• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Aarti

श्री गजानन महाराज यांची आरती

Gajanan Maharajanchi Aarti

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्हातील शेगाव येथील गजानन महाराज सर्वांनाच प्रचलित आहेत. शेगाव येथील प्रशिस्त गजानन महाराज मंदिर आणि मंदिरात असणारी शिस्त भक्तांना भारावून टाकते. संत गजानन महाराज यांच्या जन्माबद्दल कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसला तरी, गजानन महाराज यांच्या ग्रंथात नमूद केल्या प्रमाणे माघ वाद्य ७, १८७८ म्हणजेच इ.स. २३ फेब्रुवारी १८७८ साली शेगाव येथे संत गजानन महाराज प्रकट झाले.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावाचे नाव पूर्वी शिवगाव असे होते. पुढे त्या नावाचा अपभ्रंश होवून शेगाव असे रूढ झाले.

मित्रांनो, या लेखात गजानन महाराजांच्या भक्तांसाठी गजानन महाराज यांची आरती आणि यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आहे.

गजानन महाराज यांची आरती – Gajanan Maharaj Aarti Marathi

Gajanan Maharaj Aarti
Gajanan Maharaj Aarti

जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया।

अवतरलासी भूवर जड मुढ ताराया॥

जयदेव जयदेव

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी।

स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी॥

तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी।

लीलामात्रें धरिलें मानव देहासी॥

जयदेव जयदेव

होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा।

करूनी गणि गण गणांत बोते या भजना॥

धाता हरिहर (नरहरी) गुरुवर तूंचि सुखसदना।

जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना॥

जयदेव जयदेव

लीला अनंत केल्या बंकट सदनास।

पेटविलें त्या अग्नीवाचूनी चिलमेस॥

क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस।

केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥

जयदेव जयदेव

व्याधी वारून केलें कैकां संपन्न।

करविले भक्तालागी विठ्ठल दर्शन॥

भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण।

स्वामी दासगणूचे मान्य करा कवन॥

जयदेव जयदेव

जय जय सतचित-स्वरूपा स्वामी गणराया।

अवतरलासी भूवर जड मुढ ताराया॥

जयदेव जयदेव

गजानन महाराज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती – Gajanan Maharaj Story

संत गजानन महाराज यांचे शिष्य संत दासगणू महाराज यांनी संत गजानन महाराज यांच्या अध्यायात नमूद केल्याप्रमाणे संत गजानन महाराज सर्वप्रथम बंकटलाल अग्रवाल यांना श्री देविदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असतांना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असतांना दृष्टीस पडले. तेव्हा बंकटलाल महाराजांजवळ गेले व त्यांना आत येण्यास व स्वच्छ अन्न ग्रहण करण्यास विनवणी करू लागले.

परंतु, महाराजांनी त्यांचे बोलणे न एकता पुन्हा उष्ट्या पत्रावळीतील अन्न गोळा करू लागले. बंकटलाल यांनी वाढून आणलेल्या पत्रवाळीतील सर्व अन्न एकत्र करून त्यांनी ग्रहण केले व जवळच गुरांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदात जावून पाणी प्याले. त्यांची ही कृती पाहून सर्वजण चकित झाले.

बंकटलाल त्यांच्या दर्शना करिता येताच महाराज वाऱ्याच्या वेगाने लुप्त झाले. बंकटलालनी संपूर्ण गावभर त्यांचा शोध घेतला परंतु, त्यांचा सुगावा कुठेच लागला नाही.  घरी आल्यानंतर बंकटलाल यांनी घडलेली सर्व कहाणी आपल्या वडिलांना सांगितली. दुसऱ्यावेळी गजानन महाराजांचे दर्शन झाले ते गोविंदबुवा टाकळीकर यांच्या कीर्तनात. शंकराच्या मंदिरात आयोजित कीर्तनाला गावातील सर्व मंडळी एकत्र जमली होती. तेव्हा कीर्तनाला सुरवात झाल्यानंतर गोविंदबुवाच्या म्हणण्यात चूक झाली. तेव्हा महाराजांनी अर्थासहित श्लोक म्हणून दाखवला. त्यावेळी संत गजानन महाराजांचे दर्शन झाले.

मित्रांनो, गजानन महाराजांनी शेगाव नगरीत राहून अनेक चमत्कार केले. तसचं, पाटील मंडळीना त्यांच्या पूर्वीच्या जन्माची आठवण करून दिली. अश्या या महान संतानी लोकमान्य टिळकांपासून सर्व गोर गरिबांना समानतेची वागणूक दिली. त्यांनी कधीच जाती भेद, उच्चनीच असा भेदभाव केला नाही. आपल्या प्रिय शिष्या:सह त्यांनी सर्वांवर कृपा दृष्टी केली.

अश्या या महान संतानी भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर देखील त्यांनी अनेक भक्तांना दर्शन दिले. आज देखील लोकांची गजानन महाराज यांच्या प्रती श्रद्धा आहे की ते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

गजानन महाराज यांच्या आरतीत त्यांच्या संपूर्ण जीवनाचा उल्लेख करण्यात आलं आहे. या आरतीचे नियमित पठन केल्याने आपल्या मनाला एका प्रकारचा आनंद मिळतो. शेगाव येथील मंदिरात या आरतीचे नियमित पठन केलं जाते. आरती म्हणायला अगदी सोपी असून या आरतीच्या माध्यमातून आपणास गजानन महाराज यांचा संपूर्ण सार कळतो.

Editorial team

Editorial team

Related Posts

Hanuman Aarti in Marathi
Aarti

हनुमंताची आरती

Hanuman Aarti in Marathi राम भक्त हनुमान यांना या भूलोकावर अनेक नावांनी संबोधलं जाते. तसचं, त्यांच्या जन्माबद्दल अनेक पौराणिक कथा...

by Editorial team
April 21, 2021
Parshwanath Aarti Marathi
Aarti

जैन सामुदाय चे २३ वे तीर्थकार भगवान पार्श्वनाथ यांची आरती

Parshwanath Aarti Marathi जैन सामुदाय हा भारतातील अति प्राचीन समुदाय असून या सामुदायात एकूण २४ तीर्थकार  होवून गेले आहे. त्यांपैकी...

by Editorial team
February 17, 2021
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved