Frog chi Mahiti
आपल्या परिसरात आढळणारा, सर्वांना परिचयाचा असलेला प्राणी म्हणजे बेडूक होय. या प्राण्याला उभयचर प्राणी म्हणतात.
बेडकाची संपूर्ण माहिती – Frog Information in Marathi
हिंदी नाव : | मेंढक |
इंग्रजी नाव : | Frog |
शास्त्रीय नाव : | Ranidae |
बेडकाला दोन डोळे, चार पाय असतात. या प्राण्यांची त्वचा मऊ असते. या प्राण्यांच्या पायांच्या बोटांना पडदे असतात. बेडकाला मान नसते. या प्राण्याचे डोळे मोठे बटबटीत असतात. त्यांच्या डोळ्यांना पापण्या असतात. बेडकाला बाह्यकर्ण नसतो; परंतु कर्णपटल असतात. या प्राण्याचे डोके त्रिकोणी व चपट्या आकाराचे असते.
रंग : बेडूक या प्राण्याचा रंग काळपट हिरवा असतो.
बेडकाचे अन्न – Frog Food
बेडूक हा प्राणी आपल्या परिसरातील किडे-कीटक खातो.
बेडूक हा जमिनीवर दगडांच्या फटीत, ओलसर, व दमट जागेत व पाण्यात राहतो. बेडूक हा प्राणी त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो.
इतर माहिती : बेडूक हा प्राणी उड्या मारत चालतो. या प्राण्याचे मागील पाय पुढच्या पायांपेक्षा लांब असतात. बेडकाची खालच्या बाजूची त्वचा मऊ असते व नेहमी ओलसर असते. बेडूक हा प्राणी शेतातील किडे, कीटक खात असल्याने तो शेतकऱ्याचा मित्र आहे.
बेडूक हा प्राणी ‘डराँव-डराँव’ असा आवाज काढतो. पावसाळ्यात बेडकांचा प्रजनन काळ असतो. एकाच वेळी मादी बेडूक २० ते २५ अंडी घालते.
बेडूक हा प्राणी थंडीच्या दिवसात जमिनीत थोडासा खड्डा खणून, त्यात जाऊन बसतो. बेडूक हा प्राणी शीत रक्ताचा प्राणी आहे.