Home / Marathi Quotes / सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार | Good thoughts in Marathi

सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार | Good thoughts in Marathi

मनाची परीक्षा डोळ्यांनी होते तर डोळ्यांची परीक्षा मनाने होते.

कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका, तिच्याकडे पाठ फिरवा.

कर्तव्याचा मार्ग यशाकडे नेतो.

दुसयाच्या मर्मावर बोट ठेवत नाही तोच धार्मिक.

सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्यदेखील झाकले जात नाही.

कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भूत कार्ये घडतात.

धावता धावता जो पडतो तो यशस्वी होतो.

मोठेपणा येण्यासाठी आधी (कष्ट) परिश्रम सोसावे लागतात.

जो स्वत:ला न जाणता दुस-याला ओळखायला निघतो तो अपयशाकडे नेणारी यात्रा करीत असतो.

निर्भय कृती हीच खरी प्रार्थना, बाकीच्या अर्ज, विनंत्या म्हणजे केवळ हवेचे बुडबुडे.

फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय.

जो शीलवान आणि ज्ञानी आहे, जो सत्यवादी आहे, आपले कर्तव्य जाणणारा आहे अशांची संगत धरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *