चंद्रावर जाणारे पहिले पर्यटक ठरणार… युसाकु मायेजावा

Dear Moon

रात्रीच्या वेळेस जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्याला आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्याच्या मधात चंद्राचे पांढरेशुभ्र रूप दिसते. ते रूप पाहून आपण त्याच्याकडे जणू आकर्षित होत असतो.

आपण चंद्राला जमिनीवरून पाहू शकतो पण त्याच्यावर जायचे म्हटले तर ते खूपच कठीण काम आहे. जुन्या काळात चंद्रावर जायची कल्पना करणेही एक स्वप्न बघीतल्या सारखे वाटत असेल.

आजचे युग हे विज्ञानाचे युग असल्यामुळे वैज्ञानिक चंद्रावर जाण्यास यशस्वी झाले आहेत. परंतु वैज्ञानिक जरी चंद्रावर गेले असतील तरीसुद्धा चंद्रावर जाण्याचा आणि तिथे पर्यटक म्हणून भ्रमण करण्यात खूपच फरक आहे.

आजपर्यंत कोणीच चंद्रावर पर्यटन करण्यास गेलेले नाही. अशे असले तरी लवकरच चंद्रावर पर्यटन करण्यास जाण्याची गोष्ट साक्षात यशस्वी होताना पाहायला मिळणार आहे.

लवकरच जगातील लाखो लोकांमधून निवडला गेलेला मानव चंद्रावर पर्यटन करण्यास जाणार आहे. आपणास माहित आहे का कोण आहे तो व्यक्ती ?

Yusaku-Maezawa

चंद्रावर जाणारे पहिले पर्यटक ठरणार… युसाकु मायेजावा – First Tourist To Fly To Moon Yusaku Maezawa

जापान या देशात राहणारे युसाकु मायेजावा हे करोडपती आहेत,  आणि ते बनणार आहेत चंद्रावर पर्यटनासाठी जाणारे जगातील पहिले व्यक्ती.

‘एलन मस्क’ ची एयोरस्पेस कंपनी आहे स्पेसएक्स या कंपनीने नुकतच चंद्रावर पर्यटनासाठी जाणाऱ्या व्यक्तीचे नाव जाहीर केले आहे. स्पेसएक्स या कंपनीने ही अविस्मरणीय अशी सुवर्ण संधी जपानच्या व्यावसायिक युसाकु मायेवाजा यांना दिली आहे.

 

मिळालेल्या माहिती नुसार कंपनी स्पेसएक्स ने या आपल्या मिशन करिता २०२३ पर्यंत वेळ मागितला आहे.

कारण चंद्रावर जाण्यासाठी लागणारे रॉकेट आजूनपर्यंत पूर्णपणे तयार झालेले नाही. रॉकेट पूर्णपणे तयार झाल्यानंतर चंद्रावर जाण्याची तारीख निश्चित केली जाईल.

कोण आहेत युकासु मायेजावा – Who is Yusaku Maezawa

युकासु मायेजावा हे एक करोडपती व्यावसायिक आहेत. संपूर्ण जगाच्या बातम्यांमध्ये युकासु त्याच क्षणी प्रसिद्धीस आले होते जेव्हा त्यांनी न्यूयॉर्क येथील आर्टिस्ट जीन मिशेल बास्केत यांची पेंटिंग ११०.५ मिलियन डॉलर मध्ये विकत घेतली होती.

युकासु मायेजावा यांना चित्रकलेत खूप रस आहे, त्यांनी एकदा प्रसिद्धी माध्यमांनशी बोलताना सांगितल होत की, जेव्हा मी चंद्रावर पर्यटनासाठी जाणार तेव्हा मी माझ्या सोबत सहा चित्रकारांना घेऊन जाणार.

चित्रकारांना आपल्या सोबत पर्यटनासाठी नेण्याचे मुख्य कारण म्हणजे, चंद्रावरून आल्या नंतर चित्रकारांनी त्याठिकाणी असलेल्या सोंदर्याचे केले असलेले चित्रीकरण पृथ्वीवरील लोकांना पाहता यावे आणि ते पाहून लोक सुद्धा चंद्रावर जाण्यास प्रेरित झाले पाहिजे.

युकासु मायेजावा यांच्या पहिले सुद्धा खूप व्यक्ती चंद्रावर गेली आहेत. ते सर्व जण अमेरिकेचे नागरिक होते. सर्वात शेवटी १९७२ मध्ये नासाचे वैज्ञानिक चंद्रावर गेले होते.

यानंतर २०१७ मध्ये एयरोस्पेस कंपनी स्पेसएक्स चे मालक एलन मस्क यांनी जाहीर केल होत की, ते लोकांना चंद्रावर लांब प्रवास करण्यासाठी पाठवणार आहेत.

एलन मस्क यांच्या अनुसार त्यांची कंपनी या मिशनसाठी बिएफआर वर काम करीत आहे. एलन मस्क यांनी स्पेसएक्स या कंपनीची सरुवात सण २००२ साली केली होती.

आपल्या कंपनीच्या डिजाइन रॉकेटला अंतरिक्षात पाठवले होते. याच्या व्यतिरिक्त एलन मस्क यांना इलेक्ट्रॉनिक कार बनवण्यसाठी प्रसिद्ध असलेल्या टेस्ला कंपनीचे उद्गाते म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top