जिराफची माहिती

 

Giraffe chi Mahiti

जिराफ हासुद्धा जंगली प्राणी आहे. लहान मुलांना चटकन ओळखता येणारा प्राणी आहे. जिराफाची उंची सर्वात जास्त असते. हा एक शाकाहारी प्राणी आहे. जिराफ हा आफ्रिकेतील जंगलामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो.

जिराफची माहिती – Giraffe Information in Marathi

Giraffe Information in Marathi
Giraffe Information in Marathi
हिंदी नाव : जिराफ
इंग्रजी नाव : Giraffe

जिराफ हा प्राणी सगळ्या जंगली प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. त्याची मान सगळ्या प्राण्यांपेक्षा खूप उंच असते. जिराफाला चार पाय असतात. पुढचे दोन पाय लांब आणि मागचे दोन पाय आखूड असतात. जिराफाचे अंग मोठे आणि डोके लहान असते. डोक्यावर दोन्ही कानांच्या मध्ये एक उंचवटा असतो. याला दोन लहान शिंगे असतात. याला एक शेपटी असते. अंगावर पांढऱ्या-पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. याची जीभ लांब असते.

जिराफ चे अन्न – Giraffe Food

झाडाची पाने हे जिराफाचे आवडते खाद्य होय, हा काटेरी व खूप उंचीवरचा झाडपालासुद्धा खातो. हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी आहे.

वैशिष्ट्ये: जिराफ या प्राण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त लहानपणीच गाईच्या वासरासारख्या आवाज काढू शकतो.

मोठे होईल तसे जिराफाच्या स्वरयंत्राची वाढ होत नाही. त्यामुळे जिराफ हा प्राणी ओरडू शकत नाही.

या प्राण्याची मान सुमारे ५ ते ६ मीटर उंच राहते. जिराफ हा फक्त ३० ते ४० मिनिटे झोपतो ते उभे राहूनच झोपतात.

त्यांना त्यांचं उंच मानेमुळे पाणी प्यायला त्रास होतो. त्या मुळे ते त्यांच्या पायांचे घुडगे वाकवून पाणी पितात जिराफ खूप काही दिवसातून पाणी पितो.

परंतु उंचीवरील झाडांची पाने तोडण्यासाठी त्याला जिभेचा उपयोग होतो.

जिराफाला मागचा दोन लांब पायांचा उपयोग शत्रूपासून बचाव करण्यासाठी होतो.

तसेच याला जास्त उंची व लांब मानेमुळे दूरचे दिसते त्यामुळे तो शत्रूपासून सावध होतो.

हा प्राणी कधी एकटा राहत नाही, नेहमी कळपाने राहतो. कळपावर हल्ला झालाच तर आपल्या शिंगाने तो शत्रूला परतवून लावतो. वजनाने सुद्धा हा प्राणी मजबूत असतो.

तसेच जिराफाला लांब पायामुळे वेगाने पळू शकतो; पण त्याला लांब पायामुळे उठता-बसताना त्रास होतो. म्हणून हा प्राणी उभ्याउभ्याच झोप घेतो. हा प्राणी स्वत:चे संरक्षण स्वत:च करू शकतो.

तसेच हा प्राणी पूर्व आशिया व आफ्रिका (केनिया) मध्येसुद्धा आढळतो.

ताडमाड उंची, लांब पाय, उंच मान यामुळे हा प्राणी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top