इतिहासातील एक अनोखी घटना, एका कुत्र्यामुळे झाले होते दोन देशांमध्ये भीषण युध्द!

Stupid Wars

युद्धांचा इतिहास पाहिला असता आपल्याला माहिती होईल की युध्द एक तर देशांच्या सिमा रेखांमध्ये झालेल्या विवादामुळे, किंवा महासत्ता होण्याच्या दृष्टीने एखाद्या देशावर आक्रमण केल्याचे आपण ऐकलेलं असेल, द्वापारयुग, त्रेतायुग, या सारख्या युगांमध्ये सुध्दा सत्तेसाठी किंवा धर्माला कायम ठेवण्यासाठी दोन गटांमध्ये युध्द झाल्याचे आपण पाहिले आहे.

पण एखाद्या विचित्र कारणामुळे दोन देश युध्द करण्यासाठी एकमेकांच्या समोर आले असतील हे आपण आज पहिल्यांदा वाचत असणार, कारण इतिहासात अशीही एक घटना झालेली आहे, जी खूप विचित्र समजल्या गेली आणि त्यामुळे दोन देशांमध्ये अक्षरशः युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. तर आजच्या लेखात आपण त्याच घटनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत, ज्या घटनेने इतिहासात दोन देशांमध्ये युध्द करण्यास भाग पाडले होते. तर चला पाहूया.

असेही एक युद्ध ज्याचे कारण ‘कुत्रा’ – Greece and Bulgaria War of the Stray Dog 

War between Greece and Bulgaria
A war between Greece and Bulgaria

दोन देशांत एका कुत्र्यामुळे युध्द झाले होते, हो आपण बरोबर वाचले आहे, एक कुत्रा ज्याने दोन देशांच्या मधे युध्द सुरू केले होते, ही घटना आहे १९२५ ची ग्रीस आणि बुल्गारिया या दोन देशांमध्ये काही कारणास्तव तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती, या निर्माण झालेल्या परिस्तिथी दरम्यान ग्रीस च्या एका सैनिकाचा पाळलेला कुत्रा मैसेडोनिया च्या सीमेत गेला होता.

त्या कुत्र्याला वाचविण्याकरिता त्या सैनिकाने सुध्दा त्याचा पाठलाग केला पण तो हे विसरून गेला की त्याने सीमा पार केली आणि सीमेच्या पलीकडे असणाऱ्या सैनिकांनी परिस्थिती ला न जाणता त्या सीमा पार करणाऱ्या सैनिकावर गोळीबार केला आणि तो सैनिक तेथेच मरण पावला.

या गोष्टीची माहीती ग्रीस च्या सैनिकांना झाली तेव्हा सीमेवर आणखी तणाव निर्माण झाला आणि दोन्ही देशांच्या सरकार मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ग्रीस च्या सैनिकांत असंतोष निर्माण झाला कारण कोणत्याही देशाच्या सैनिकाला जर मारल्या जात असेल तर त्याचे प्रतिउत्तर समोरील देश देण्यास मागे पुढे पाहत नाही.

तसेच ग्रीस ने बुल्गारिया च्या सैन्यावर हमला केला. या हमल्याने युध्दाची परिस्तिथी निर्माण केली होती, आणि शेवटी युद्ध सुरू झाले. हे युद्ध जवळजवळ ५ दिवस लगातर चालले होते. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये आपल्या शत्रू विषयी आक्रोश निर्माण झाला होता. आणि त्याचा परिणाम असा झाला की दोन्ही देशांचे मिळून एकूण ५० च्या जवळपास सैनिक मारले गेले होते.

पण पाच दिवसाच्या भीषण युध्दा नंतर दोन्ही देशांमध्ये एक प्रस्ताव झाला, ज्या प्रस्तावाच्या आधारे युध्दाला स्थगिती दिल्या गेली. पण हे युध्द बुल्गारिया जिंकले होते. आणि या युध्दामध्ये दोन्ही देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या प्रस्तावात असे ठरले होते की बुल्गारिया देशाचे झालेले नुकसान ग्रीस ने भरपाई करून द्यावे. यावर ग्रीस ने बुल्गारिया ला झालेले ४० ते ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई केली होती. त्यांनंतर या युध्दाला स्थगिती मिळाली. या युध्दाला इतिहासात “पेट्रीक ची घटना” म्हणून ओळखल्या जातं. जगात हे प्रथम युध्द असेल जर एखाद्या प्राण्यामुळे घडलं होत.

तर आजच्या लेखात आम्ही जगात घडलेल्या आगळ्या वेगळ्या घटनेचे दर्शन शब्दाच्या माध्यमातून करून दिले. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top