दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा वापर करतात हे पाच देश जाणून घ्या या लेखातून.

Hindi Speaking Countries in the World

आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या भाषा  बोलल्या जातात, आणि प्रत्येक राज्यातही काही ठिकाणी राज्याच्या उप भाषा बोलल्या जातात. परंतु हिंदी एक अशी भाषा आहे जी जवळजवळ सर्वांना समजते, आणि बोलल्या पण जाते, आपल्या देशात सर्व भाषांचे प्रभुत्व हिंदीला लाभले आहे आणि आपली राष्ट्र भाषा ही हिंदी झालेली आहे. राष्ट्र भाषा हिंदी या साठी झालेली आहे की कारण भारताच्या बहुतांश भागात या भाषेला बोलल्या जातं आणि समजल्या जात.

आपल्या देशातच नाही तर बाहेरील काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात तसेच व्यवहारात केल्या जातो. तर आजच्या लेखात आपण असे ५ देश पाहणार आहोत ज्या देशांमध्ये हिंदी भाषेचा वापर केला जातो. या पाच देशांमध्ये बहुतांश करून भारताच्या सीमा लगतचे देश आहेत तर चला पाहूया ते कोणते देश आहेत.

५ असे देश जिथे सर्वात जास्त हिंदी भाषा बोलली जाते – 5 Hindi Speaking Countries Other than India

Hindi Speaking Countries
Hindi Speaking Countries

१) थायलँड – Thailand

थायलँड हा आशिया खंडातील काही सुंदर देशांपैकी एक देश आहे. या देशाची भाषा मुख्यतः इंग्रजी आहे. परंतु या देशात हिंदी भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसते. कारण या देशात लाखोंच्या संख्येने भारतीय वंशाचे लोक राहतात. आणि जास्त हिंदी बोलण्यामागे हे सुध्दा एक कारण आहे.

२) पाकिस्तान – Pakistan

पाकिस्तान एक इस्लामिक राष्ट्र आहे, आणि पाकिस्तान हा एक वेगळा देश बनण्याआधी भारताचा एक हिस्सा होता स्वातंत्र्या नंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगवेगळे राष्ट्र निर्माण झाले. आणि पाकिस्तान हा भारतापासूनच एक वेगळा देश बनल्यामुळे या देशात आजही हिंदी भाषा बोलली जाते. पाकिस्तान मध्ये पहिल्यापेक्षा हिंदूंची संख्या ही खूप कमी झाली आहे तरीही या देशात हिंदी भाषा बोलली जाते.

३) सिंगापूर – Singapore

सिंगापूर हा एक छोटासा देश आहे, अनेक पर्यटक या देशाला आपल्याला भेट देताना दिसून येतात, आणि जगाची सफारी करताना सिंगापूर ला आपण फिरलो नाही तर त्या जगाच्या सफारीचा आनंद फिकाच राहील. या देशाची राष्ट्रभाषा माली आहे. तरीसुद्धा या देशात मोठ्या प्रमाणावर लोक आपल्याला हिंदी बोलताना दिसून येतील, त्यामागे कारण आहे सिंगापूर मध्ये वसलेले भारतीय वंशज. यामुळे सुध्दा येथे मोठ्या प्रमाणात हिंदी बोलल्या जाते.

४) बांग्लादेश – Bangladesh

बांग्लादेश हा भारताचा शेजारी राष्ट्र आहे. हा देध सुध्दा अगोदर भारताचा एक हिस्सा होता फाळणीनंतर हा देश भारतापासून वेगळा झाला. भारतापासून हा देश वेगळा बनल्यामुळे या देशात सुध्दा हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. आणि बांगलादेशात सर्वात जास्त प्रमाणात मुस्लिम वर्ग राहतो.

५) नेपाळ – Nepal

नेपाळ हा सुध्दा भारताचा एक शेजारी आणि मित्र देश म्हणून ओळखल्या जातो. आणि या देशाची राष्ट्र भाषा नेपाली आहे पण भारताला लागून या देशाची सीमा असल्यामुळे या देशातही हिंदी भाषा बोलल्या जाते, आणि फक्त हिंदीच नाही तर नेपाली, मैथिली आणि भोजपुरी या भाषा सुध्दा नेपाळ मध्ये बोलल्या जातात.

या लेखाच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या देशामध्ये हिंदी भाषेचा वापर केला जातो हे कळण्यास मदत झाली असेल, तर आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top