हरभऱ्याची माहिती आणि फ़ायदे

Chickpeas Information in Marathi

हरभरा म्हटल की सर्वजण आवडीने खातात. तसेच हरभरयाचे अनेक प्रकार आहेत. आणि हो हरभरयापासून अनेक पदार्थ देखील बनविले जातात. आपल्या कडे सुरवातीपासून पिवळ्या देशी चण्याचे उत्पादन होत होते. आणि या पिवळ्या चण्याची साल काढून त्याचे दोन भाग करून डाळ सुद्धा बनविण्यात येते. तसेच चणा आणि चणा डाळ याचे सर्वात जास्त उत्पादन भारतात होते. यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत, ते आपण समोर पहाणारच आहोत. तसेच हरभरा याची बरीच माहिती आपण समोर पाहणार आहोत.

हरभऱ्याची माहिती आणि फ़ायदे – Harbara chi Mahiti

Harbara chi Mahiti
Harbara chi Mahiti
हरभरा याचे विविध नावे : चणा, हरभरा अशी नावे आहेत
शास्त्रीय नाव : ‘सायसर बेरिएटिनम’
धान्याचे प्रकार : कडधान्य.
हंगाम : रब्बी.
हरभरयाचे उत्पादन : भारतात होते.
हरभरा यामध्ये असणारी पोषक तत्वे : चण्यामध्ये ६१% कार्बोहायड्रेटस्, २१% प्रथिने, ५% स्निग्ध पदार्थ आणि ४% तंतू.

‘सायसर बेरिएटिनम’ असं शास्त्रीय नाव असलेल्या या वनस्पतीला आपण हरभरा, चणा अशी नावे दिली आहेत. चण्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिले म्हणजे आपले देशी चणे ज्यामध्ये पिवळे आणि हिरवे असे आणखी दोन प्रकार असतात. पिवळे चणे जे असतात त्यापासून आपण फुटाणे बनवतो. साल काढून टाकली की त्यापासून फुटाण्याची डाळ मिळते. ही डाळ चिवड्या मध्ये सुद्धा घालतात किंवा त्यापासन चटणी बनविता येते. हिरव्या चण्यांना हरभरा म्हटलं जातं. तसेच पिवळ्या चण्यांनाही काही ठिकाणी हरभरा म्हणण्याची पद्धत आहे.

हिरव्या चण्यांचा वापर उसळ, चटणी पराठे, आमटी, वडे, सॅलड आणि हराभरा कबाब यासाठी सुद्धा भरपूर प्रमाणात केला जातो. ओले हरभरे जे असतात ते नुसते खायलाही सर्वांना आवडतात. देशी चण्यांचं उत्पादन भारत, मेक्सिको इथिओपिया, इराण वगैरे देशांमध्ये होतं- पिवळे चणे वाळवून, साल काढून त्याचे दोन भाग करून चण्याची डाळ बनविण्यात येते.

चण्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे काबुली चणे आहे. हे चणे खास छोले बनविण्यासाठी वापरले जातात. खरं तर या चण्यांना हिंदीमध्ये छोले म्हणतात आणि आता छोले वगैरे हा पदार्थ लोकप्रिय झाल्यावर आपल्याकडेही त्यांचा उल्लेख छोले असाच केला जातो. तसेच अमेरिकेत त्यांना ‘गर्बान्झो’ असं म्हणतात. आणि इंग्रजीत त्यांना ‘चिकपी’ असं म्हटलं जातं. खरं तर इंग्रजीत या शब्दाचा उपयोग देशी आणि काबुली अशा दोन्ही चण्यांच्या संदर्भात होतो. आशियातील चण्यांचा इतिहास भारताचा पाहिला तर ख्रिस्तपूर्व ७००० वर्षे इतका जुना आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये केलेल्या उत्खननातील ख्रिस्तपूर्व ७५०० वर्षांपूर्वीच्या अवशेषात चणे सापडले आहेत.

आपल्या देशातील त्यांचा इतिहास –

ख्रस्तपूर्व २५०० वर्षे इतका जुना आहे. आपल्याकडे पूर्वीपासून पिवळ्या देशी चण्यांचे उत्पादन होत होते तर तसेच भूमध्य सामुद्रिक देशांमध्ये काबुली चण्यांचे उत्पादन होते. काबुली चण्यांचा रंग पिवळ्या चण्यापेक्षा फिका आणि पृष्ठभाग गुळगुळीत असतो. काबुली चणा हा आकाराने देशी चण्यापेक्षा खूप मोठा असतो. काबुली चण्यांचं उत्पादन हे आपल्या देशात १८ व्या शतकात पासून होऊ लागलं.

संस्कृतमधील ‘चणक’ या नावामुळे चणा हे नाव मराठीत रूढ झालं. तसेच चणा डाळीला बेंगॉल ग्रॅम म्हणूनही ओळखतात. ब्रिटिश भारतात आल्यावर त्यांना ही डाळ प्रथम बंगालमध्ये आढळून आली म्हणून त्यांनी हे नाव चणा डाळीला दिलं असं म्हटलं जातं.

चणा आणि अनुषंगाने चणा डाळीच्या उत्पादनात पहिल तर जगात पहिला क्रमांक भारताचा लागतो. चण्यामध्ये २१% प्रथिने, ६१% कार्बोहायड्रेटस्, ५% स्निग्ध पदार्थ आणि ४% तंतू असतो. भरपूर फॉस्फरस, कॅलशियम आणि मॅग्नेशियम असतात व काही प्रमाणात लोह आणि जस्तसुद्धा असतात. ब जीवनसत्वही भरपूर प्रमाणात असतं. स्निग्ध पदार्थ असले तरी त्यामध्ये जास्त करून असंपृक्त मेदाम्ले असल्याने ती शरीराला अपायकारक नसतात. चण्यामध्ये असलेला तंतू हा जास्त करून त्याच्या सालामध्ये असल्याने चणा डाळीत त्याचं प्रमाण अगदी नगण्य असतं. १०० ग्रॅम चण्यात ३६० उष्मांक असतात.

हरभरा विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ About Harbara

Q. हरभर्याचे उत्पादन कुठे जास्त होतो ?

उत्तर – हरभर्याचे सर्वात जास्त उत्पादन भारतात होतो.

Q. हरभर्यामध्ये कोणकोणते पोषक तत्वे आहेत ?

उत्तर – चण्यामध्ये २१% प्रथिने, ६१% कार्बोहायड्रेटस्, ५% स्निग्ध पदार्थ आणि ४% तंतू असतो. भरपूर फॉस्फरस, कॅलशियम आणि मॅग्नेशियम असतात व काही प्रमाणात लोह आणि जस्तसुद्धा असतात. ब जीवनसत्वही भरपूर प्रमाणात असतं. अश्या प्रकारची पोषक तत्वे असतात.

Q. हरभर्याचा कोणकोणत्या प्रकारे वापर होतो ?

उत्तर – हिरव्या चण्याचा वापर चटणी, पराठे, वडे, आमटी, उसळ, सॅलड आणि हराभरा कबाब यासाठी सुद्धा केला जातो. ओले हरभरे नुसते खायलाही सर्वांनाच आवडतात.

Q. चणा हे नाव कसे पडले ?

उत्तर – संस्कृतमधील ‘चणक’ या नावामुळे मराठीत त्याला चणा हे नाव पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here