अचानक लोकांना गायब करणारे जंगल,भयानक जंगलांपैकी एक

Hoia Haunted Forest 

जगात बरेच ठिकाणे असे आहेत जे अजूनही लोकांसाठी रहस्यमय आहेत, आता पहा ना अमेरिकेच्या जमिनीवर एरिया ५१ नावाच्या ठिकाणाविषयी अजूनही पूर्णपणे कोणाला माहिती नाही आहे, जगात असे बरेच ठिकाण आहेत ज्यांच्या विषयी परिपुर्ण माहिती कोणालाच नाही, आणि बरेच लोक त्या ठिकाणांविषयी माहिती शोधत असतात, तसेच माहिती शोधता शोधता आम्हाला सुध्दा एका ठिकाणाची माहिती मिळाली, तेव्हा वाटलं की या ठिकाणाविषयी थोडक्यात लिहून आपल्यापर्यंत माहिती पोचवावी, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत जगातील एका भयानक ठिकानाविषयी जे ठिकाण एक जंगल आहे आणि त्या जंगलात कोणी गेले तर ती व्यक्ती परत येणे महाकठीण आहे. तर चला आजच्या लेखात या ठिकानाविषयी माहिती पाहूया.

असेही एक भयानक जंगल जेथून आजवर कोणीही परत आले नाही – Hoia Haunted Forests Information in Marathi 

Hoia Haunted Forests
Hoia Haunted Forests

हे भयानक ठिकाण रोमानिया च्या ट्रांसल्वेनिया या भागात येथे स्थित आहे. लोक या ठिकानावर जाण्यासाठी भितात. कारण लोकांमध्ये या ठिकानाविषयी भीती आहे की जो सुध्दा या जंगलात जातो तो परत कधीही येत नाही. अश्या भयानक घटना या ठिकाणावर बऱ्याच घडलेल्या आहेत आणि त्यामुळेच लोकांमध्ये या ठिकानाविषयी भीती निर्माण झालेली आहे. हे ठिकाण एका जंगलात आहे आणि त्याला होया बस्यू असे नाव देण्यात आले आहे. सोबतच या ठिकाणाला ट्रांसल्वेनिया चा बरमुडा ट्रँगल असे सुध्दा संबोधले जातं.

प्रत्येकाला माहितीच आहे जंगल म्हटले की खूप सारे झाड झुडपं तसेच प्राण्यांची रेलचेल सुरूच असते, या जंगलात सुध्दा वेडे वाकडे झाडे आहेत, एवढे वेडे वाकडे की दिवसाला भीती वाटेल. या जंगलाचे क्षेत्रफळ कमीत कमी साडे सहाशे किलोमीटर ते सातशे किलोमीटर पर्यंत पसरलेलं आहे, आणि या जंगलात आतापर्यंत बरेचशे लोक अचानक गायब झालेले आहेत.

काही लोक या घटनांना भूत प्रेत यांच्यासोबत जोडतात, तर काही दुसऱ्या गोष्टींसोबत. बरेच लोकांचे असे सुध्दा म्हणणे आहे की या जंगलात एलियन्स चे विमान येतात. काही लोकांनी तर इथपर्यंत दावा केलेला आहे की या ठिकाणावर त्यांना यूएफओ सुध्दा दिसले आहेत, आणि लोकांचे या जंगलातून गायब होण्यामागे त्यांचाही हात असू शकतो असा दावा तेथील लोक करतात.

पण काही लोकांना तर या ठिकानावर घडणाऱ्या घटना तेव्हा खऱ्या वाटायला लागल्या जेव्हा एक व्यक्ती जंगलात जात होता आणि अचानक तो गायब झाला एवढंच नाही तर त्या व्यक्तीसोबत शेकडोंच्या संख्येत काही बोकडं होती. कुठं गायब झाले कोणालाही माहिती झाले नाही.

या जंगलात एका सैन्याच्या टेक्निशियन ने सुध्दा यूएफओ ला उडताना पाहिल्याचा दावा केला होता. हेच नाही तर या ठिकाणी फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा याविषयी माहिती दिल्याचे समोर आले होते. या ठिकाणावर अश्या रहस्यमयी घटना नेहमी घडत असतात असे काही लोकांचे मत आहे.

या ठिकानाविषयी माहिती काढताना आम्हाला काही अश्याही गोष्टी आढळल्या ज्या आमच्या दृष्टिकोणा पलीकडे होत्या जसे १८७० च्या दरम्यान एक मुलगी या जंगलात जाते आणि अचानक गायब होते, एवढंच नाही तर पुढचे पाच वर्षे गायब राहते पण पाच वर्षांनंतर ती बाहेर तर येते, पण तिची स्मरणशक्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते.

ती बाहेर कोणालाही ओळखत नाही, कोणालाही सोडा ती स्वतःला सुध्दा ओळखत नाही आणि याचदरम्यान काही दिवसांनंतर त्या मुलीचा मृत्यू होतो, आता या गोष्टीला ऐकून आपल्याला बरेचशे प्रश्न पडले असतील असे का होत असेल? कोण करत असेल? तर या विषयी आपण कोणतीही गोष्ट ठोस पणे मांडू शकत नाही, की ही गोष्ट यामुळे घडत आहे पण तर्क तर काढुच शकतो.

या ठिकानाविषयी आपल्याला मला एक गोष्ट सांगायला आवडेल की हे ठिकाण एवढ्या मोठ्या भागात पसरलेलं आहे की कोणीही व्यक्ती किंवा प्राणी जंगलात गेल्यावर रस्ता तर हमखास विसरू शकतो, आणि जंगलात बरेचशे प्राणी असल्याने जे लोक जंगलात जातात त्यांची मृत्यू होत असेल. पण आपण फक्त आणि फक्त तर्क लावू शकतो, बाकी काय खरं आणि काय खोटं हे मी आपल्यावर सोडतो. आपल्याला या ठिकानाविषयी काय वाटतं हे आम्हाला सोशल मीडियावर कळवा.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असल्यास सोशल मीडियावर आम्हाला आपला अभिप्राय कळवा, सोबतच या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here