Ghoda chi Mahiti
आपण अनेक प्रकारचे प्राणी पाळतो. त्यांपैकी घोडा हा एक पाळीव प्राणी आहे.
घोड्याची माहिती – Horse Information in Marathi
हिंदी नाव : | घोडा |
इंग्रजी नाव : | Horse |
घोड्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान, व मोठी केसाळ शेपटी असते. घोड्याच्या पायाला लोखंडी नाल बसवलेले असतात. घोडा चपळ प्राणी आहे. तो वाऱ्याच्या वेगाने धावतो. घोड्याला ४० दात असतात.
घोडा विविध प्रकारच्या रंगांत आढळतो. पांढरा, काळा, चॉकलेटी असे याचे प्रमुख रंग आहेत.
घोड्याचे अन्न – Horse Food
घोडा झाडाची पान, फळे ,फुले, गवत, हरभरे व इतर अन्नपदार्थ खातो. हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे.
घोड्याचे वजन – Horse Weight
घोड्याचे वजन सर्वसाधारणपणे २५० ते ३०० किलोग्रॅम असते.
सर्वसाधारणपणे घोडा हा १६ ते २० वर्षेपर्यंत जगू शकतो.
उपयोग :
घोडा हा खूप जोरात धाऊ शकतो. घोडा हा समान वाहतुकीसाठी वापरला जातो. परंतु भारता मध्ये जंगली घोडे खूप कमी प्रमाणात आहे. आपण जे नेहमी घोडे पाहतो ते पाळीव घोडे असतात.
शिवाजी महाराजांच्या तसेच फार पूर्वीच्या काळापासून युद्धासाठी घोड्यांचा उपयोग केला जात असे. घोडागाडीसाठी घोड्याचा वापर करतात. त्याला ‘टांगा’ असेही म्हणतात. पूर्वी राजे-महाराजे, राण्या-महाराण्या यांच्यासाठी घोडागाड्या होत्या.
तसेच लग्नात नवरदेवाला लग्नाच्या आधी देवाला घेऊन जाण्याची प्रथा असते; त्यासाठी घोड्याचा उपयोग होतो.
पूर्वी युद्धाच्या वेळी घोडदळ हा एक वेगळा गट असे; तेव्हा घोड्यावर बसून युद्ध करत असत.
पूर्वी वडर जमात या गावाहून दुसऱ्या गावी जाताना आपले सामान व लहान मुले. म्हातारी माणसे यांना घेऊन जाण्यासाठी घोड्यांचा उपयोग करत असे.
जाती: घोडयाच्या संपूर्ण जगभरात ३०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत.त्यांपैकी अरखी जातीचा घोडा प्रचलित आहे.
घोडा हा प्राणी वेगाने पळावा व पळताना त्याच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून त्याच्या खुरांवर लोखंडी नाल बसविलेली असते. घोड्याच्या अंगावर माणूस बसण्यासाठी जे विशिष्ट प्रकारचे आसन घातलेले असते, त्याला ‘खोगीर’ म्हणतात.
घोड्याला विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. बरेच लोक घोडे पाळून त्यांना प्रशिक्षित करतात व त्यांची विक्री करतात; यापासून आर्थिक उत्पन्न मिळते, घोड्याच्या घराला ‘तबेला’ म्हणतात.
घोड्याच्या पिलाला ‘शिंगरू’ म्हणतात. घोड्याच्या मादीला ‘घोडी’ म्हणतात, घोडा हा प्राणी उभ्यानेच झोप घेतो. सर्कशीत काम करण्यासाठीही घोड्यांचा वापर होतो.
घोडा हा उभ राहून विश्रांती घेतो कारण त्याला बसायला अवघड जाते. घोड्याला प्यायला खूप जास्त पाणी लागत. घोडा हा दर तसलं ६० किमी अंतर पार करू शकतो ते पण न थांबता. घोड्याच्या सुद्धा विविध जाती आहेत.