Tuesday, June 24, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

गुरूनानक जयंती विषयी  माहिती

Guru nanak Jayanti Information in Marathi

शिखांचे प्रथम गुरू व शिख धर्माचे संस्थापक गुरूनानक देव. एक महापुरूष आणि महान धर्म प्रवर्तक म्हणुन ते अत्यंत पुजनीय आहेत. समस्त विश्वातील अज्ञानता दुरू करून आध्यात्मिक शक्ति ला आत्मसात करण्याकरता त्यांनी प्रेरीत केले.

गुरूनानकजींचा जन्म १४६९ साली पंजाबमधील लाहोर जिल्हयात तलवंडी नावाच्या गावी झाला. आता हे गाव पाकिस्तान मधे असुन “ननकाना साहब” या नावाने ओळखल्या जाते.

नानक देवांचे वडिल तलवंडी येथे पटवारी म्हणुन कार्य करत तर आई तृप्ता देवी एक धर्मपरायण स्त्री होत्या आईच्या धार्मिक विचारांचा प्रभाव गुरूनानक यांच्यावर देखील पडला. लहानपणापासुनच ते कुशाग्र बुध्दीचे होते चिंतनशील आणि एकांतप्रीय हे त्यांच्या स्वभावाचे विशेष होत. गुरूनानकसाहेबांचे मन शालेय शिक्षणापेक्षा साधुसंतांच्या आणि विव्दानांच्या सान्निध्यात जास्त रमत असे.

गुरूनानक जयंती विषयी माहिती – Guru nanak Jayanti Information in Marathi

Guru nanak Jayanti Information in Marathi
Guru nanak Jayanti Information in Marathi

शिख धर्माचे संस्थापक गुरूनानक देव – Founder of Sikhism Guru Nanak Dev

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री गुरूनानकजींचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. शिख संप्रदायात गुरूनानकजींचा जन्मदिन अत्यंत सन्माननीय मानण्यात येतो आणि त्याच पध्दतीने हा दिवस साजरा देखील करण्यात येतो. गुरूनानकजींच्या जयंती दिनी त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. या दिवसाला गुरूपुरब, गुरू पर्व या नावाने देखील संबोधतात. याचा अर्थ आहे ‘गुरूंचा उत्सव’.

गुरू नानकदेवांनी नैतिकता, कठोर परिश्रम आणि खरेपणाचा संदेश दिला आहे. हा दिवस मोठया आस्थेने, सामुहीक सद्भावनेने संपुर्ण विश्वात उत्साहाने साजरा करतात.

गरूनानकजींचे संपुर्ण जीवन प्रेम, ज्ञान आणि वीरतेने ओतप्रोत भरलेले आहे.

सुमारे ५०० वर्षांपुर्वी आपल्या भारतात गुरूनानक देवजी एक महान संत होते. ते मुळात पंजाब चे रहिवासी होते. नानकदेवांनी बगदाद पर्यंत आध्यात्मिकता, परमेश्वरासोबत एकरूप होणे आणि भक्तिभावाचा प्रचार प्रसार केला.

त्यांच्या जयंतीदिनी शिखसमुदाय त्यांचे स्मरण करतो त्यांचाकरता हा अत्यंत पवित्र आणि महत्वपुर्ण असा दिवस आहे.

या दिवशी कार्तिक पौर्णिमा देखील असते. आजच्याच दिवशी जैन धर्माचे भगवान महाविर यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले होते.

शिख धर्मात एकुण दहा गुरू होऊन गेले. त्यात गुरू नानकदेवजी पहिले गुरू होत. एकुण दहाही गुरूंच्या कथा त्यांच्या त्यागाला अधोरेखीत करतात. या सर्व गुरूंनी चांगल्या, निर्दोष आणि धार्मिक लोकांच्या रक्षणाकरता आपल्या सर्व सुखसोयींचा त्याग केला.

गुरूनानकजींचा संदेश – Message From Gurunanakji

गुरूनानकजींनी भक्तिच्या अमृत भक्तीरसा विषयी विवेचन केले आहे. ते भक्तियोगात आंकठ बुडालेले संत होते. या उलट गरू गोविंद सिंग कर्मावर विश्वास ठेवणारे कर्मयोगी होते ते कर्मावर आणि कर्म करण्यावर विश्वास ठेवणारे होते.

ज्यावेळी मनुष्य संसारीक जबाबदाऱ्यांमध्ये पुर्णपणे गुरफटतो तो परमेश्वराला देखील विसरून जातो. गुरूनानक देवजी त्याला उद्देशुन म्हणतात

“संसारीक गोष्टींमधे स्वतःला इतके देखील गुरफटुन घेवु नका की ज्यामुळे परमेश्वरालाच विसरून जाऊ ”.

गुरूनानकजींचे जीवन प्रेम ज्ञान आणि वीरतेने भरलेले होते. त्यांच्या मते ईश्वर सर्वव्यापी आहे. मुर्तीपुजेचे ते कट्टर विरोधी होते.

संत साहित्यात नानक त्या संताच्या श्रेणीत येतात ज्यांनी स्त्रीयांना वरचा दर्जा दिला आहे.

आयुष्याच्या अखेरच्या काळात गुरूनानक देवांची ख्याती मोठया प्रमाणात वाढली होती. आपल्या कुटुंबियांसमवेत राहत मानवसेवेत ते आपला वेळ व्यतीत करीत होते.

करतारपुर नावाचे गाव त्यांनी वसवले जे आता पाकिस्तानात आहे त्या ठिकाणी एक मोठी धर्मशाळा देखील उभारली. याच ठिकाणी २२ सप्टेंबर १५३९ रोजी त्यांनी आपला देह ठेवला.

मृत्युपुर्वी लहना या आपल्या शिष्य बांधवाला त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणुन घोषीत केले पुढे त्यांना गुरू अंगद देव म्हणुन सर्व ओळखु लागले.

गुरूनानक देवजी एक उत्तम सुफी कवी देखील होते. त्यांच्या भावुक आणि कोमल हृदयातुन अनेक रचनांचा जन्म झाला आहे. त्यांची भाषा वाहत्या पाण्यासारखी होती. म्हणून आजही त्यांना गुरूचा दर्जा देत शीख बांधवच नाही तर पूर्ण भारतदेशात एक महान महात्मा म्हणून पूजतात.

तर आज आपण एका महान संतांविषयी जाणून घेतले, आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत या लेखाला शेयर करायला विसरू नका. तसेच नवीन लेखांसाठी माझी मराठी ला भेट द्यायला विसरू नका.

Thank You So Much And Keep Loving Us! 

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved