Honey Bee Information in Marathi
मधमाश्यांच्या पोळ्यातून काढलेले मध आपण कधी खाल्ले आहे का? हे मध खूप गोड असते. आणि सर्वांनाच माहिती आहे की ते मध पोळ्यात येतं कुठून, मधमाश्या फुलातील मकरंद जमा करतात आणि त्याला आपल्या पोळ्यात आणून ठेवतात, आणि मध तयार होते. पण सर्वच माश्या असे करू शकतात का? आणि या मधाचा उपयोग आपल्यासाठी कश्या प्रकारे होतो, तसेच कोणत्या माश्या मध गोळा करतात, आणि यापैकी कोणत्या माश्या डंक मारतात? या सारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात पाहणार आहोत, तर चला पाहूया मधमाश्यांविषयी थोडक्यात माहिती.
मधमाश्यांविषयी थोडक्यात माहिती – Honey Bee Information in Marathi
वैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवर माश्यांच्या एकूण २० हजारापेक्षा जास्त प्रजाती आहेत. आणि या माश्यांच्या प्रजातींमध्ये आपल्या घरातील माश्यांचा सुध्दा सामावेश आहे. परंतु यामध्ये मध गोळा करणाऱ्या माश्यांचा खूप कमी प्रमाणात सहभाग आहे. ज्या माश्या फुलांमधून मध गोळा करतात त्यांना आपण मधमाशी म्हणतो, आणि या मधमाश्यांपैकी सर्वात जास्त प्रमाणात मध गोळा करणाऱ्या मधमाश्यां मध्ये युरोपियन मधमाश्यांच्या समावेश आहे. ह्या मधमाश्या चांगले रित्या मध बनविण्यासाठी ओळखल्या जातात. सोबतच दक्षिण आशियामध्ये सुध्दा अश्या पाच ते सात प्रजाती आढळतात ज्या मध गोळा करून त्याला योग्य रित्या साठवू शकतात.
बऱ्याच लोकांना दोन रंगाच्या मधमाश्याच माहिती असतील ज्या बहुतेक करून पाहायला मिळतात, त्या म्हणजे काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या. ह्या दोन रंगाच्या मधमाश्यांना बहुतेक करून ओळखल्या जातं. पण आपल्या माहिती साठी मधमाश्या फक्त ह्या दोन रंगाच्या नसून आणखी काही रंगाच्या सुध्दा असतात. जसे अमेरिकेत आपल्याला मधमाश्यांच्या काही प्रजाती दिसतात, त्या निळ्या आणि हिरव्या रंगाच्या आहेत. त्या मधमाश्यांना एगापोस्टेमोन स्पेलेंडेंस या नावाने ओळखल्या जातात.
सोबतच येथेच आणखी काही मधमाश्या आहेत ज्या पिवळ्या आणि काळ्या या दोन रंगाच्या पाहायला मिळतात. या मधमाश्यांना वेली कारपेंटर बी या नावाने ओळखल्या जातं. या प्रजाती मध्ये आपल्याला पाहायला मिळते की जी मादा मधमाशी असते तिचा रंग काळा तर नर मधमाशी चा पिवळा रंग पाहायला मिळतो.
आपल्याकडे बरेचश्या अश्या मधमाश्या पाहायला मिळतात ज्या आकाराने लहान असतात आणि फुलांतून मध खूप कमी प्रमाणात गोळा करतात, या मधमाश्यांमध्ये एक विशेषतः असते ती म्हणजे लहानातील लहान फुलांमधून सुध्दा ह्या मधमाश्या मकरंद जमा करू शकतात, ज्या बाकी च्या मधमाश्या करू शकत नाही, या मधमाश्यांनी गोळा केलेले मध गोड तर असतेच पण थोड्याश्या प्रमाणात खारट सुध्दा असते, आणि या मधाला आयुर्वेदात उत्तम औषधी म्हणून पाहिले जातं.
असे मध जमा करणाऱ्या मधमाशी ला वैज्ञानिक भाषेत एपिस मेलीपोना म्हणतात. मधाचा उपयोग औषध बनविण्यासाठी केला जातो, मधाचा उपयोग करून खोकल्याच्या सिरप आणखी बरेचश्या औषधी बनविल्या जातात. मध आपल्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची कमी पूर्ण करते.
त्यांनंतर मधमाश्यांविषयी बऱ्याच लोकांना माहीती नसेल की नर मधमाशी डंख मारु शकत नाही. डंख मारणारी मधमाशी ही नेहमी मादा असते. तर या लेखात आपण मधमाशी विषयी थोडक्यात माहिती पाहिली आहे, आशा करतो आपल्याला लिहिलेली ही थोडक्यात माहिती आवडली असेल, आपल्याला लिहिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!