.

इथियोपिया सुरुवाती पासून इथियोपियन कॅलेंडर चा वापर करत आहे. आणि आजही इथियोपिया मध्ये इथियोपियन कॅलेंडर वापरले जाते. इथियोपिया ने सुरुवाती पासून कधीही ग्रेगोरीयन आणि   ज्युलियन कॅलेंडर चा वापर केला नाही त्यांनी त्यांच्या इथियोपियन कॅलेंडर ला सुरुवाती पासून प्राधान्य दिले.

इथियोपियन कॅलेंडर मध्ये एका वर्षामध्ये १३ महिन्यांचा समावेश असतो. ११ सप्टेंबर ला त्यांचे नवीन वर्ष सुरू होते. त्यांच्या १२ महिन्यांमध्ये ३० दिवसांचा समावेश असतो. पण त्यांच्या एका वर्षात एक महिना शिल्लक चा असतो त्याला प्यागुमे म्हणतात. आणि या महिन्यात ५ किंवा ६ दिवस असतात. पूर्ण वर्षांमध्ये या दिवसांना मोजल्या जात नाही. त्या शिल्लक च्या दिवसांसाठी एक महिना जास्तीचा बनविला आहे.

तर आपण आजच्या लेखात पाहिले की इथियोपिया नावाच्या देशात एका वर्षात १३ महिन्यांचा कालावधी का ठेवला गेला आहे. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आणि या लेखातील माहिती आवडली असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच भन्नाट लेखांसाठी आणि नवनवीन माहितीसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top