शेळी विषयी माहिती

Bakri chi Mahiti

आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात शेळीपालन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून ओळखला जातो. शेळीला गरीबाची गाय सुद्धा म्हटल्या जाते.

शेळी विषयी माहिती – Goat Information in Marathi

Goat Information in Marathi
Goat Information in Marathi
हिंदी नाव : बकरी
इंग्रजी नाव : Goat

आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात शेळीपालन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून ओळखला जातो. शेळीला गरीबाची गाय सुद्धा म्हटल्या जाते.

जगातील एकूण शेळ्यांपैकी जवळपास 14 टक्के शेळ्या एकट्या भारतात आहेत.
यावरून भारतात शेळी हा किती महत्वपूर्ण प्राणी आहे हे आपल्याला दिसून येतं.

शेळी हा सस्तन प्राणी आहे. शेळीला चार पाय, दोन छोटी शिंगे, दोन कान, एक छोटी शेपटी, दोन डोळे असतात. शेळीच्या अंगावर छोटे-छोटे केस असतात. शेळीचा रंग पांढरा, काळा, तपकिरी, लाल अशा प्रकारचा असतो.

शेळीचे वजन – Weight

सर्वसाधारणपणे शेळीचे वजन २० ते ३० किलोग्रॅम असू शकते.

शेळ्यांच्या वेगवेगळ्या जातीनुसार त्यांच्या वयोमर्यादा असतात. शेळी किमान १५ ते २० वर्षांपर्यंत जगु शकते.

जाती :-

जगात शेळ्यांच्या जवळपास 300 पेक्षा अधिक जाती आढळतात. भारतात शेळ्यांच्या 20 पेक्षा अधिक जाती आहेत.

जमुनापरी, सुरती, सिरोही, उस्मानाबादी, मारवाडी या आणि अशा अनेक जाती भारतात आढळतात.

महाराष्ट्रात प्रामुख्याने शेळ्यांच्या सुरती (खान्देशी / निवानी ), संगमनेरी, उस्मानाबादी, कोकण कन्याल आणि इतर काही जाती आढळतात.
वेगवेगळ्या प्रदेशात तेथील हवामानानुसार शेळीच्या प्रजाती आढळतात.

शेळीचे अन्न :-

शेळी शाकाहारी प्राणी आहे. ती सगळ्या झाडांचा पाला खाते पण शेवरी आणि बाभळी या झाडांचा पाला तिला विशेष आवडतो.

उपयोग :-

शेळी आपल्याला दूध देते. शेळीच्या विष्ठेला ‘लेंड्या’ म्हणतात. या लेंडीपासून लेंडीखत तयार केल्या जाते या खताचा वापर शेतात, बागेतील फुलझाडं , फळझाडांसाठी केला जातो.
या खतामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास चांगली मदत होते. त्यामुळेच या खताची अनेक शेतकऱ्यांकडून चांगली मागणी असते.

शेळीचे दूध पौष्टिक असते शेळीच्या दुधापासून अनेक प्रकारची जीवनसत्त्वे मिळतात.

उत्तराखंड, काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी काश्मिरी, चांगथांगी, चेंगु व पश्मिना जातीच्या शेळ्या आहेत. यातील पश्मिना जातीच्या शेळीपासून उच्च प्रतीचे तलम पश्मिना लोकर प्राप्त केल्या जाते.

या लोकरला बाजारात चांगली मागणी असते व त्याला किंमतही चांगली मिळते. या लोकर पासून शाल, स्वेटर, कानटोपी इत्यादी गरम कपडे तयार केले जातात.

शेळीपालन हा व्यवसाय करणे फायद्याचे ठरते. शेळीच्या पिल्लाला ‘करडू’ असे म्हणतात. एकावेळी शेळी एक किंवा दोन पिलं देते कधी तीन पिलंही देते.

शेळीच्या नर जातीला ‘बोकड’ असे म्हणतात, बोकडाची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

शेळीच्या मांसाला बाजारात चांगली मागणी आहे. विशेष करून बोकडाच्या मांसाला बाजारात जास्त मागणी असते.

काहीजण कर्ज काढून शेळ्या विकत घेऊन त्याचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात. व्यवस्थित नियोजन करून जर शेळीपालन केले तर हा एक फायद्याचा व्यवसाय ठरतो.

बोकड विक्री हा अर्थोत्पादनाचा एक चांगला व्यवसाय आहे.

खेडेगावात शेळीपालनासाठी अनेक योजना आहेत. शेळीपालन व्यवसाय जे लोक करतात त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचाय स्तरावर शेळ्या, त्यांच्या निवाऱ्याची सोय तसेच अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना राबविल्या जातात.

पावसाळ्यातील हवामान शेळीसाठी फार बाधक असते. या ऋतू मध्ये शेळीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.

शेळ्यांना रोग झाला तर पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्यांना औषधपाणी दिले जाते.

जर शेळ्यांची संख्या जास्त असेल तर त्या एकाच ठिकाणी थोड्या-थोड्या अंतरावर बांधून ठेवतात. त्यांच्या संरक्षणासाठी बाजूने कुंपण घालतात किंवा काहीजण विशिष्ट प्रकारचे शेड बांधून घेतात.

शेळी विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ about Goat

प्र. 1. गरिबांची गाय म्हणून कोणत्या प्राण्यास ओळखले जाते?

उत्तर: शेळी (बकरी).

प्र. 2. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जातीच्या शेळ्या आढळतात?

उत्तर: महाराष्ट्रात प्रामुख्याने शेळ्यांच्या सुरती (खान्देशी / निवानी ), संगमनेरी, उस्मानाबादी, कोकण कन्याल आणि इतर काही जाती आढळतात.

प्र. 3. शेळीपासून मिळणाऱ्या उच्च प्रतीच्या लोकरचे नाव काय आहे?

उत्तर: पश्मिना.

प्र. 4. लोकरीपासून काय तयार केले जाते?

उत्तर: गरम कपडे.

प्र. 5. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात?

उत्तर: करडू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top